-->
धोका वाढतोय...

धोका वाढतोय...

12 मार्चसाठी अग्रलेख धोका वाढतोय... कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू ल
ागल्याचे दिसू लागले आहे. गेल्या महिन्याभरात प्रामुख्याने कोरोना रुग्मांची संख्या अचानकपणाने वाढू लागली आहे. अर्थांत यात आश्चर्य वाटण्यासारखे असे काहीच नाही. कोरोना वाढतोय याचे कारण आपल्या सर्वांचीच सुरु झालेली बेफिकीरी. गेले काही काळ अनेक लोक जनतेत सहजतेने विना मास्क फिरताता दिसत होते, अनेक ठिकाणी जाहीर कार्यक्रम सुरु झाले आहेत. ज्यावेळी गर्दी वाढणार त्यावेळी कोरोना पसरण्याचे प्रमाण पुन्हा वाढणारच हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोना संपला असे गृहीत धरुन लोकांनी आपले जनजीवन पुन्हा सुरु केले. परंतु जनजीनव सुरु करताना जी खबरदारी घेण्यास सरकारने प्रत्येकाला सांगितले होते, त्याचा विसर सर्वांनाच पडला आहे. लॉकडाऊन उठवताना सरकारने अजून तरी काही काळ त्रिसुत्री अंमलात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले होते. ही त्रिसुत्री म्हणजे, मास्कचा वापर, दोघांतील अंतर पाळणे व हात सतत धुणे. तसे न केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल व लॉकडाऊन लादावे लागेल असा इशारा सरकारने दिला होता. परंतु लॉकडाऊनच्या काळात कंटाळलेल्या जनतेने काम सुरु केल्यावर पुन्हा एकदा मनमानी कारभार सुरु केला. अजूनही आवश्यकता नाही तिकडे जाणे टाळले पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाही. त्यामुळे गर्दी असलेल्या शहरात कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. अजूनही ग्रामीण भागात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नाही परंतु असे असले तरीही रायगड जिल्ह्यात दररोज शंभरांच्या संख्येने रुग्ण वाढत चालले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भाग अलिकडेच कोरोनामुक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता अचानक रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सध्या लग्न समारंभ, विविध राजकीय तसेच अन्य कार्यक्रम याला पुन्हा सुरुवात झाली असून पूर्वीप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरु झाली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणम म्हणून रुग्णसंख्या आता वाढू लागली आहे. त्याचबरोबर आता उन्हाळा वाढला असून यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या वर्षी देखील उन्हाळ्यात कोरोनाचा प्रभाव वाढला होता. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घेणे, कोरोनाच्या तपासण्या वाढविणे व लसीकरणाला वेग देणे या तीन बाबी करण्याची आवश्यकता कोरोनावरील टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. अमेरिका, ब्रिटनसह संपूर्ण युरोप हे प्रदेश समशीतोष्ण प्रदेश असून तेथे थंडीत करोना वाढला तर उन्हाळ्यात कमी झाला. आपल्याकडे नेमकी उलटी स्थिती आहे. उन्हाळ्यात आपल्याकडे रुग्ण वाढत चालले असून थंडीत हे प्रमाण कमी झाले होते. गेले काही दिवस राज्यात दररोज सरासरी बारा हजाराच्यांवर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत व ही चिंतेची बाब ठरावी. मुंबईसारख्या महानगरात हजाराच्या वर दररोज रुग्ण सापडत आहेत. गेले काही दिवस राज्यासह देशातील काही भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली असून सरकारला त्यावर कसे उपाय योजायचे हा प्रश्न पडला आहे. लोकांचे दैनंदिन जिवन आता बंद करुन पुन्हा सर्वांना गेल्या वर्षीप्रमाणे घरी बसविता येणार नाही. यात सरकारचे व जनतेचे असे दोघांचेही मोठे नुकसान आहे. गेल्या काही दिवसात सरकारने कोरोनाच्या चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे हे खरे असले तरीही अजूनही कोरोनाची स्थिती आटोक्याबाहेर गेलेली नाही. सर्वात समाधानाची बाब म्हणजे, कोरोनामुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्या घटलेली आहे. सध्या बरेचदा संस्थात्मक क्वारंटाईन करण्याएवजी घरीच व्यवस्था केली जाते. परंतु घरी असलेला रुग्ण सर्व नियम काटेकोरपणे पाळत नाही असे आढळले आहे. त्यामुळे कोरोनाच्या कृती दलाने घरच्या एवजी संस्थात्मक विलगीकरणाची गरज प्रतिपादन केली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनावरील लस आता बाजारात आल्याने आपल्याकडे कोरोनाविरोधात लढण्याचे एक महत्वाचे अस्त्र हाती आली आहे. त्याचा वापर जोरदारपणे करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याकडील लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. सध्या मुंबईसारख्या महानगरात दररोज ४८ हजार ज्येष्ठांना लस दिली जात आहे. येत्या काही काळात लस देणाऱ्या रुग्णालयांच्या संख्येत वाढ वाढ करुन तसेच २४ तास लसीकरण करुन दररोज एक लाख लोकांना लस दिण्याचे ठरविले जात आहे. याला केंद्राचा अद्याप हिरवा कंदील लाभलेला नाही. सध्या मुंबईत ४० लाख ज्योष्ठ नागरिक आहेत व त्यातील केवळ दहा लाखांचे लसीकरण झाले आहे. परंतु रोज एक लाख लोकांना लस दिल्यास लसीकरणाचा वेग वाढेल व एकदा ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले की तरुणांच्या वयोगटातील लसीकरण सुरु होईल. लसीकरण झाल्यावरही निर्दास्त होता कामा नये, कारण अजूनही कोरोनाची लढाई संपलेली नाही. बहुदा कोरोना पूर्ण नष्ट करण्यासाठी अजूनही दोन वर्षाचा कालावधी लागेल असे दिसते. परंतु दररोजचे कामकाज सुरु ठेवत आपल्याला खबरदारीचे उपाय योजत कोरोनाशी दोन हात करावे लागणार आहेत. कोरोना वाढू लागल्याला आपणच कारणीभूत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कोरोनाशी आपल्याला लढा देताना आपणच आपला विचार केला पाहिजे व योग्य ती खबरदारी घेणे योग्य ठरेल.

0 Response to "धोका वाढतोय..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel