अंमलबजावणी करा...
संपादकीय पान गुरुवार दि. ०९ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अंमलबजावणी करा...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर ब्रिफेन वायरही उभारण्यात येणार आहेत. नुकत्याच पनवेलजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासंदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम अंतर्गत कमांड सेंटरसह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्हीचे जाळे उभे केले जाणार आहे. शिवाय ओव्हरस्पीडिंग, लेन कटिंग आणि ड्रंक ऍण्ड ड्राइव्हच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांबरोबरच डेल्टा फोर्सच्या १०० जणांचे कृती दल उभारले जाणार आहे. त्यांना विशेष पोलीस अधिकार्यांचा दर्जा दिला जाईल. महामार्गाच्या सुरक्षिततेवरही भर दिला जाईल. यात इंजिनीअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी यांचा समावेश आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महामार्ग पोलीस आणि परिवहन या विभागांनी ३६५ दिवस पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपल्याकडे सुरक्षिततेची सर्व यंत्रणा उपलब्ध आहे मात्र प्रश्न आहे तो अंमलबजावणीचा. तसेच प्रत्येक वाहन चालकाचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या अपघातांपैकी बहुतांशी अपघात हे बेदरकार ड्रायव्हींमुळे होत असतात हे विसरता कामा नये. त्यासाठी ओव्हरस्पिडींग कडकपणे तपासले गेले पाहिजे. सरकारने यापूर्वीही अनेक निर्णय घेतले मात्र अंमलबजावणी प्रभावी होत नसल्यामुळे अपघातांची मालिका काही कमी झालेली नाही. त्यामुळे यासंबंधी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे.
-------------------------------------------------------

0 Response to "अंमलबजावणी करा..."
टिप्पणी पोस्ट करा