-->
महागाईचा चढता आलेख

महागाईचा चढता आलेख

संपादकीय पान शनिवार दि. २० ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
महागाईचा चढता आलेख
नरेंद्र मोदी सरकारच्या काळात महागाई कमी करुन अच्छे दिन आणण्याचे जरी आश्‍वासन देण्यात आले होते, तरी हे काही प्रत्यक्षात उतरलेले दिसत नाही. कारण महागाईचा आलेख सध्या चढताच दिसत आहेे. जसजसे सध्या सणांचे दिवस जवळ येऊ लागले आहेत तसा महागाईचा हा आलेख चढू लागला आहे. त्यामुले यंदा चांगल्या पावसाळ्यामुळे सणासुधीचा हंगाम चांगला जाणार असे चित्र असले तरी प्रत्यक्षात मात्र लोकांच्या खिशाला चांगलीच काट लागणार आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर जुलैमध्ये २३ महिन्यांतील उच्चांकी म्हणजे ३.५५ टक्क्यांवर गेला आहे. सर्वच भाज्या, डाळी आणि साखर या चीजवस्तू महागल्या आहेत. किंमत वाढीचा वार्षिक दर प्रतिबिंबित करणार्‍या डब्ल्यूपीआयवर आधारित महागाईचा दर जूनमध्ये १.६२ टक्के होता. फक्त ऑगस्ट २०१४ मध्ये डब्ल्यूपीआयवर आधारित महागाईचा दर ३.७४ टक्के होता. डब्ल्यूपीआयवरील भाज्यांचा महागाईचा दर तब्बल २८.०५ टक्के इतका भडकला असून डाळींचा दर तर ३५.७६ टक्क्यांवर गेला आहे. रोजच्या वापरातील आवश्यक भाजी व बटाटयाच्या दरात महिन्यात ५८.७८ टक्के वाढ झाली आहे. साखरेच्या दरातील महागाईची वाढ ३२.३३ टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेले दोन वर्षे सारखेच्या किंमती नवीन निचांकावर होत्या. आता मात्र त्यांनी चांगलीच भरारी घेतली आहे. एकूण खाद्यपदार्थाच्या महागाईचा दर दुहेरी आकड्याातील असून वाणिज्य मंत्रालयानेच ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ही आकडेवारी सरकारीच आहे, कुणा विरोधी प७ाने प्रसिद्द केलेली नाही. त्यामुळे महागाई नियंत्रणात असल्याचा नरेंद्र मोदी यांचा लाल किल्यावरील भाषणातील दावा किती पोकळ होता हे स्पष्ट दिसते. आता महागाईचा दर वाढल्यामुळे रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. एकीकडे घाऊक महागाई भडकली असतानाच खरिपाच्या पेरण्यांचा कल पाहता येत्या काही महिन्यांत खाद्यपदार्थाची महागाई कमी होईल, असे संकेत मिळत आहेत. मात्र नजीकच्या भविष्यात व्याजदर कपातीची शक्यता नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र या महागाईच्या वाढत्या दरामुळे उत्पादन क्षेत्र व कृषी उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र गृहिणींसाठी ही वाईट बातमी आहे. मागणी-पुरवठा यातील विसंगतीमुळे निर्माण होणार्‍या प्रश्नांचे तातडीने निराकरण होणे गरजेचे असल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे. घाऊक किमतींवर आधारित महागाई आणखी वाढल्यास महागाईचा फटका गृहिणी आणि ग्राहकांना अत्यंत वाईट पद्धतीने बसणार आहे. सरकारकडून आता मागणी व पुरवठयाशी संबंधित पेच सोडवण्यासाठी कठोर कृतीची आवश्यकता आहे. उत्पादन क्षेत्र आणि उत्पादकांना घाऊक किमतीतील वाढीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे, कारण यापूर्वी त्यांच्या किमतीचा नफ्यावर परिणाम होत होता. आता मात्र वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहकांना बुरे दिनचा सामना करावा लागणार आहे हे नक्की.

0 Response to "महागाईचा चढता आलेख"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel