-->
रघुराम राजन यांचा राम-राम

रघुराम राजन यांचा राम-राम

संपादकीय पान सोमवार दि. २० जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रघुराम राजन यांचा राम-राम
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सष्टेंबर महिन्यात आपली मुदत संपल्यावर आपण मुदतवाढ न घेता पुन्हा अमेरिकेत अध्ययनाचे काम करणार आहोत हे सांगितल्याने देशातील अर्थवर्तुळात आश्चर्याचा धक्का बसणे स्वाभाविक होते. राजन हे जागतिक दर्ज्याचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. मात्र ज्यांना अर्थशास्त्रातला ओ की ठो माहित नाही असे लोक राजन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे काढले आहे व त्यांना मुदतवाढ देऊ नये अशी सत्ताधारी भाजपाचे लोक जाहीर टीका करीत होते. त्यामुळे उद्दीग्न झालेल्या विचारवंत असलेल्या राजन यांना ही बाब मनाला लागणे स्वाभाविक होते. राजन यांच्या अर्थशास्त्रातील अभ्यासाला जगातले नामवंत सलाम करतात, तसे त्यांचे कामही आहे. मात्र त्यांची एकच चूक होती, ती म्हणजे त्यांना रिझर्व्ह बँकेच्या सर्वाच्चपदी काम करताना स्वातंत्र्य हवे होते. त्यांना राजकीय हस्तक्षेप नको होता. यापूर्वीच्या केंद्रातील कॉँग्रेसच्या सरकारने ते स्वातंत्र्य त्यांना बहाल केले होते. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिद्मबरम यांनी त्यांच्या कामात हस्तक्षेप नव्हता. आता मात्र भाजपाचे सरकार आल्यापासून त्यांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप सुरु झाला होता. त्याचबरोबर राजन यांची नियुक्ती कॉँग्रेसच्या सरकारने केलेली असल्याने भाजपाला ते नकोसे झाले होते. त्यामुळे त्यांच्या मुदतवाढीचे निमित्त साधून त्यांच्याव भाजपाने निशाना साधून त्यांना मुदवाढ काही दिली जाणार नाही असेच सुचित केले होते. त्यामुळे त्या मुदवाढीच्या निर्णयाअगोदरच राजन यांनी आपला निर्णय जाहीर केला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात फिरुन आपली प्रतिमा सुधारण्याची व जगातून गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र राजन यांनी मुदतवाढ न स्वीकारण्याचा निर्णयाचे दीर्घकालीन पडसाद उमटू शकतात. राजन यांच्यासारखा विव्दान व हुशार माणूस तुम्ही जपू शकत नाहीत तर तुम्ही जगातल्या भांडवलदारांच्या गुंतवणूक अपेक्षा कशा पूर्ण करणार असा सवाल उपस्थित होतो. खरे तर राजन यांना संपूर्ण सहकार्य करुन त्यांच्या अनभवाचा फायदा करुन घेण्याचे सरकारने ठरविले असते तर एक वेगळे चित्र निर्माण झाले असते. माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी या सरकारची लायकीच नाही अशी संप्तप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ती स्वाभाविक आहे. त्यात काही चूकही नाही. राजन यांच्या जाण्याने भारताची जागतिक अर्थक्षेत्रातील पत घसरली आहे. गेल्या तीन वर्षातील राजन यांची कामगिरी अतिशय उत्तम होती. केवळ देशच नव्हे तर जग मंदीच्या तड्याख्यातून जात असताना राजन यांनी त्यातूनही देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मोठे प्रयत्न केले, हे कौतुकास्पदच आहेत. त्यांनी सप्टेंबर २०१३ साली हे पद स्वीकारले त्यावेळी रुपयाची मोठी घसरण होत होती, चलनफुगवटा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याविरुद्ध लढण्यासाठी राजन यांनी कृती आराखडा तयार केला. आपल्या परकीय साठ्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अनिवासी भारतियांची विदेशी चलनातील खाती वाढविली. याबाबतचे सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. परंतु भागवेकरण सर्वत्र सुरु केलेल्या या सरकारला राजन यांच्या जमेच्या बाजू कधीच दिसल्या नाहीत, ही दुदैवाची बाब आहे. राजन यांचा राम-राम सरकारला दीर्घकालीन विचार करता अतिशय महाग पडणार आहे.

0 Response to "रघुराम राजन यांचा राम-राम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel