साहसी पर्यटनाचे स्वागत
संपादकीय पान बुधवार दि. ३१ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
साहसी पर्यटनाचे स्वागत
अखेर कोकणातील सागरी किनार्यावरील पर्यटकांना आकर्षित करणार्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या २३ ठिकाणी साहसी पर्यटनाला शासनाने मान्यता दिली, याचे स्वागत झाले पाहिजे. कोकणातील चारही जिल्ह्यांतील सागरी किनारी पर्यटनाचा आराखडा नुकताच महाराष्ट्र बंदर विभागाकडून जाहीर करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गणपतीपुळे, मुरुड, हर्णे, गुहागर, दाभोळ व आंजर्ले, रायगड जिल्ह्यातील वरसोेली, किहिम, नागाव, अलिबाग, आक्षी, पालव, रेवदंडा, काशीद, मुरुड, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर व ठाणे जिल्ह्यातील वसई व मांडवा या समुद्रकिनार्यांवर साहसी, जलक्रीडा पर्यटन घोषित करण्यात आले आहे. या योजनेत यांत्रिक व विनायांत्रिक अशा दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे. यात वॉटर पॅरासेलिंग, बनाना बोटिंग, विंड सर्फिग याचबरोबर कोनोइंग, वॉटर राफ्टिंग आदी क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. हे जलक्रीडा प्रकार चालविणार्या संस्थाही संघटित नाहीत. त्यामुळे पर्यटकांना सुविधा व योजनांचा एक प्रकल्प तयार करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण किनारपट्टीचा साहसी जलक्रीडा योजनेसाठी समावेश करण्यात आला आहे, पण जिल्ह्यात अशा १९ सागरी किनारपट्या पर्यटनदृष्टया महत्त्वाच्या आहेत. त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. काही काळाने त्यांचाही समावेश केला जाईल अशी आपण अपेक्षा करु. पर्यटकांसाठी या क्रीडा प्रकारासाठी काम करणार्या संस्थांची निवड करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अशा संस्थांनी पाच लाखांचा विमा उतरवावा, अशा अटी घालून संस्था निवडण्यात येणार आहेत. या संस्थांना फीदेखील कमीच ठेवली जाणार आहे. कोकणात जलसाहसी पर्यटन आणि जलक्रीडा प्रकाराच्या माध्यमातून पर्यटकांना सुविधा देण्याचा शासनाच्या बंदर विभागाने प्रस्ताव केला आहे. राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या किनारी भागाला दरवर्षी सुमारे साडेसहा कोटी भारतीय, तर पाच लाख विदेशी पर्यटक भेट देत असतानाही या पर्यटकांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला जलपर्यटनाचा अपेक्षित महसूल मिळत नाही. आपल्या कोकणाच्या शेजारी असलेल्या गोवा राज्यातील सौंदर्यापेक्षा काकणभर सरस ठरेल असे कोकणाचे निसर्ग सौंदर्य आहे. मात्र असे असूनही आपल्याला येथे पर्यटन व्यवसाय विकसीत करता आलेला नाही, ही खेदाची बाब आहे. आता या किनारपट्टीवर साहसी पर्यटनाला मान्यता दिल्याने मोठा फायदा होऊ शकेल. त्याचबरोबर येथे रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा चांगल्या तर्हेने उपलब्ध केल्या पाहिजेत. केरळ व गोवा यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण पर्यटन विकसीत केल्यास महाराष्ट्र देशात पर्यटनात पहिल्या क्रमांकावर येईल. याची निदान सुरुवात या निर्णयाने झाली असे म्हणावयास हरकत नाही.

0 Response to "साहसी पर्यटनाचे स्वागत"
टिप्पणी पोस्ट करा