ऑनर किलिंगचा थरार
संपादकीय पान शनिवार दि. २३ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ऑनर किलिंगचा थरार
नवी मुंबईतील स्वप्नील सोनावणे या १५ वर्षीय मुलाची प्रेमप्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी हत्या केल्याचा प्रकार घडल्यावर राज्यभरात खळबळ माजली होती. धक्कादायक बाब म्हणजे स्वप्नीलला धमकावण्यात येत असल्याबाबत त्याच्या वडिलांनी त्याला घेऊन तब्बल दोन वेळा नेरुळ पोलीस ठाणे गाठले होते. मात्र तेथील अधिकार्यांनी त्यांना पिटाळून लावले आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी स्वप्नीलची हत्या केली. या प्रकारानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी नेरुळ पोलीस ठाण्यातील दोन अधिकार्यांना निलंबित केले आहे. तसेच ज्या मुलीवरून हा सगळा प्रकार घडला, तिलाही अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या नेरुळ भागातील एसबीआय कॉलनीत राहणार्या स्वप्नील शहाजी सोनावणे या पंधरा वर्षीय मुलाचे सातवीपासून त्याच्यासोबत शिकत असलेल्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर सोमवारी मुलीच्या दोन भावांनी स्वप्नीलला एसबीआय कॉलनीतून रिक्षात घालून दारावे गावात नेले आणि धमकावून सोडून दिले. यानंतर स्वप्नील आणि त्याच्या वडिलांनी याबाबत नेरुळ पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पिटाळण्यात आले. स्वप्नीलच्या वडिलांनी स्वप्नीलसह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. त्यानंतर ते घरी परतल्यानंतर तिथे आधीपासून मुलीचे नातेवाईक उपस्थित होते. त्यांनी स्वप्नीलच्या आई-वडिलांसह स्वप्नीलला मारहाण करत आपल्यासोबत नेले. तिथे त्यांना माफी मागायला सांगण्यात आले. मात्र त्याचवेळी स्वप्नीलच्या गुप्तांगावर लाथ मारत त्याला जबर मारहाण करण्यात आली. ही मारहाण सहन न झाल्याने स्वप्नीलने जीव सोडला. त्याच्या आई-वडिलांनाही यावेळी मारहाण झाली.
या घटनेनंतर जाग्या झालेल्या पोलिसांनी स्वप्नीलचे प्रेमप्रकरण असलेल्या मुलीसह तिची आई, वडील राजेंद्र नाईक (५०), भाऊ सागर नाईक (२५), साजेश नाईक (२२), दुग्रेश पाटील (२३), आशीष ठाकूर (२२) यांच्यासह एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. यापैकी अल्पवयीन असलेल्या मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. हे सर्व प्रकरण म्हणजे ऑनर किलिंगचा प्रकार आहे. यातील मुलगा हा मागासवर्गीय होता व मुलगी ही वरिष्ठ जातीची होती. यातून हे खून प्रकरण झाले आहे. एवढ्या लहान वयात जमलेले हे प्रेमप्रकरण पाहता खरे तर पालकांनी दोन्ही मुलांना एकत्र बसवून त्यांची समजूत घालू शकले असते. पण तसे झाले नाही. केवळ जातीच्या आधारावर याची जोड लावून व उच्च, निच्च यावर आधारित प्रतिष्ठा जपल्याने एका कोवळ्या मुलाचा जीव गेला आहे. आपण जातीची ही बंधने कधी झुगारणार हा सवाल आहे.
-----------------------------------------------------------

0 Response to "ऑनर किलिंगचा थरार"
टिप्पणी पोस्ट करा