-->
सरकारच जबाबदार

सरकारच जबाबदार

संपादकीय पान मंगळवार दि. १९ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सरकारच जबाबदार
पवईतील नामवंत हिरानंदानी रुग्णालयात नुकतेच किडनी रॅकेट उघडकीस आले आहे. बेकायदेशीररित्या किडनी विकून त्याचे अवयव प्रत्यारोपण केल्याबद्दल सहा जणांना आजवर अटक झाली आहे. अर्थात अशा प्रकारचे रॅकेट उघडकीस होण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. यापूर्वीदेखील अनेकदा अवयव प्रत्यारोपण प्रामुख्याने किडनी व लिव्हर यांच्याबाबतीत झाले आहे. अर्थात अशा प्रकारचे कॅडनी रॅकेट होण्यामागे सरकारलाच जबाबदार धरले पाहिजे. कारण सध्याच्या स्थितीत कोणत्याही अवयवयाचे प्रत्यारोपण करण्यासाठी अनेक जाचक अटी व त्यासाठीची कागदपत्रे तयार करणे हे मोठे जिकीरीचे काम झाले आहे. संपूर्ण लाल फितीचा कारभार याला जबाबदार ठरला आहे. विदेशात आता कोणत्याही अवयववाचे प्रत्यारोपण करणे अतिशय सोपे झाले आहे कारण तेथे यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता अतिशय सोपी करणयात आली आहे. आपल्याकडे यापूर्वीचे अनेक अनुभव येऊनही सरकारला जाग येत नाही, याचे वाईट वाटते. त्यामुळे अवयव रोपणासारख्या अत्याधुनिक शास्त्राचा शोध लागल्यामळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांतीच झाली. यातून अनेकांचे प्राण वाचविता येतात. अवयव प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया सोपी नसली तरीही शक्य आहे व डॉक्टर यातून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. केवळ विज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. परंतु आपल्याकडे यासंबंधीचे हे अत्याधुनिक शास्त्र उपलब्ध असूनही केवळ सरकारी लाल फितीच्या कारभारामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अनेकदा रोगी व त्याचे नातेवाईक हे अगतीक झालेले असतात. त्यांचे प्रामुख्याने लक्ष हे रोग्याच्या आरोग्याकडे असते. त्यातच जर त्यांना क्लिष्ट कागदपत्रांचा सामना करावा लागला तर ते त्रासून जातात. आपला नातेवाईक आपल्या हातातून जाईल की काय अशी त्यांना भीती वाटू लागते. नेमका याचाच फायदा बनाट कागदपत्रे तयार करुन देणारे उठवितात. देशातील प्रमुख महानगरात आता अवयवप्रत्याकरता येते. मात्र त्यासाठीचे कायदे सुटसुटीत केले पाहिजेत याचा विचार सरकारने कधीच केला नाही. सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार, रोग्याचा केवळ जवळचा नातेवाईकच आपला अवयव दान करु शकतो. परंतु या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या कायद्यामुळे यात लाखो रुपयांची उलाढाल होते. सर्वात महत्वाचे म्हणजे यातील मोठी रक्कम अवयव देणार्‍याला नाही तर मधला एजंट खाऊन जातो. यासाठी कायद्यात बदल आवश्यक आहे. सध्याच्या आधुनिक वैद्यकशास्त्राने किडनी, लिव्हर, ह्दय यांचे रोपण करुन हजारो जणंचे प्रा वाचविले आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी चांगल्या तर्‍हेने विकसीत झाल्यावर त्याचा अनेकांना मोठा फायदा मिळू शकतो. सध्या यासाठी लागणरा खर्चही कमी होईल व सर्वसामन्यांसाठी हे तंत्रज्ञान खर्‍या अर्थाने पोहोचेल. आज केवळ मुंबईत ३१०० लोक किडनीसाठी, १५१ रुग्ण लिव्हरसाठी व १७ जण ह्दय रोपणाच्या प्रतिक्षेत आहेत. अन्य शहरात याहून मोठी प्रतिक्षायादी आहे. अशा प्रकारे वारंवार किडनी रॅकेट उघडकीस येऊनही सरकार यातील कागदपत्रांमध्ये सुटसुटीतपणा आणत नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान अजूनही सर्वसामान्यांमपर्यंत पोहोचत नाही. यासाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारची रॅकेट सुरुच राहातील.

0 Response to "सरकारच जबाबदार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel