-->
रिओतील सुल्तान

रिओतील सुल्तान

संपादकीय पान शुक्रवार दि. १९ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रिओतील सुल्तान
सुप्रसिध्द अभिनेता सलमान खान याचा अलिकडेच सुल्तान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला होता. यात सलमानभाई कुस्तीवीर दाखविण्यात आला आहे व तो मोठ्या प्रयत्नाअंती ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक जिकतो. या चित्रपटाची आठवण यावी असा प्रसंग रिओ ऑलिंम्पिकमध्ये महिला कुस्तिवीर साक्षी मलिकने घडविला आहे. साक्षीला ५८ किलो गटातील कांस्य पदकाची कमाई झाली व तिने आजवर रिओ ऑलिंम्पिकमध्ये शून्यावर असलेल्या भारताचे पदकांचे खाते उघडून नवा इतिहास रचला. त्याचबोरबर भारतासाठी पदक जिंकणारी साक्षी पहिली महिला पैलवान झाली आहे. हरयाणातील (सुल्तानमध्ये सलमान खान हा देखील हरयाणातीलच दाखविण्यात आला आहे) एका सर्वसाधारण घरात जन्मलेल्या साक्षीला बालपणापासून कुस्तिगीर होण्याची इच्छा होती. तिचे आजोबा हे पैलवान होते. मात्र तिच्या आईला आपल्या मुलीने पैलवान होऊ नये असे मनोमनी वाटे. कारण पैलवानांना बुध्दी कमी असते अशी तिच्या आईची ठाम धारणा होती. मात्र तीने आईचे हे मतही खोटे ठरविले. एकीकडे चांगली बुध्दीमत्ता कमविलीच व पैलवानाची परंपारही जपली. तिच्या घरात आखाड्याची परंपरा होती. त्यामुळे साक्षीवर बालमनापासूनच पैलवानगिरीचे संस्कार होत होते. तिचे वडील सुखबीर मलिक हे मात्र या पैलवानगिरीपासून चार हात दूरच राहिले. ते दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये  कंडक्टरची नोकरी करतात. तर आई रोहतक येथे बालवाडीत काम करते. अशा प्रकारे जमतेम आर्थिक स्थिती असलेली साक्षीने केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर देशाच्या नावाने पदक खेचून आणले आहे. तिने आज साक्षीने किर्गिस्तानच्या ओसूलू तोयेबेकोवाला अत्यंत अटीतटीच्या लढतीत ७-५ असे पराभूत केले. पहिल्या हाफमध्ये साक्षी ०-५ अशी पिछाडीवर पडली होती. मात्र उत्तरार्धात प्रथम ४ गुण त्यानंतर १ गुण मिळवत बरोबरी साधली. सामना संपण्यास केवळ १० सेकंद शिल्लक असतांना ३ गुणांची कमाई करत साक्षीने कांस्यपदकावर नाव कोरले. रेपीचेजमुळे मिळालेल्या पहिल्या संधीचे सोने करीत साक्षी मलिकने तिची प्रतिस्पर्धी मंगोलियाच्या ओरखोन पूरेवडोजला चारी मुंड्या चीत करीत बाजी मारली. पहिल्या लढतीत साक्षीने मलिकने स्वीडनच्या जोहाना मालिन मॅटसनशी जोरदार चढाई करीत सामना २-९ असा जिंकला होता. त्यानंतर उपउपांत्यपूर्व लढतीत साक्षी मलिकची लढत माल्दोवाची मारियाना चारदिवारा एसानू हिच्यासमवेत झाला. उपांत्यपूर्व लढतीत रशियाची वेलेरिया कोबलोवाशी झाली. या लढतीत वेलेरियाने साक्षीवर मात ५ - ४ अशी मात केली. १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्तीत पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले. त्यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर भारताला पदकासाठी २००८ पर्यंत प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने कांस्यपदक पटकावले. भारताचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे कांस्यपदक ठरले. त्यानंतर २०१२ मध्ये सुशीलने भारतासाठी रौप्यपदकाची कमाई केली. याच वेळी योगेश्वर दत्त हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. त्यानंतर आता रिओत साक्षी मलिक कांस्यपदकाची मानकरी ठरली.
-------------------------------------------------------

0 Response to "रिओतील सुल्तान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel