-->
अर्थव्यवस्था वेग कधी घेणार?

अर्थव्यवस्था वेग कधी घेणार?

संपादकीय पान गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अर्थव्यवस्था वेग कधी घेणार?  
देशाची अर्थव्यवस्था सध्या अजून म्हणावा तसा वेग काही घेत नाही. त्यामुळे बेकारीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात आपल्याला भेडसावित आहे. एकेकाळी आपली नऊ टक्यांनी धावणारी अर्थव्यवस्था सात टक्क्यांवर घसरली. अर्थात जागतिक पातळीवरील मंदीचे पडसाद त्याला कारणीभूत होते. या मंदीतच नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठी-मोठी स्वप्ने दाखविली. सध्याच्या सरकारचा अर्धा कालखंड आता संपत आला असला तरी जनतेेच्या जीवनात फारसा काही फरक पडलेला नाही. अच्छे दिन येण्याची काही चिन्हे नाहीत हे लोकांना पटले आहे. त्यात यावेळी दिलासा देणारी महत्वाची बाब म्हणजे चांगला झालेला पाऊस. गेली दोन वर्षे पावसाने दडी मारली होती. आता मात्र यंदा चांगला पाऊस पडल्याने सर्वांनाच हायसे वाटले आहे. यामुळे येत्या काही महिन्यात चांगले पिकपाणी आल्यावर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सरकारने नुकताच केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी वेतन आयोग मंजूर केला आहे. यामुळे या नोकरदारांची क्रयशक्ती वाढणार आहे. जागतिक पातळीवरली महागाईला चालना देणारा महत्वाचा घटक म्हणजे खनिज तेलाचे दर. यंदा हे दर स्थिर राहाण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास सरकारी तिजोरीला मोठी तूट सहन करावी लागणार नाही. त्याच्या जोडीला सोन्याच्या मागणीत फारशी वाढ झालेली नाही. याचा परिमाम म्हणून आयात-निर्यात तूट मर्यादित राहिली आहे. सरकारने आता अनेक क्षेत्र विदेशी गुंतवणुकीसाठी खुली केली आहेत. मात्र प्रत्यक्षात गुंतवणूक किती येते पाहावे लागेल. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांना याचा फटका बसेल, मात्र आपल्याला याचा मर्यादीत फटका बसेल असा अंदाज आहे. आता जी.एस.टी. प्रत्यक्षात उतरायला वेळ असले तरीही त्यादृष्टीने आजवर रखडलेला प्रस्ताव मार्गी लागला आहे. आधार, जनधनसारख्या योजनांमुळे व्यवहारांत पारदर्शकता येऊ लागली आहे. अशा प्रकारच्या सकारात्मक अनेक बाबी आपल्याकडे असल्या तरीही ही संधी सरकार कमावणार की गमावणार हा सवाल आहे. सरकारच्या कार्यक्षमतेचे फलित यातूनच दिसणार आहे.

0 Response to "अर्थव्यवस्था वेग कधी घेणार? "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel