ओम पुरींच्या मृत्यूचे गूढ
संपादकीय पान बुधवार दि. 11 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ओम पुरींच्या मृत्यूचे गूढ
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असताना अनेक शंका कुशंका व्यक्त होत आहेत. डॉक्टरांनी जरी त्यांच्या निधनाच्या अहवालात हृहयविकाराच्या झटक्याने निधन असे म्हटले असले तरीही त्यांचा मृत्यूला विविध कंगोरे असल्याचे आता जाणवत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये पुरी यांच्या डोक्यामध्ये इजा झाल्याचे निशाण तसेच मानेजवळील हाड आणि हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. पुरी यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूस दीड इंच खोल आणि 4 सेंटीमीटर लांब जखम आहे. तसेच मानेजवळील हाड आणि हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. पुरी ज्या इमारतीत राहात होते तेथील सीसीटीव्ही फूटेज आणि येणार्या-जाणार्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. मृत्यूपुर्वीच्या 24 तासात पुरी ज्या व्यक्तिंना भेटले त्यांचीही चौकशी केली जात आहे. ओम पुरी यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व्यक्त करण्यात येत होत्या. शुक्रवारी ओम पुरी आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. परंतु त्यात जर काही काळेबेरे आढऴत असेल तर या अभिनेत्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याची जबाबदारी पोलिसांवर येते. ओम पुरी यांनी अनेकदा सरकार विरोधी वक्तवे केली अशल्याने अलिकडच्या काळात त्यांच्यावरील टीका वाढली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूत काही गूढ असल्यास ते पोलिसांनी शोधले पाहिजे.
------------------------------------------------------------

0 Response to "ओम पुरींच्या मृत्यूचे गूढ"
टिप्पणी पोस्ट करा