-->
भारतीय तंत्रज्ञानाचा विजय

भारतीय तंत्रज्ञानाचा विजय

संपादकीय पान मंगळवार दि. २४ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
भारतीय तंत्रज्ञानाचा विजय
अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी इस्रोने तयार केलेल्या आरएलव्ही-टीडी या अवकाशयानाची (स्पेस शटल) सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून या स्पेस शटलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. याचे वैशिष्ट्‌य म्हणजे संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रोने आरएलव्ही-टीडी हे यान तयार केले आहे. त्यामुळे भारतीय तंत्रज्ञानाचा एक मोठा विजय झाला आहे. उपग्रहाला अवकाशात सोडल्यानंतर यानाला विमानासारखे पृथ्वीवर आणण्याच्या तंत्रज्ञानावर इस्त्रो काम करत आहे. जेणेकरुन त्या यानाचा पुर्नवापर करता येईल. या तंत्रज्ञानामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च दहा पटीने कमी होणार आहे. अशा प्रकारच्या यानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा मानवी अवकाश मोहिमांसाठी वापर होऊ शकतोे. या यानाची ही प्राथमिक चाचणी असल्याने हे यान नियंत्रितपणे बंगालच्या खाडीत उतरवण्यात आले. त्यामुळे याची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. स्वदेशी बनावटीचे पूर्णपणे विकसित पुर्नवापर योग्यरित्या अवकाश यान तयार करण्यासाठी दशकभराचा कालावधी लागेल असे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के.सिवान यांनी म्हटले होते. याआधी अंतराळ तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिका व इतर काही देशांनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी व अंतराळ सफरींसाठी अशा स्पेस शटलचा वापर केला. मात्र कालांतराने त्याला होणारे अपघात व न परवडणार्‍या आर्थिक गणितांमुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली वा अशा वाहनांचा वापर बंद केला. भारताच्या अभियंत्यांनी मात्र काटकसरीवर भर देत रॉकेटच्या पुनर्वापरावर भर देण्याचे ठरवले आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास एखादा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्यासाठी वापरलेल्या यानाचा पुन्हा वापर करणे शक्य होईल. या तंत्रज्ञानामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च दहा पटीने कमी होणार आहे. अशा प्रकारच्या यानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा मानवी अवकाश मोहिमांसाठी वापर होऊ शकेल. हे अवकाश यान अंतराळात फिरुन सोडून एखाद्या विमानप्रमाणे परत येईल. नंतर त्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात एखाद्या भारतीयाला अंतराळात पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा प्रकारच्या यानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा मानवी अवकाश मोहिमांसाठी वापर होऊ शकेल.
अशा प्रकारे हे तंत्रज्ञान विकसीत केल्याने रियुजेबल स्पेस शटल निर्मात्या क्लबमध्ये भारतही सहभागी झाला आहे. या क्लबमध्ये सध्या अमेरिका, रशिया, फ्रान्स व जपान या देशांचा समावेश आहे. यात सहभागी होण्यासाठी चीन देखील प्रयत्नात आहे. जगातील पहिले स्पेश शटल रशियाने १९८९ मध्ये बनवले होते. मात्र याने केवळ एकचदा उड्डाण घेतले होते. त्यानंतर अमेरिकेने पहिल्यांदा आरएलवी टीडी शटलचे तब्बल १३५ वेळा यशस्वी उड्डान घेतले होते. मात्र, ते २०११ मध्ये नादुरुस्त झाले होते. एसयूव्ही सारखे दिसणारे स्पेस शटल आपल्या अमेरिकन यानापेक्षा सहापटीने लहान आहे. चाचणीनंतर फायनल व्हर्जन तयार होण्यास १० ते १५ वर्षे लागतील. मात्र ही चाचणी यशस्वी झाल्याने भारतीय तंत्रज्ञान आता या क्षेत्रात जगात झळकले आहे.

0 Response to "भारतीय तंत्रज्ञानाचा विजय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel