-->
बीसीसीआयचे तरुण नेतृत्व

बीसीसीआयचे तरुण नेतृत्व

संपादकीय पान मंगळवार दि. २४ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बीसीसीआयचे तरुण नेतृत्व
भाजपचे युवा नेते अनुराग ठाकूर वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी बीसीसीआय याजगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झाले. मॅचफिक्सींगचे प्रकरण असो वा त्यांचा अपारदर्शी व्यवहार यामुळे २०१४ ते २०१६ या कार्यकाळात बीसीसीआयचे तीन अध्यक्ष झाले. आता मात्र अनुराग ठाकूर यांच्या रुपाने एक तरुण नेतृत्व पुढे आले आहे. याचे आपण स्वागत केले पाहिजे. परंतु ठाकूर यांच्यावर मोठी जबाबदारीही आहे. आपल्या देशात ब्रिटीशांनी आपल्याला क्रिकेटचे वेड लावले ब्रिटीश देशातून गेले असले तरीही अजूनही आपल्या नसानसात क्रिकेट भिनले आहे. खरे तर आता क्रिकेट हा एक उक्ृष्ट व्यवसाय झाला आहे. काळाच्या ओघात त्यात अनेक गैरप्रकारही घडले. आय.पी.एल.चे सामने हा क्रिकेट व करमणुकीचा एक चांगला मेळ घातला होता. परंतु त्यात जास्तच व्यवहारवाद आल्याने हे सामने करमणुक म्हणून न राहाता त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले. बीसीसीआय ही क्रिकेटची सर्वोच्च संस्था आता स्वच्छ करण्याची वेळ आली आहे व नवीन अध्यक्षांपुढे हेच एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्याचबरोबर ठाकूर यांना टेलिव्हिजन कंपन्यांना शिस्तीत आणावे लागेल. शिवाय एक राज्य एक मत ही शिफारस अंमलात आणल्यानंतर प्रचंड गदारोळ होणार आहे. मणिपूरसारख्या छोट्या छोट्या दुर्गम भागात वसलेल्या राज्यांना संघांतील ११ खेळाडू गोळा करणे कठीण होऊन बसले आहे. एकट्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वर्षाला तब्बल १७५ स्पर्धा होत असतात. आसाम, मणिपूर यांच्यापेक्षा महाराष्ट्र आणि गुजरात, पश्‍चिम बंगाल या क्रिकेट संस्थांचा व्याप मोठा आहे. या दोन राज्यांत एकमत कुणाला द्यायचे ते कोण आणि कसे ठरवणार, या प्रश्नाचे उत्तर नवीन अध्यक्षांना शोधायचे आहे. अनुराग ठाकूर हे क्रिकेट खेळलेले आहेत. राजकारणातही आहेत. मात्र त्यांचा प्रशासकीय अनुभव पुरेसा नाही. मात्र त्यात ते कुठे कमी पडतात की वरचढ ठरतात हे काळ ठरविल. बीसीसीआय ही दुभती गाय आहे, आजवर तीच्याकडे त्यादृष्टीने पाहिले गेले आहे. त्यासंबंधी दृष्टीकोन बदलण्यापासून विचार केला गेला पाहिजे. क्रिकेट हा खेळ आता राजकारण्यांच्या ताब्यात पूर्णपणे गेले आहे. किंबहुना त्यांनी त्यावर कब्जा मिळविला आहे. खरे तर क्रिकेट व राजकारण हे एकाच गळ्यात गळे घालून राहू शकत नाहीत. त्यामुळे खेळाचे नुकसान होण्याचा धोका आहे. अशा प्रकारची आव्हाने नवीन अध्यक्ष कशी पेलतात ते पहायचे.
-------------------------------------------------------

0 Response to "बीसीसीआयचे तरुण नेतृत्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel