-->
साबण ते सिमेंट...!

साबण ते सिमेंट...!

संपादकीय पान गुरुवार दि. १४ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
साबण ते सिमेंट...!
वॉशिंग पावडर निरमा...ही टी.व्ही.वरची जाहीरात पाहिली की पांढरे शुभ्र कपड्यातील मुली आपल्या डोळ्यापुढे दिसतात. या निरमा साबणाच्या उत्पादकांनी एकेकाळी साबण निर्मिती उद्योगातील अनेक कंपन्यांच्या नाकी नऊ आणले होते. अगदी हिंदुस्थान लिव्हर व प्रॉक्टर अँड गॅम्बलसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जबरदस्त मुकाबला केला होता. अशा प्रकारे साबण उद्योगात इतिहास घडविणार्‍या निरमानेे आता चक्क सिमेंट निर्मितीत पाऊल टाकले आहे. अर्थात एका झटक्यात नऊ हजार कोटी रुपय्े खर्चुन त्यांनी लाफार्ज या बहुराष्ट्रीय सिमेंट कंपनीची उत्पादन क्षमता खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे साबणापासून सुरुवात केलेल्या या कंपनीने आता आपले विस्तार क्षेत्र सिमेंट उद्योगांवर नेले आहे. कॉर्पोरेट जगतातील हा एक नवा विक्रम  समजला जातो. निरमा या अहमदाबादस्थित सुमारे सात हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या कंपनीने तब्बल नऊ हजार कोटी रुपये खर्च करुन आता सिमेंट उद्योगातील लाफार्ज या कंपनीची उत्पादन क्षमता खरेदी केली आहे. निरमाचा इतिहास म्हणजे शून्यातील विश्‍व उभारणार्‍या करसनभाई पटेलांची ही अनोखी कहानी आहे. निरमाची स्थापना १९६९ साली करसनभाई पटेल यांनी केली. करसनभाई हे एका मध्यम उत्पन्न गटातील शेतकर्‍याचे चिरंजीव. त्या काळी त्यांनी साबणाचा उद्योग सुरु केला, अर्थात ते उत्पादनही स्वत:च घरबसल्या करायचे व साबणाची विक्रीही सायकलवर फिरुन दारोदारी फिरुन करायचे. त्यांच्या मुलीचे नाव आपल्या कंपनीला दिले होते. मात्र दुदैवाने निरमाचे निधन झाले, अर्थात तिच्या नावाने स्थापन केलेली कंपनी अजरामर झाली. निरमाचा कारभार एवढा झपाट्याने वाढला की त्यांनी आपले उत्पादन संपूर्ण देशात विकायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या मालाची कमीत कमी किंमती ठेवण्यावर भर दिला होता. त्यामुळे त्यांच्याकडे मोठी बाजारपेठ आकर्षित झाली होती. सद्या त्यांचा साबणाच्या बाजारपेठेत चक्क ३८ टक्के एवढा सर्वाधिक वाटा आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांनी जबरदस्त स्पर्धा केली व एक भारतीय कंपनी कशा प्रकारे बहुराष्ट्रीय कंपन्यांशी कशा प्रकारे टक्कर देऊ शकते हे दाखवून दिले. त्यानंतर त्यांनी सर्व प्रकारच्या साबणाच्या उत्पादनात तसेच साबणासाठी लागणार्‍या कच्या मालाच्या उत्पादनात पाऊल टाकले. आज या कंपनीकडे १८ हजार कर्मचार्‍यांचा ताफा आहे. त्यांनी गेल्या काही वर्षापूर्वी गुजरातमध्ये सीमेंट प्रकल्प उबारण्याची तयारी केली होती. परंतु जमीन ताब्यात घेण्यात अडचणी निर्माण झाल्याने हा प्रकल्प काही पूर्णत्वास गेला नाही. दोन वर्षापूर्वी त्यांचा राजस्थानातील सीमेंट प्रकल्प सुरु झाला. आता त्यांनी लाफार्ज ताब्यात घेतल्याने सिमेंट उत्पादनातील सहावी मोठी कंपनी झाली आहे. साबण ते सिमेंट अशी निरमाची वाटचाल देशातील उद्योजकांना प्रेरणादायी ठरावी.
------------------------------------------------------------------

0 Response to "साबण ते सिमेंट...!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel