-->
अस्वस्थ नाशिक

अस्वस्थ नाशिक

संपादकीय पान सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
अस्वस्थ नाशिक
तळेगाव मधल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आता बहुतांशी निवळली आहे. ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. गेल्या पाच दिवसांत ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून संवेदनशील गावांत जिल्हाधिकारी, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांसह सशस्त्र संचलन करून बंदोबस्त शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विनय चौबे यांनी जाहीर केले. अफवा पसरु नयेत यासाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार आली आहे. आतापर्यंत सात ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळेगावमधल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आता निवळली आहे. ग्रामीण भागातही जनजीवन पूर्वपदावर येत असताना या घटनेवरुन भाजप-शिवसेनेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळेच नाशिकमध्ये हिंसाचार भडकल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी पत्रकार परिषदेत केला. मुलीवर अत्याचाराची घटना झाल्यानंतर महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतरच नाशिक अशांत झाले. कायदेशीर प्रक्रियेचे पालन पालकमंत्र्यांनी करायला हवे होते, असेही त्या म्हणाल्या. नाशिक धुमसण्याला पालकमंत्री गिरीश महाजनच जबाबदार आहेत, नाशिक जिल्ह्यात दुफळी माजवणारे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय होते, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला आहे. गोर्‍हे यांच्या आरोपामुळे जिल्ह्यातील भाजपा व शिवसेना यांच्यात आता जुंपणार हे नक्की झाले आहे. बलात्कार झाला की नाही, हे वैद्यकीय अहवालानंतर पोलिस कोर्टात माहिती देतात, असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले होते. संवेदनशिल घटनेबाबत एखाद्या जबाबदार मंत्र्याने असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे निलम गोर्‍हे यांनी म्हटले आहे. तळेगाव घटनेनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून फुटलेले अफवांचे पेव रोखण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून नाशिक आणि परिसरात मोबाइल इंटरनेटवर घातलेली बंदी घालण्यात आली होती. सोशल मीडियावर अफवा पसरवणार्‍या सात संशयितांवर सायबर पेट्रोलिंगच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ग्रुप ऍडमिनचा समावेश आहे. तळेगाव येथील अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात प्रचंड तणाव पसरला होता. यात सोशल मीडियावरूनच अफवांचे पेव फुटले होते. यामुळे हा तणाव अधिक वाढत गेला आणि अनेक ठिकाणी जाळपोळ झाली होती. अनेक बस आंदोलकांनी जाळल्या होत्या. यानंतर इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. तळेगाव येथील घटना ही अत्यंत चिंताजनकच म्हटली पाहिजे अशी होती. या घटनेनंतर सोशल मिडियातून जो काही विषारी प्रचार झाला ते पाहता, त्यावर हा तणाव निवळेपर्यंत बंदी घालणे योग्यच होते. आता मात्र त्यातून राजकारण जे सत्ताधार्‍यामध्ये होत आहे, ती शरमेची बाब म्हटली पाहिजे. अशा घटनेचे राजकारण करुन एकमेकांच्या कुरघोड्या करणे हे निदान सत्ताधार्‍यांना तरी शोभत नाही. मात्र यातून सत्ताधारी शहापण शिकतील असे नाही.

0 Response to "अस्वस्थ नाशिक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel