-->
याहूचे अवतार कार्य संपले

याहूचे अवतार कार्य संपले

संपादकीय पान गुरुवार दि. २८ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
याहूचे अवतार कार्य संपले
सध्या तंत्रज्ञान एवढ्या झपाट्याने बदलत आहे की, जो त्या वेगाने आपल्यात बदल करणार नाही त्याला आपला अवतार संपवायला लागणार आहे. आपल्याकडे बैलगाडी जाऊन मोटारी आल्या, रेल्वे आली, विमाने आली, त्याचबरोबर तंत्रज्ञानही झपाट्याने बदलत गेले. टाईपरायटरचेही कार्य असेच संपले. पंधरा वर्षापूर्वी मोबाईल आले त्यावेळी अजून काही वर्षांनी प्रत्येकाच्या हातातील हे खेळणे होईल असे कुणालाही वाटले नव्हते. मोबाईल येण्याच्या अगोदर पेजर आले होते. हे पेजर कधी आले आणि कधी संपुष्टात आले हे समजलेच नाही. अशा प्रकारे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत चालले आहे. या सर्व बाबींची आठवण होण्याचे कारण म्हणजे, याहू ही इंटरनेट काळात सुरु झालेली पहिली कंपनी आता संपली आहे. म्हणजे त्यांनी काळाच्या ओघात आपल्यात बदल न केल्यामुळे आता या कंपनीला व्हेरिझोन कम्युनिकेशन या कंपनीत विलीन व्हावे लागले आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड या विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या जेरी यांग डेव्हिड फिलो यांनी १९९५ मध्ये हे पोर्टल विकसित केले. इलेक्ट्रॉनिक मेल, बातम्या, क्रीडा अशा प्रकारच्या सुविधा आपल्या वापरकर्त्यांना पुरवणार्‍या याहूचा बोलबाला सर्वत्र सुरू झाला. हळूहळू एक स्वतंत्र कंपनी म्हणून याहूने बस्तान बसवले आणि अल्पावधीत इंटरनेट जगतात आपला दराराही निर्माण केला. त्यापाठून आलेल्या जीमेलने त्यांच्यापुढे जबरदस्त मजल मारली. जीमेलने आपल्यात अनेक बदल केले. ग्राहकांना नवीन सुविधा पुरविण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर फेसबुकचा जन्म झाला होता, त्यामुळे सोशल नेटकिर्र्ंगचे युग सुरु झाले. सर्वसामान्यांसाठी व्यक्त होण्यासाठी एक नवीन व्यासपीठ तयार झाले. यातून जनमानसातील कौल उभा करण्यापर्यंत या माध्यमाची मजल पोहोचली. मात्र अशा या पार्श्‍वभूमीवर जीमेनले आपले अस्तित्व केवळ टिकविले नाही तर चांगलीच भरारी घेतली. तर दुसरीकडे याहूची पडझड सुरु झाली. अशा स्थीतीत त्यांना आपले अस्तित्व संपविण्यापेक्षा अन्य एखाद्या कंपनीत विलीन होणे अर्थातच सोयिस्कर वाटत होते. वेब सर्फिंगच्या युगात गुगलने फार मोठी भरारी घेतली हे वास्तव मान्य केलेच पाहिजे. याहू या स्पर्धेत प्रचंड मागे पडली. त्यामुळे त्यांना या स्पर्धेत टिकणे कठीण होत होते. याहूचे अवतारकार्य संपले असले तरीही याहूने जो इतिहास निर्माण केला त्याची निश्‍चितच दखल घेतली जाणार आहे. याहूपासून सध्याच्या काळात या क्षेत्रातील कंपन्यांनी धडा घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

Related Posts

0 Response to "याहूचे अवतार कार्य संपले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel