-->
स्वागतार्ह निर्णय

स्वागतार्ह निर्णय

संपादकीय पान शनिवार दि. २० ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्वागतार्ह निर्णय
मुंबईतील हिरानंदानी या प्रसिध्द रुग्णालयात किडणी रॅकेट आढळल्यावर सर्वच ठिकाणचे अवयवरोपण करण्याची ऑपरेशन बंद पडली होती. प्रामुख्याने मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांना कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी होती. हे काम आमचे नाही असे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितल्याने सर्वच कामे ठप्प झाली होती. त्यामुळे यासाठी नवीन कायद्याची चौकट तयार करणे आवश्यक झाले होते. आता मुत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक होण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यासाठी येत्या १५ दिवसात त्याची नियमावली तयार करण्याचे काम केले जाणार आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्हच म्हटला पाहिजे. मुत्रपिंड दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करून ऑनलाईन माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रिानंदानीतील हे रॅकेट उघड झाल्यावर मुंबईतील युरोलॉजीस्ट आणि नेफ्रॉलजीस्ट संघटनांच्या सदस्यांनी भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आपली व्यथा मांडली होती. मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि एकुणच अवयदान प्रक्रिया अधिक सुलभ, सुटसुटीत होण्यासाठी आरोग्य विभागातर्फे रुग्णांमध्ये आणि अवयव दात्यांमध्ये अधिक जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न  केले जात आहेत. ज्या रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे तेथे एक विशेष कक्ष तयार करून मुत्रपिंड दाता आणि ते स्विकारणार्‍या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांना मुत्रपिंड शस्त्रक्रियेची माहिती, परिणामाविषयी ध्वनीचित्रफित दाखविण्यात येईल. तसेच किडनी दाता आणि स्विकारणारा रुग्ण यांच्याकडून संमतीपत्र देखील तयार करून घेण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया या विशेष कक्षात इन कॅमेराहोणार आहे. मूत्रपिंड दात्याची ओळख पटविण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून त्यामाध्यमातून दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही प्रक्रिया ऑनलाईन करून त्याद्वारे मूत्रपिंड दात्याची माहीती, मुत्रपिंड स्विकारण्यार्‍या रुग्णाची माहिती, शस्त्रक्रिया झाल्याची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये संकलीत होईल व ती माहीती ऑनलाईन करण्यात येईल, या प्रक्रियेच्या माध्यमातून मुत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. संबंधित रुग्णालयांकडून शस्त्रक्रियोत्तर माहिती घेऊन मुत्रपिंड दात्याची शस्त्रक्रियेनंतर तपासणी करून खात्री करण्यात येईल. राज्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ७५ रुग्णालयांना परवाने देण्यात आले असून यकृत प्रत्योरपणासाठी २१, हृदय प्रत्योरोपणासाठी सात आणि फुफ्फुसाच्या प्रत्यारोपणासाठी पाच रुग्णालयांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यारोपणाच्या कायद्यात बदल करण्याची तसेच या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची आवश्यकता वेळोवेळी व्यक्त झाली होती. परंतु याकडे कुणीही लक्षे दिले नव्हते. आता मात्र यासंबंधीचे एक मोठे रॅकेट उघड झाल्याने या कायद्याची आता गरज भासू लागली. निदान आता तरी वाईटातून काही चांगले होईल असे दिसते.
-----------------------------------------------------

0 Response to "स्वागतार्ह निर्णय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel