-->
झपाट्याने विस्तारी ऑनलाईन बाजारपेठ

झपाट्याने विस्तारी ऑनलाईन बाजारपेठ

संपादकीय पान मंगळवार दि. २६ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
झपाट्याने विस्तारी ऑनलाईन बाजारपेठ
इंटरनेमुळे होणारी क्रांती येत्या दशकातील सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे. यामुळे जग एवढे जवळ आले आहे की, काही क्षणात आपण जगातील कोणतीही माहिती मिळवू शकतो. मोबाईल आणि इंटरनेट यांचा मिलाफ झाल्यावर तर जगात अनेक बाबी सोप्या झाल्या आहेत. सर्वच व्याख्यांचा नव्याने विचार आपल्याला आता करावा लागणर आहे. इंटरनेटमुळे विकसीत देशातील खप कमी होऊन त्यांचा वाचक डिजिटल झाला आहे. सध्या विकसीत देशात केवळ पन्नाशी पार केलेले लोकच वृत्तपत्रे विकत घेऊन वाचतात. सर्व तरुण पिढी ही मोबाईलवर वृत्तपत्रे वाचते. अर्थात आपल्याकडे ही परिस्थिती यायला अजून आवकाश आहे. परंतु मोबाईल व इंटरनेचा वाढत असलेला प्रभाव पाहता ही बाब आता फारशी दूर राहिललेली नाही, हे वास्तवही आपण आता स्वीकारले पाहिजे. झपाट्याने बदलत गेलेली ऑनलाईन बाजारपेठ हे देखील जगातील एक नवा कल आहे. आज तुम्ही जगातील कोणतीही बाब जी दुकानात उपलब्ध होते ती ऑनलाईन मिळू शकते. कपड्यांची बाजारपेठ देखील गेल्या काही वर्षात झपाट्याने ऑनलाईनच्या दिशेने गेली. कारण असे म्हटले जायचे की, स्त्रियांना खरेदी करण्यात व वस्तूंची घासाघीस करुन खरेदी करण्याचा जो आनंद असतो तो ऑनलाईनमध्ये मिळत नाही. परंतु बाजारापेक्षा स्वस्त माल जर ऑनलाईन बाजारपेठेत उपलब्ध असला तर घासाघीस करण्याचा प्रश्नच कशाला उपस्थित होतो, असा सवाल आहे. भाज्या खरेदी देखील आता ऑनलाईन सुरु झाली आहे व त्याला प्रतिसाद वाढत चालला आहे. सध्या शहरात ही लोकप्रिय आहे. येथे अनेकदा नोकरी करणारी महिला असले तर तिला भाज्यांची ऑनलाईन खरेदी फरा मोठी उपयोगी ठरणारी आहे. गेल्या काही महिन्यात भाज्या या बाजारपेठांमध्ये महाग झाल्या होत्या. मात्र ऑनलाईन भाजी खरेदीचे दर हे तुलनेने कमी होते. सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन भाजी पहिल्यांदा खरेदी करणार्‍यांपैकी ८५ टक्के लोक पुन्हा खरेदी करण्यास येतात. याचच अर्थ स्पष्ट आहे की, त्यांना ऑनलाईन भाजी खरेदी पसंत पडली आहे. सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपविली आहे. अशा वेळी ऑनलाईन खरेदी करणार्‍या कंपन्या हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. सध्या या कंपन्या शेतकर्‍यांकडून थेट माल उचलून ग्राहकापर्यंत पोहोचवित आहेत. अशा वेळी शेतकर्‍यांनाही त्यांची योग्य विक्री किंमत मिळते व ग्राहकांनाही स्वस्तात भाजी उपलब्ध होते. मुंबईसारख्या महानगरात तर भाजी केवळ नुसतीच नव्हे तर ती व्यवस्थीत नीट करुन विकल्यास ग्राहकांना त्याचा मोठा उपयोग होईल. हे सर्व पाहता येत्या काही वर्षात बाजारपेठेच स्वरुपच बदलत जाणार आहे. निदान मोठया शहरात तरी पहिल्यांदा हे स्वरुप बदलेल व नंतर लहान-मध्यम आकारांच्या शहरात या बाजारपेठा बदलतील. सध्याच्या बाजारपेठांची जागा ऑनलाईन बाजारपेठेने बळकाविल्यास त्याचे आश्चर्य वाटता कामा नये अशा तर्‍हेने हा बदल होत आहे.
----------------------------------------------------

Related Posts

0 Response to "झपाट्याने विस्तारी ऑनलाईन बाजारपेठ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel