-->
नवीन दंड आकारणी

नवीन दंड आकारणी

संपादकीय पान बुधवार दि. १० ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
नवीन दंड आकारणी
केंद्र सरकारने नवीन मोटार व्हेईकल सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. यानुसार, वाहन विषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधठी कडक दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे करण्यामागे सरकारचा उद्देश चांगला असला तरीही यात त्यांना अतिम कितपत यश येईल याची शंका वाटते. कारण आता नवीन नियमांनुसार दंडाची रक्कम फार मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. यामुळे लोकांमध्ये मोठी नाराजी पसरण्याचा धोका आहे. त्याचबरोबर जादा दंड आकारला जाणार त्यापेक्षा नियम न तोडलेला बरा असे म्हणून नियम पालण्याची संख्या कमीच असेल, असे दिसते. वाहन चालवताना परवाना नसल्यास थेट हजार रुपये दंडवसुली, वाहनाचा विमा नसल्यास हजार रु. दंड, छोटे वाहन वेगाने हाकल्यास हजार रु. दंड, हलक्या वाहनास हजार रु., दारूच्या नशेत किंवा अतिरिक्त सेवन करून वाहन चालवल्यास १० हजार रु. दंड, हेल्मेटविना वाहन चालवल्यास हजार रु. दंड व वाहन परवाना महिन्यांसाठी निलंबित, सीटबेल्टशिवाय कार चालवल्यास हजार रु. दंड, वाहतुकीचे नियम मोडल्यास ५०० रु. तर वाहतूक नियंत्रण अधिकार्‍याशी असहकार केल्यास हजार रु. दंड अशा तरतुदी आहेत. सध्याच्या दंडांचा विचार करता ही रक्कम काही ठिकाणी दहा पटीने जास्त आहे तर काही ठिकाणी कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे एक बाब होणार आहे की, दंडाची रक्कम वाढल्यामुळे पोलिसांना लाच द्यायची रक्कम मात्र वाढणार आहे. पूर्वी एखादा गुन्हा केल्यास १०० रुपये पोलिसाच्या हातावर ठेवून नियम तोडणारे सहज सुटत होते. आता पोलिस या गुन्हेगारांना जरुर पकडतील मात्र त्यांच्याकडून १०० नव्हे तर जास्त पैसे घेतील. कारण आता अधिकृत दंड वाढला आहे. त्यामुळे या नियमांची अंमलबजावणी कितपत यशस्वी होईल याची शंका वाटते. जर त्यासोबत सर्वत्र कॅमेरे लावून सर्व रस्ते जर कॅमेर्‍याच्या नजरेत आणले तर मात्र पोलिस पैसे खाऊ शकणार नाहीत हे देखील वास्त आहे. परंतु हे करण्यासाठी आपल्याकडे अजूनही बराच काळ जाईल. तोपर्यंत तरी पोलिसांचे फावणार आहे. त्यामुळे सरकारची नवीन दंड आकारणीमागचा उद्देश कितीही चांगला अशला तरीही ते यशस्वी होणार नाही. सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात दरवर्षी सरासरी पाच लाख रस्ते अपघातात सुमारे दीड लाख ललोकांचा मृत्यू होतो. अर्थातच हे आपघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे वाहतूक नियमांचे पालन न करणे व अवास्तव वेगाने वाहन चालविणे. आपल्या तुलनेच विदेशातील अपघातांचे प्रमाण व लोक अपघातात मृत्यू पावण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. येथे केवळ नियम कडक नाहीत तर तेथील लोकांची नियम पाळण्याची मानसिकताही आहे. तेथे मुलांना यासंबंधी बालपणापासून संस्कार केले जातात. आपल्याकडे याचाच नेमका अभाव आहे. आपल्याकडे असलेला नियम कसा तोडावा यासाठी अहंममहिका लागते. यात आपण काही अपराध करतो असे कुणाला वाटतही नाही. त्यामुळे एकीकडे कडक नियम व त्याजोडीला नागरिकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे.

0 Response to "नवीन दंड आकारणी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel