-->
चित्रकारांचे सुवर्णयुग संपले

चित्रकारांचे सुवर्णयुग संपले

संपादकीय पान मंगळवार दि. २६ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
चित्रकारांचे सुवर्णयुग संपले 
प्रतिभावान चित्रकार, पुरोगामी व्यक्तिमत्व सय्यद हैदर रझा यांचे नुकतेच दिल्लीत ९४व्या वर्षी निधन झाले. चित्रकलेतील बंडखोरी अधोरेखीत करणारे रझा हे काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे आता अस्तित्व संपले आहे. कारम या पुरोगामी ग्रुपमधील ते शेवटचे सदस्य शिल्लक राहिले होते. या ग्रुपचे सदस्य असलेले सुझा, आरा, बाक्रे, हुसेन, गाडे आणि आता रझा हे सर्व काळाच्या पडद्याआड गेले आहेत. या चित्रकारांचे एक सुवर्णयुग होते. त्यांनी त्याकाळी ज्या कलाकृती केल्या त्या पुन्हा होणे नाहीत असे आजचे चित्रकारही प्रमाणिकपणे मान्य करतात. रझा यांनी तर बिंदू ही संकल्पना विकसीत केली. त्या बिंदू भोवती त्यांची बहुतांशी चित्रांच्या कल्पना बेतल्या गेल्या. त्यांच्या चित्रातून चैतन्याचा झरा दिसे. त्यातून त्यांची चित्रे ही बोलकी होत. जगाने त्यांच्या चित्रांचे कौतुक केले. जगातिक चित्रांच्या प्रदर्शनात गेल्या ५० वर्षात रझा यांचे चित्र आढळणार नाही असे झाले नाही. त्यामुळेच त्यांचे प्रदीर्घ काळ वास्तव्य हे चित्रकरांचे माहेरघर असलेल्या पॅरिसमध्ये होते. मात्र त्यांना आपली मायभूमीची ओढ होती. यातून ते मायदेशी परतले होते. मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यात जन्मलेल्या या अवलीयाला आपला अंतही मायभूमीत व्हावा ही त्यांची इच्छा होती. तेथे आपल्या वडिलांच्या कबरीच्याच शेजारी चिरनिद्रा मिळावी अशी त्यांची इच्छा. रझा यांचे आणखी एक वैशिष्ट्‌य म्हणजे अगदी अलिकडे आजारी पडेपर्यंत त्यांनी शेवटपर्यंत विविध कलाकृती निर्माण केल्या. त्यांची चित्रे ही जशी बिंदू भोवती केंद्रीत झालेली असत तशीच ती बोलकी असत.  एकदा त्यांनी चित्र काढले व त्या खाली लिहले, मॉँ मै लौट रहा हू... अणि ते भारतात परतले. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्‌य म्हणजे त्यांनी अब्जावधी रुपये कमविले परंतु आपल्या गरजेपुरता पैसा ठेवून त्यांनी आपली सर्व संपत्ती त्यांनी फाऊंडेशनमध्ये जमा केली. यातून तरुण चित्रकारांसाठी पुरस्कार व आवश्यक ती मदत केली जाते. रझा आज आपल्यातून गेले असले तरी त्यांनी केलेली चित्रे अजरामर राहाणार आहेत. आपण येताना काही घेऊन आलो नाही, मात्र जाताना चित्रांच्या रुपाने ठेवा या जगासाठी मगे ठेवणार आहोत असे ते एकदा म्हणाले होते. त्यांनी हा शब्द खरा करुन दाखविला आहे.

Related Posts

0 Response to "चित्रकारांचे सुवर्णयुग संपले "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel