-->
कृषी क्षेत्रातही स्टार्ट अप

कृषी क्षेत्रातही स्टार्ट अप

संपादकीय पान मंगळवार दि. 15 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कृषी क्षेत्रातही स्टार्ट अप
स्टार्ट अप आता केवळ उद्योगांपुरतेच राहाणार नाही तर कृषी क्षेत्रातही येणार आहे, ही बाब स्वागतार्ह ठरावी. एकीकडे औद्योगिक प्रगती होत असताना आपण शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा केवळ दोन टक्के राहिला. मात्र येथे रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्र वाढण्याची गरज आहे. त्यासाठी तेथे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसेच दुसरी हरित क्रांती करणे ही देशाची गरज ठरणार आहे. भविष्यातील शेतीमध्ये तंत्रज्ञान मोठी भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातही स्टार्ट अप सुरू करण्यासाठी तरुणांना बळ देण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात परिवर्तन होईल. मांजरी येथे आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी त्यांनी कृषी क्षेत्रातली स्टार्ट अपच्या मांडलेली संकल्पाना स्वागतार्ह ठरणार आहे. मात्र त्यासंबंधी केवळ गप्पा न करता प्रत्यक्षात स्टार्ट अप कसे कार्यान्वित होतील व त्यासाठी कशी चालना द्यायची हे सरकारने बघण्याची वेळ आहे. आपल्याकडे पारंपारिक शेतीचे स्वरुप बदलले जसे पाहिजे तसे यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही झाली पाहिजे. स्टार्ट अप उद्योगांनी कृषी क्षेत्रात संशोधन, विकास, तंत्रज्ञान विस्तार, बीज संशोधन आदी क्षेत्रांत काम करण्याची आवश्यकता आहे. शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीव्यवस्थेतून बाजूला येऊन ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन याची कास धरली पाहिजे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेती मालाचे उत्पादन वाढेल. यामुळे देशातील अनेक तरुणांना रोजगार मिळेल आणि शेतीच्या विकासाला हातभार लागेल.
---------------------------------------------------

0 Response to "कृषी क्षेत्रातही स्टार्ट अप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel