-->
लघु उद्योगांना बुरे दिन

लघु उद्योगांना बुरे दिन

संपादकीय पान मंगळवार दि. 10 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
लघु उद्योगांना बुरे दिन
नोटाबंदीचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. या नोटबंदीमुळे काळ्या पैशावर व भ्रष्टाचारावर लगाम बसल्याचे कुठे दिसत नसले तरी यामुळे देशातील लघु उद्योजकांना फटका मात्र बसला आहे. नोटाबंदीनंतरच्या 34 दिवसांमध्ये लघु उद्योग क्षेत्रातील रोजगारात 35 टक्क्यांनी घट झाली. तर लघु उद्योजकांच्या उत्पन्नातही 50 टक्क्यांनी घट झाली आहे. अखिल भारतीय उत्पादक संघटनेने नोटाबंदीनंतर झालेल्या परिणामांवर सविस्तर अभ्यास करुन एक अहवाल तयार केला आहे. मार्च 2017 पर्यंत लघु उद्योग क्षेत्रातील रोजगारात तब्बल 60 टक्क्यांनी घट होईल तर उत्पन्नात 55 टक्क्यांपर्यंत घसरण होईल असे भाकितही संघटनेने वर्तवले आहे. अखिल भारतीय उत्पादक संघटनेमध्ये देशभरातील तीन लाख लघु, मध्यम आणि मोठ्या उत्पादकांचा समावेश आहे. रस्ते बांधकामसारख्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मध्यम आणि मोठ्या कंपन्यांनाही नोटाबंदीची झळ बसली आहे. या क्षेत्रातील रोजगार 35 टक्क्यांनी कमी झाला असून उत्पन्नातही 45 टक्क्यांनी घट झाली आहे. मार्चपर्यंत या दोन्हींचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत असेल अंदाज आहे. आयात- निर्यात उद्योगात कार्यरत असलेल्या मध्यम आणि मोठ्या उद्योजकांना नोटाबंदीचा जास्त फटका बसला. या क्षेत्रातील रोजगारात 30 टक्क्यांनी तर उत्पन्नात 40 टक्क्यांनी घट झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेला गोंधळ, पैसे काढण्यावर आलेले निर्बंध, रुपयाचे घसरलेले मूल्य, बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी, नियोजनाचा अभाव यामुळे परिणामाची तीव्रता वाढली आहे. यावर जर मात करावयाची असेल तर सरकारला लघु उद्योगाला दिलासा मिळावा यासाठी तयंना काही सवलती द्याव्या लागतील. लघु उद्योग हा अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. कारण सर्वाधिक रोजगार याच क्षेत्रातून निर्माण होतो. परंतु या उद्योगाकडे सरकारचे फारसे लक्ष नाही, त्यातुलनेत मोठ्या उद्योगसमुहांवर सवलतींचा  वर्षाव करण्याकडे कल असतो. यासाठी सरकारचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.
--------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "लघु उद्योगांना बुरे दिन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel