पंख छाटलेला उडता पंजाब
संपादकीय पान शुक्रवार दि. १० जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पंख छाटलेला उडता पंजाब
सध्याच्या केंद्रातील भाजपा सरकारला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमके का? हे समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण अनुराग कश्यप ह्याने तयार केलेल्या उडता पंजाब चित्रपटात सेन्सार बोर्डाने सुमारे ९० कटस् सुचविले आहेत. एवढ्या प्रमाणात कट्स सुचविण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. सध्या पंजाबमध्ये ड्रग्जचा विळखा तरुणांभोवती पडा आहे या प्रश्नावर हा चित्रपट बेतण्यात आला आहे. यातून कोणाची एखाद्या व्यक्तीची वा राज्याची बदनामी करण्याचा निश्चितच हेतू नाही. हा एक ज्वलंत सामाजिक विषयावरील चित्रपट आहे. आज खरोखरीच पंजाबमध्ये ड्रग्जने घातलेला धुमाकूळ ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पठाणकोटमधील हवाई तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या परिसरात ड्रग पेडलरच्या वाढता वावर आहे. ड्रग पेडलर्सना कोण आश्रय देते हे स्थानिक लोकांना माहित आहे. ह्याविषयी पंजाबमध्ये उघड बोलले जाते. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. ह्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि कॉंग्रेसविरुध्द वातावरण तापवण्यासाठीच आम आदमी पार्टीने उडता पंजाब चित्रपट तयार करण्यास अर्थसाह्य दिल्याची दिल्लीत चर्चा आहे. यात तथ्य असो वा नसो पंजाबमधील या ज्वलंत प्रश्नावर चित्रपट निघतो ही वस्तुस्थिती आहे. यात ९० कटस् सुचवून सेन्सॉर बोर्ड नेमके काय सुचवू इच्छिते, हा प्रश्न आहे. एखाद्या चित्रपटाला प्रदर्शन सर्टिफिकीट देताना त्या चित्रपटात कट सुचवण्याचा सेन्सार बोर्डाला अधिकार आहे. पण हा अधिकार वापरताना अतिशय कौशल्य अपेक्षित आहे. उडता पंजाब चित्रपटात सेन्सार बोर्डाच्या चार सभासदांच्या समितीने कटस् सुचवले होते. कदाचित त्यामुळे भलती आफत ओढवण्याची शक्यता लक्षात येताच पुन्हा जास्त सभासदांचा समावेश असलेली समिती नेमण्यात आली. आधीच्या समितीने सुचवलेल्या कटवर साधकबाधक विचार करण्यात आला. अशा प्रकारे कोणत्याच सामाजिक विषयावर चित्रपट काढता येणार नाही. आता सध्या मराठवाड्यातील शेतकर्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मग यातून राज्याची बदनामी होणार आहे का? आपल्याकडे शेतकर्यांच्या आत्महत्या हा मोटा सामाजिक प्रश्न आहेच. हे मान्य करुन त्यावर एकादा चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्यावर एवढा गहजब उठविण्याची गरजच काय? पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणउका येऊ घातल्या आहेत व सध्या सत्तेत असलेल्या भाजपा-अकाली दलाला या चित्रपटामुळे फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जातो. अशा प्रकारे जर प्रत्येक बाबतीत राजकारण आणले गेले तर कोणत्याच सामाजिक विषयावरील चित्रपट तयार होऊ शकत नाही. केवळ प्रेमाचेच चित्रपट तयार करावे लागतील. त्यातही सैराटसारखे चित्रपट तयार करता येणार नाहीत. सध्या सेन्सॉरने ९० कटस् सुचविलेला उडता पंजाब हा पंख छाटलेला होणार आहे, त्यामुळे तो बघण्याची कोणी फिरकेल असे वाटत नाही.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "पंख छाटलेला उडता पंजाब"
टिप्पणी पोस्ट करा