-->
स्वागतार्ह निर्णय

स्वागतार्ह निर्णय

संपादकीय पान सोमवार दि. ३० मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्वागतार्ह निर्णय
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्व बस आता डिझेलवर नाही तर इलेक्ट्रीकवर चालविण्याचा निर्णय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत झाले पाहिजे. यामुळे प्रदूषण होणार नाही व बसचा खर्च अध्याहून जास्त कमी होईल. परिणामी प्रवासी भाडे कमी होण्यास मदत होईल. बस इलेक्ट्रीकवर धावू लागल्यास सध्या प्रति लिटर डिझेलचा खर्च जो ५२ रुपये आहे तो प्रति युनिट सहा रुपयांवर खाली येईल. रात्रीच्या वेळी तर इलेक्ट्रीक ही तीन रुपयांनी उपलब्ध होते. राज्य सरकारांच्या वतीने सुमारे १.७ लाख बसेस रोड चालतात. या बस जर टप्याटप्प्याने इलेक्ट्रीकवर चालविण्यास सुरुवात झाली तर आपण फार मोठ्या प्रमाणात इंधन बचत करु शकतो. यातून देशाचे परकीय चलन वाचेल. सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेला कमी दरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल. सध्याच्या अंदाजानुसार, सध्याची बसची भाडी अर्ध्याने कमी होऊ शकेल. एकीकडे अशा प्रकारे स्वस्त वाहतूक उपलब्ध करुन देत असताना रस्ते उभारणीच्या कामाला वेग देण्याचे गडकरी यांनी ठरविले आहे. सध्या सरकारकडे महामार्ग उभारणीसाठी तब्बल ५५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सध्या पूर्ण झालेले १०० महामार्ग जर खासगी क्षेत्रांना विकले तर १.१० लाख कोटी रुपये उभे राहातील. यातून दर वर्षाला दहा हजार कोटी रुपयांचा निधी टोलव्दारे उभा राहिल. महामार्गात अशा प्रकारे गुंतवणूक करण्यासाठी अनेक विदेशी गुंतवणूकदार देखील इच्छुक आहेत. गडकरींचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातील सर्व महामार्ग हे उत्कृष्ट होतील. एक मात्र आहे की, यासाठी टोल हे भरावे लागेल. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना सरकारने टोल मुक्ती आश्वासन दिले होते. परंतु ते शंभर टक्के शक्य नाही हे आता सरकारला पटले आहे. जनतेचीही रस्ता चांगला ठेवल्यास टोल द्यायची मानसिकता आहे. रस्त्यांची ही उभारणी व इलेक्ट्रीक बस हे महत्वाचे निर्णय नितीन गडकरी यांनी घेतले असून त्याचे स्वागत व्हावे.
-------------------------------------------------------



0 Response to "स्वागतार्ह निर्णय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel