-->
रेल्वेतील नवीन प्रयोग

रेल्वेतील नवीन प्रयोग

संपादकीय पान मंगळवार दि. १९ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रेल्वेतील नवीन प्रयोग
दररोज २ कोटी २२ लाख प्रवासी भारतीय रेल्वेच्या एक लाख पंधरा हजार कि.मी. रेल्वेच्या मार्गावरुन प्रवास करतात. जगातील ही सर्वात मोठी लांबी असलेल्या या सरकारी सेवेचा लाभ केवळ गरीबच नव्हे तर सर्वच थरातील प्रत्येक जण लाभ घेत असतो. रेल्वेचा प्रवास मात्र अवाढव्य असला तरीही अनेकवेळा प्रवास करताना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. आपण प्रवाशांना उत्कृष्ट प्रकारच्या सेवा कशा प्रकारे पुरवू शकतो याकडे आजवर कोणत्याच मंत्र्यांनी लक्ष दिले नाही. यासंबंधी वेळोवेळी गप्पा केल्या, मात्र ठोस काही पावले उचलली नाहीत. १६३ वर्षापूर्वी स्थापन झालेली ही रेल्वे आता मात्र रल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली कात टाकण्यास सज्ज झाली आहे असे म्हणता येईल. कारण सुरेश प्रभू यांनी रेल्वेतील सुधारणा करताना पारंपारिक पद्दत न वापरता अत्याधुनिक पध्दतीचा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यांचे विरोधक त्याला रेल्वेचे खासगीकरण असे म्हणतीलही. मात्र खसागीकरण असो किंवा काही प्रवाशांना चांगली सेवा मिळणे सध्या गरजेचे झाले आहे. रेल्वेतील विविध कामांसाठी स्टार्टअप त्यांनी सुरु करण्याचे ठरविले आहे व त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा एक नवीन प्रयोग आहे. यासाठी विविध ऍप तयार करण्यात येत आहेत. यात रिझव्हेशनची माहिती देणे, रेल्वेच्या टाईमटेबलची माहिती, रेल्वेतील खाद्यसेवा, डब्यातील गैरसोयी अशा प्रकारचे ऍप तयार करण्यात येणार आहेत. ट्रॅव्हलखाना या ऍपव्दारे सध्या १५,००० ट्रेनमध्ये सध्या विविध स्टेशनवरुन खाद्यासेवा पुरविली जाते. दररोज यांच्यामार्फत ५,००० जमांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. सुमारे २५० रेल्वे स्टेशनच्या मार्फत ही सेवा पुरविली जात आहे. याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अशा प्रकारच्या सेवांमुळे प्रवाशांना चांगले खाद्य मिळू लागले आहे. रेल्वेची बुकिंगपासून ट्रेनच्या स्थितीबाबतची माहीती देणारे एक ऍप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना तातडीने माहिती मिळते. सध्या या ऍपला दररोज दोन लाख लोक भेट देतात. अशा प्रकारे रेल्वेतील विविध सेवांसाठी सुरु करण्यात आलेले ऍप भविष्यात आणखी चांगली सेवा देऊ लागतील, असे दिसते.
---------------------------------------------------------

0 Response to "रेल्वेतील नवीन प्रयोग"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel