समानतेचा पुकार
संपादकीय पान सोमवार दि. २९ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
समानतेचा पुकार
मुंबईतील प्रसिध्द असलेल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना असलेली प्रवेश बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठविल्याने लिंग भेदाच्या आधारावर कोणत्याही धार्मिक स्थळात कोणालाही प्रवेश नाकारता येणार नाही, यावर खर्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले आहे. शनिशिंगणापूर येथे ज्यावेळी महिलांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी अशाच प्रकारचा निर्णय न्यायलयाने दिला होता. त्यावेळी हिंदुत्ववादी संघटननांनी हिंम्मत असेल तर दर्ग्यात प्रवेश महिलांनी करावा असे आव्हान दिले होते. आता न्यायालयाने कोणत्याही धर्मियांचे प्रर्थनास्थळ असो लिंगभेदाच्या आधारावर प्रवेश नाकारणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह ठरावा. तसेच हा एक क्रांतीकारी निर्णय म्हटला पाहिजे. मात्र न्यायालयाने आपल्या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगितीदेखील दिली आहे. या सहा आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा ठेवण्यात आला आहे. अर्थात वरच्या न्यायालयातही हा निर्णय बदलेल असे काही वाटत नाही. पुरुषांप्रमाणे महिलांनाही दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी, डॉ. नुरजा नियाज आणि काही संघटनांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे येत्या सहा आठवड्याच्या आत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दादा मागणार आहोत, असे हाजी अली दर्ग्याच्या कमिटीने म्हटले आहे. खरे तर या दर्ग्याची स्थापना झाल्यावर सुरुवातीला येथे महिलांनाही प्रवेश होता. मात्र नंतर काही कर्मठ लोकांनी महिलांच्या प्रवेशाला बंदी घातली.न्यायालयाच्या आदेशापूर्वी हाजी अली दर्ग्यात विशिष्ट मर्यादेपर्यंतच महिलांना प्रवेशाची परवानगी होती. मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई होती.
पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी अनेका वर्षांपासून केली जात होती. आता सर्वोच्च न्यायालयात जाणे म्हणजे केवळ वेळकाढूपणा करण्याचा धंदा आहे. त्यामुळे महिलांना या दर्ग्यात प्रवेश करण्यावाचून फार जास्त काळ आता रोखता येणार नाही. असो अता अन्य मंदिरांच्याबाबतीत असे व्हायला पाहिजे. राजस्थानच्या पुष्कर शहरातील कार्तिकेय मंदिरातील गाभार्यातसुद्धा महिलांना प्रवेश नाही. हे मंदिर प्रसिद्ध ब्रह्मा मंदिराजवळ आहे. या मंदिरात ब्रह्मचारी कार्तिकेय यांची पूजा केली जाते. त्यामुळे येथे महिलांना प्रवेश नाही. महिलांनी जर मंदिरात प्रवेश केला तर कार्तिकेय कोपतात, असा येथे समज आहे. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये असलेल्या पद्मनाभस्वामी मंदिरातही महिलांना प्रवेश नाही. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. येथे महिला गेल्या तर भगवान विष्णूंचा कोप होतो, अशी समजूत आहे. केरळच्या सबरीमाला या सर्वात प्राचिन मंदिरापैकी एक असलेल्या मंदिरात शेकडो वर्षांपासून १० ते ५० वयोगटातील महिलांना सबरीमाला श्री अयप्पाचे दर्शन घेण्यावर बंदी आहे. १० ते ५० वर्ष वयोगटातील महिलांना मासिक पाळी येते. त्यामुळे मंदिर अपवित्र होते. या कारणाने या वयोगटातील महिलांना मंदिराच्या गाभार्यात प्रवेश नाही. कोणत्याही धार्मिक स्थळाच्याबाबतीत असलेल्या या सर्व प्रथा व समजुतींना तिलांजली देऊन कोणत्याही लिंगाचा भेद न करता ही प्राथर्नास्थळे सर्वांसाठी खुली झाली पाहिजेत.

0 Response to "समानतेचा पुकार"
टिप्पणी पोस्ट करा