-->
एक नयी सुबह...पण कोणाची?

एक नयी सुबह...पण कोणाची?

संपादकीय पान सोमवार दि. ३० मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
एक नयी सुबह...पण कोणाची?
केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हजारो कोटी रुपयांची उधळण करुन एक नयी सुबह हा कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर देशभरातील वृत्तपत्रे, चॅनेल्स यांना करोडो रुपयांच्या जाहीराती वाटण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचा हा सरकारी खर्च हजार कोटी रुपयांहून जास्त होण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असताना व शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले असताना सरकारने हा दोन वर्षाचा जल्लोष साजरा करणे म्हणजे शेतकर्‍यांची थट्टा करण्याचा प्रकार आहे. हा सर्व जल्लोष नरेंद्र मोदी या एका व्यक्तीभोवती केंद्रीत आहे. या संबंधीत झालेला कार्यक्रम असो किंवा वृत्तपत्रातील जाहीराती असोत सर्वच ठिकाणी मोदींची छबी झळकत आहे. अन्य मंत्री कुठेच दिसत नाहीत. मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री आपल्या खात्याचे कामकाज चांगल्या प्रकारे करीत आहेत. त्यात महाराष्ट्रातील सुरेश प्रभू व नितीन गडकरी यांचा उल्लेख करावा लागेल. परंतु त्यांना त्यांच्या कामाचे श्रेय मोदी देत नाहीत, ही खेदाची बाब आहे. जसे काही सर्व सरकार फक्त मोदीच एकहाती चालवित आहेत. गेल्या दोन वर्षात मोदी सरकारने अशी काही नेत्रदीपक कामगिरी केलेली नाही. उलट भूसंपादनाचा कायदा, पी.एफ.चा निर्णय हे कष्टकर्‍यांच्या विरोधातले व देशातील भांडवलदारांचे हीत जपणारे निर्णय होते. मात्र जनतेतून त्याला विरोध झाला व निर्णय सरकारला मागे घेण्याची नामुष्की आली. यापूर्वीच्या सरकारच्याच जुन्या योजना मोदींनी नवीन वेष्टने लावून बाजारात जनतेपुढे आणल्या आहेत. त्यामुळे यात सरकारकडे काही कल्पकता नाही हे सिध्द होते. विदेशात गेलेला काळा पैसा परत आणणार व जनतेत तो वाटून देणार. अशा प्रकारे प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील, असे खोटे आश्वासन निवडणुकीतील प्रचारात दिले होते. मात्र गेल्या दोन वर्षात कुणाच्याही खात्यात १५ पैसेही जमा झाले नाहीत. खात्यात पैसे जमा होण्याचे दूर परंतु काळा पैसा देशात आणण्यासाठी एक समिती स्थापन केली त्याव्यतिरिक्त काही हालचाली झालेल्या नाहीत. उलट पनापा पेपर्स संबंधी ज्यांची नावे आहेत त्यातील अभिनेते अमिताभ बच्चन हे दोन वर्षाच्या या कार्यक्रमात सहभागी होते. सरकार आधारचे मोठ्या कौतुकाने सांगते. परंतु आधार ही योजना यापूर्वीच्याच सरकारने सुरु केली होती. त्याचा पाया कॉँग्रेसने घातला आहे, हे सरकार मान्य करीत नाही. गेल्या दोन वर्षात सरकारने केवळ अंबांनी व अडाणी या दोन उद्योगसमूहांची भर केली आहे. त्यंनी लाटलेले फायदे हे काळाच्या अघात उघड होणार आहेत. आमच्या काळात भ्रष्टाचार झाला नाही असे पंतप्रधान म्हणतात. मात्र खरोखरीच भ्रष्टाचार झाला की नाही हे अजून उघड व्हायला काही काळ जावा लागेल. भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड व्हायला काही काळ जावा लागतो हे मोदींनी लक्षात घ्यावे. खोटे बोलले तरी ते ठामपणाने व सतत बोला. त्यामुळे खोटेही खरे वाटू लागते हा मंत्र मोदी व संपूर्ण भाजपाने अंगिकारला आहे. त्यानुसारच प्रचार व प्रसार सुरु आहे. सरकारला पाच वर्षे पूर्ण झाल्यावर अशाच प्रकारे प्रचार करुन अच्छे दिन आले आहेत असा प्रचार केला जाईल. परंतु जनतेला हे वास्तव समजायला काही काळ जावा लागेल.

0 Response to "एक नयी सुबह...पण कोणाची?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel