-->
जनजागृती आवश्यकच

जनजागृती आवश्यकच

संपादकीय पान बुधवार दि. ३१ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जनजागृती आवश्यकच
मुंबईतील नामवंत रुग्णालय हिरानंदानी येथे किडनी रॅकेट उघड झाल्यावर विविध प्रकारच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. अर्थात त्यासाठी सरकारने नवीन नियमावली करण्याचे जाहीर केले आहे. मात्र सध्या ठप्प झालेल्या या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया लवकरात लवकर सुरु होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सध्या अवयवदानासंदर्भात समाजात जनजागृती होण्यासाठी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. यात सर्वसामान्यांना माहिती होऊन ते अवयवदानासाठी पुढे यावेत याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अवयवदानाचा फॉर्म भरुन राज्यातील जनतेपुढे एक चांगला आदर्श घालून दिला आहे. गेल्या काही वर्षात प्रत्यारोपणामध्ये अत्याधुनिक शास्त्र विकसीत झाले आहे. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आपण किडनी यकृत, स्वादुपि, ह्दय, फुफ्फुस,त्वचा, नेत्र, हाडे,लहान आतडे हे अवयव एका व्यक्तीच्या शरीरातून दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करु शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन इत्यादी आजारांमुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर वाढते मद्यपान,जंतूसंसर्ग यासारख्या कारणांनी यकृत प्रत्यारोपणाची गरज वाढली आहे. अवयव दात्यांची दरवषी भारतात पाच लाख रग्णांना किडनी प्रत्यारोपणाची, तीन हजार रग्णांना यकृत प्रत्यारोपणाच व दोन हजार रुग्णांना ह्दय प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु यापैकी केवळ पाचच टक्के रुग्णांमध्येच अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ शकल्या आहेत. उरलेले ९५ टक्के रुग्ण दरवर्षी अवयव दात्यांच्या प्रतिक्षेत राहिले आहेत. महाराष्ट्र राज्यातच १२००० रुग्ण किडनी मिळण्यासाठी प्रतिक्षेत आहेत. यासाठी अवयवदानाची चळवळ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविली जाण्याची आवश्यकता आहे. कोणतीही व्यक्ती जीवंतपणे आपली एक किडनी वा यकृताचा काही यांचे दान करु शकते. अपघात किंवा इतर कारणाने एखादा मेंदू अकार्यक्षम झाला असेल परंतु इतर अवयव कार्यरत असतील अशा मेंदुमृत व्यक्तीच्या शरीरातील अवयव कार्यरत असतील अशा मेंदुमृत व्यतीच्या शरीरातील अवयव दुसर्‍या रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात. मेंदुमृत व्यक्ती ही कालातराने मृत्यू पावणार हे निश्चित असते. तसेच संपूर्ण मृत पावलेल्या व्यक्तीचे डोळे व त्वचा हे अवयव तीन तासांच्या आत प्रत्यारोपित करता येतात. आपल्याकडे प्रत्यारोपणाच्या बाबतीत अनेक गैरसमजुती जास्त आहेत. जर एखाद्या मृत व्यक्तीने आपले अवयवदान केलेले असेले तरीही त्यांचे नातेवाईत नंतर ते अवयव दान करण्यास सहजरित्या पुढे येत नाहीत. खरे तर अशा प्रकारे आपण एका व्यक्तीच्या जाण्याने आपण दुसर्‍याला जीवनदान देत असतो ही मोठी बाब आहे. त्यासाठी सर्वच समाजामध्ये अवयवदानासंबंधी जागृती होण्याची आवश्यकता आहे. एकीकडे ही जनजागृती करीत असताना दुसरीकडे सरकारने प्रत्यारोपणासंबंधी पारदर्शकता आणण्यासाठी कायद्यात तातडीने बदल करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्यारोपणात जे गैरप्रकार होतात, गरीबांना त्यात नाडून त्यांचे अवयव काढून घेण्याचे प्रकार होतात ते थांबविले जातील.

Related Posts

0 Response to "जनजागृती आवश्यकच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel