गणरायाचा खड्डेमय मार्ग
संपादकीय पान गुरुवार दि. ०१ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
गणरायाचा खड्डेमय मार्ग
यंदाचाही गणेशोत्सव भक्तांसाठी खड्डेमय प्रवासाचाच होणार हे आता नक्की झाले आहे. गणपती आता जेमतेम पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना रस्त्यातील खड्डे काही बुजवले गेलेले नाहीत. गेल्याच आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने रस्त्यांची डागडुजी करणे कठीण झाले, परिणामी काही बुजविलेल्या खड्यांनाही पुन्हा खड्डे पडले. त्यामुळे गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणार्या प्रवाशांची वाट बिकट झाली आहे. राज्याच्या दोन मंत्र्यांनी पनवेल ते इंदापूर या पल्ल्यावरील खड्डे पाहणीचा दौरा करून ही वाट निर्विघ्न करा, असे तोंडी आदेश दिले असले तरी हे खड्डे काही बुजविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे मंत्र्यांचे हे आदेश पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहेत. पळस्पे ते वडखळ हा खड्डे मार्ग बनल्याने या मार्गावरून रोज प्रवास करणार्या प्रवाशांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच गणपतीला चाकरमनी गावाला जाणार असल्याने या रस्त्यावरील गर्दी भयानक होणार आहे. यंदा तरी सध्याचे सरकार काहीतरी या रस्त्याचे करील व हा प्रवास सुखकर होईल हे केवळ स्वप्नच राहिले आहे. पनवेल ते इंदापूर हा ८४ किलोमीटरच्या पल्ल्यापैकी १४ किलोमीटरचे अंतर हे पूर्णपणे खड्डेमय असल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे. त्यापैकी १० किलोमीटरवरील खड्डे दूर केल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. उर्वरित चार किलोमीटरवरील खड्डे भरण्याचे व काही ठिकाणी डांबरीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आह, असा प्रशासनाचा दावा आहे. मंत्र्यांनी कितीही घोषणा केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात पळस्पे ते वडखळ या रस्त्याची आजही बिकट अवस्था आहे. १ सप्टेंबरपासून ५ सप्टेंबपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन वजनापेक्षा वजन असलेल्या वाहनांना बंदी आहे. ६ सप्टेंबरपासून १४ सप्टेंबपर्यंत या महामार्गावर सर्वच जड-अवजड वाहनांना बंदी आहे. १ ते १६ सप्टेंबपर्यंत रेती व वाळूची वाहतूक करणार्या वाहनांवर बंदी राहील. प्रशासनाने कितीही सज्जता दाखविली तरी रस्ते आता अल्प काळात काही दुरुस्त केले जाऊ शकत नाहीत. यात पालकमंत्र्यांचे व सध्याच्या शासनाचे अपयश स्पष्टपणे दिसते. कोकणातील या मूलभूत गरजांकडे सरकारचे कधी लक्ष जाणार हा मोठा प्रश्न आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हे एक मोठे गाजर सध्याच्या सरकारने दाखविले आहे. मात्र हा रस्ता कधी प्रत्यक्षात उतरतो ते पहायचे. यंदा खरे तर पळस्पे ते इंदापूर हा चौपदरी मार्ग झाला असता तर गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला असता. परंतु तसे काही झालेले नाही. यंदाचा गणरायांचा मार्ग हा खड्यातूनच जाणार असल्याने कोकणी माणसाला पुन्हा एकदा केंद्र सरकारने चुना लावला आहे. एस.टी. महामंडळाने गणेशभक्तांसाठी जादा गाड्या सोडल्या आहेत, परंतु या गाड्या कधी पोहोचणार अशी शंका वाटते. एकूणच पाहता गणरायाचा व गणेशभक्तांचा यंदाचा प्रवासही काही सुखकर होणार नाही, असेच खेदाने म्हणावे लागते.

0 Response to "गणरायाचा खड्डेमय मार्ग"
टिप्पणी पोस्ट करा