संपादकीय पान शुक्रवार दि. ०८ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कायद्यापुढे सर्व समान
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या १३ वर्षांपूर्वीच्या हिट अँड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला अखेर पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल एक महत्वपूर्ण ठरला आहे. यापूर्वीही अशा प्रकारे झालेल्या एका खटल्याच्या निकालाचा दाखला देत न्यायमूर्तींनी हा निकाल दिला. सलमानला शिक्षा होईल किंवा नाही यासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचा सट्टा लागला होता. तसेच सलमान खान जेलमध्ये गेल्याने चित्रपट उद्योगांचे २०० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. सलमान खान हा सेलिब्रिटी असल्यामुळे त्याला शिक्षा होणार नाही व तो यातून सहीसलामत सुटेल असा अनेकांचा होरा होता. मात्र न्यायमूर्ती डी. डब्ल्यू देशपांडे यांनी सलमानला दोषी ठरविले त्यावेळीच आता बहुदा बॉलिवूडचा हा लोकप्रिय अभिनेता जेलमध्ये जाणार हे नक्की झाले होते. कारण या प्रकरणी दोषी ठरल्यास जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. कोर्टाने सलमानाला दोषी ठरविल्यानंतर कोर्ट रुममध्येच त्याला रडू कोसळले. तो घामाघूम झाला. त्यावेळी त्याची बहीण अर्पिताही ओक्साबोक्सी रडू लागली. चित्रपटात देदणादण हाणामारी करणारा हा अभिनेता या निकालाने पार ढासळून गेला. त्याच्या आईची प्रकृती खालवली आहे. सदोष मनुष्यवधाच्या या प्रकरणात तीन ते दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने काय निकाल लागतो? याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. कोर्टात सलमानचा भाऊ अरबाज खान, सोहेल खान, वडील सलीम खान, बहिण अर्पिता आणि आमदार बाबा सिद्दीकी हे होते. सेशन कोर्टात दोषी ठरविण्यापूर्वी त्याच्या शिक्षेच्या निर्णयासंदर्भात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. मात्र न्यायलयाने दोषी ठरविताच सलमानला कोर्टातच पोलिसांनी ताब्यात घेतले. सलमानला वाचविण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न त्याच्या वकिलांनी केला. यासाठी त्याच्या अमेरिकेत झालेल्या ऑपरेशनचे दाखले देण्यात आले. तसेच त्याने आजवर केलेल्या समाज उपयोगी कामांची जंत्री सादर करुन सलमानला शिक्षेत सुट द्यावी असे सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. सर्वसामान्यांना कायदा वेगळा व सेलिब्रिटींसाठी कायद्यात सूट असे नाही, ही खूणगाठ न्यायमूर्तींनी आपल्या आपल्या मनात पक्की केली होती. त्यामुळे एवढा दबाब असूनही न्यायमूर्तींनी एक त्रयस्त्र म्हणून हा निकाल दिला. कोर्टाचे कामकाज सुरू झाले त्यावेळी न्यायाधीश डी. डब्ल्यू देशपांडे यांनी सलमानला तुमच्यावरील सर्व आरोप सिद्ध होत असल्याचे सांगत तुमचे म्हणणे काय असे विचारले. त्यानंतर त्याने वकीलाकडे पाहिले. कोर्टाने त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते असे सांगितल्यानंतर वकील श्रीकांत शिंदे यांनी त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कमीत कमी दोन वर्षांची शिक्षा द्यावी असा युक्तीवाद केला. सलमान खानला वाचविण्यासाठी वकिलांची मोठी फौज उभी करण्यात आली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे १३ वर्षापूर्वी घडलेले हे प्रकरण गेल्या दोन वर्षात झपाट्याने न्यायालयापुढे आले होते. ऐवढे काळ ही केस का उभी राहिली नाही याचाही विचार झाला पाहिजे. एवढे वर्षे रेंगाळलेली ही केस म्हणजे आता सलमान खान सुटण्याची चिन्हे आहेत, अशीच चर्चा होती. सलमानच्या वकिलांनी तो सुटावा यासाठी बरीच फिल्डिंग लावली होती. यासाठी बरेच युक्तीवाद करण्यात आले. सलमान गाडी चालवित नव्हता यापासून ते सकाळी अपघातग्रस्त गाडी उचलायला आलेल्या क्रेनने दिलेल्या धक्यात मृत्यू झाला, सलमानच्या गाडीने धडक दिल्याने झाला नाही, असे अनेक युक्तीवाद करण्यात आले. मात्र सलमानच्या रक्तात अल्कोहल आढळले होते. त्याचबरोबर जे साक्षी पुरावे सादर करण्यात आले त्यातील लोकांनी ड्रायव्हरच्या जागी सलमानच बसला होता असे ठणकावून सांगितल्याने सलमानच्या वकिलांनी उभे केले सर्व बनावट पुरावे खोटे ठरले. या निकालाच्या निमित्ताने समाजात एक प्रतिष्ठीत म्हणून वावरत असलेल्या या सेलिब्रेटिंसाठी एक चांगलाच धडा घालून देण्यात आला आहे. कायद्यापुढे या देशातील प्रत्येक नागरिक समान आहे, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, श्रीमंत असो वा गरीब, हे या निकालाने दाखवून दिले आहे. पैशाच्या जीवावर कुणीही कायद्यावर मात करु शकत नाही. त्यादृष्टीने विचार करता हा निकाल एक क्रांतीकारी ठरावा. गुन्हेगार हा कोणीही असो त्याला कायद्यानुसार जी शिक्षा आहे ती झालीच पाहिजे. आपल्या लोकशाहीची पाळेमुळे जी घट्टपणे रुजली आहेत ती अशा निकालांमुळे आणखीनच मजबूत होतील, यात काहीच शंका नाही. सलमान खानच्या अगोदर संजय दत्तलाही अशाच दिव्यातून जावे लागले. ९२ सालच्या खटल्यातील तो अरोपी होता. त्याने त्यावेळी शस्त्रे अजाणतेपणे आपल्याकडे ठेवली असा युक्तीवाद करण्यात आला होता. परंतु कायद्याचे ज्ञान नसणे ही पळवाट ठरु शकत नाही, हे सिद्द झाले आणि संजय दत्तसारख्या सेलिब्रेटिलाही जेलची हवा खावी लागत आहे. संजय दत्त आता पाठोपाठ सलमानला जेलमध्ये जावे लागले आहे. त्यावरुन आपल्याकडील सेलिब्रेटी किती निष्काळजीपणाने व बेदरकारीने वागतात हे पहायला मिळते. पैशाच्या जोरावर व आपल्या चाहात्यांमुळे आपण काही करु शकतो असा त्यांचा भ्रम झालेला असतो. या भ्रमाचा भोपळा अखेर फुटतोच. आपण लोकप्रियतेच्या शिखरावर असताना कशा प्रकारे वागले पाहिजे, समाजात वावरताना आपली प्रतिमा कशी जपली पाहिजे याबाबत या सेलिब्रेटींनी आत्मपरिक्षण केल्यास बरे होईल.
----------------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा