-->
ओबामांचे शेवटचे भाषण

ओबामांचे शेवटचे भाषण

संपादकीय पान शनिवार दि. ३० जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ओबामांचे शेवटचे भाषण
अमेरिकन भांडवलशाहीला एक शिस्त आहे. या शिस्तीत कोणताही अध्यक्ष कितीही मोलाची कामगिरी करणारा असला तरीही त्याला दोन टर्मच्यावर अध्यक्षपदी राहाता येत नाही. ओबामा ज्यावेळी अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले त्यावेळी त्यांचा जगाला फारसा परिचयही नव्हता. अमेरिकन भांडवलशाहीचे हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आपल्याकडे लोकशाहीची पाळेमुळे रुजली असली तरीही आपल्याकडे लोकशाहीच्या चौकटीत घराणेशाही बसते. मग अर्थातच सर्व पक्षात घराणेशाही लहान-मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात घराणेशाही आहे म्हणून इंदिरा गांधींनाही पराभवाची चव चाखावी लागली आहे. अमेरिकेत तसे काही घडत नाही. फारसा परिचित नसलेला एखादी व्यक्तीही अध्यक्षपदी निवडली जाऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची ही दुसरी म्हणजे शेवटची टर्म आहे. अशा वेळी त्यांचे सर्वत्र निरोप घेण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानुसार ओबामा यांनी नुकतेच आपले निरोपाचे भाषण अमेरिकन नागरिकांना उद्देशून केले. अर्थातच दहशतवाद, अमेरिकी नागरिक आणि आर्थिक सुधारणा हे प्रमुख मुद्दे त्यांच्या भाषणात होते. ओबामा यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला जागतिक पातळीवर आर्थिक घसरणीला सुरुवात झाली होती. यातून अमेरिका सावरेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र या आशेवर तब्बल दहा वर्षे गेली. आजही अमेरिका मंदीच्या छायेत वाववरते आहे. विदेशातून सैन्य माघारी बोलावणे आणि नोकर्‍यांत सुधारणा करण्यावर त्यांनी ठामपणे अंमलबजावणी केली हे त्यांचे एक वैशिष्ट्य. ओबामा यांनी विरोधी पक्ष आणि इतर राजकीय हल्ले परतवत आज आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. आज अमेरिकेत नव्या नोकर्‍यांची नवी संधी उपलब्ध झाली आहे. तशी यापूर्वी कधी नव्हती. ओबामा सत्तेत आले त्यावेळी ते जेवढे लोकप्रिय होते तेवढेच आजही आहेत. रिपब्लिकन आर्थिक धोरणावरून त्यांची कोंडी करू शकत नाहीत. यासाठी ओबामा नेहमी स्मरणात राहतील. त्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. राजकीय क्षेत्रात त्यांच्या निरोप समारंभाचे सोहळे आयोजित केले जात आहेत. त्यांनी राष्ट्रास उद्देशून केलेल्या अखेरच्या संदेशात दहशतवाद आणि देशाच्या सुरक्षेसाठी नवी व्यवस्था असण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेवर सर्वात मोठे हल्ले झाले. त्यामुळे ओबामांना असा संदेश देणे आवश्यक होते. परंतु यामुळे समाजात दहशत मात्र निर्माण झालेली आहे. ओबामा यांनी अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडताना सुरक्षेच्या दृष्टीने जे काही करता येईल तितके प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात काही त्रुटी जरूर राहिल्या. हनुमानजी माझ्यासाठी कायम लकी राहिले -मुलाखतीत म्हणाले बराक ओबामाबराक ओबामा म्हणाले, हनुमानजींची मूर्ती माझी लकी चार्म, नेहमी असते, त्यांचे हे म्हणणे आपल्याकडील हिंदुत्ववाद्यांना प्रेरणादायी ठरेल. अमेरिकेला मंदीच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी ओबामा यांनी सतत प्रयत्न केले. ओबामा यांच्या गेल्या दहा वर्षातील रिपोर्ट कार्डाबाबत काय सांगावे? त्यांच्या कार्यकाळात या क्षेत्रात खूप सुधारणा झाल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व अमेरिकनांना आरोग्य विमा लागू व्हावा यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगलेच यश आले. आजवर अनेक अमेरिकन नागरिकांना गरीबीमुळे आरोग्य सेवा परवडत नव्हती. मात्र ओबामांच्या प्रयतनंमुळे ती सुविधा उपलब्ध झाली आहे. २०१५ च्या अंतिम तिमाहीपर्यंत १.४ कोटी नव्या नोकर्‍यांच्या संधी लोकांना उपलब्ध झाल्या. ओबामा यांचे एकट्याचे हे श्रेय नाही. कारण राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडतो, असे लोकांना वाटते. पण ते तसे नाही. ओबामा यांना २००९ मध्ये तयार केलेल्या योजनेचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चांगला फायदा झाला. याच काळात टीकाकारांनी त्यांच्या अनेक धोरणांवर सडकून टीका केली आहे. ओबामा यांनी २०१० मध्ये आर्थिक सुधारणांचे विधेयक मंजूर केले. त्यांनी खूप कमाई करणार्‍यावर कर वाढवला. यानंतर त्यांनी आरोग्य सुधारणा विधेयक मंजूर केले. ते २०१४ मध्ये लागू झाले. यामुळे ते एक सक्षम नेता ठरले. त्यांच्या आर्थिक धोरणांनी काही नवे पाठ घालून दिले आहेत. जागतिक राजकारणात ओबामा यांनी आजवरचेच विदेश धोरण यापुढे सुरु ठेवले. अर्थातच ओबामा आल्याने फार काही धोरणात्मक विदेशी नितीमध्ये बदल होईल असे मानणे चुकीचे ठरते. त्यांच्या काळात भारताशी संबंध अधिक दृढ झाले अशले तरीही त्यांनी अनेक भारतीय कंपन्यांना व्हिसा संबंधी व अन्य अपेक्षित सवलती काही दिल्या नाहीत. अर्थातच त्यात काही चूक नाही. शेवटी त्यांना त्यांच्या देशाच्या हिताचा विचार करणे प्राधान्याने होते. जागतिक पातळीवर अमेरिकेने पोलिसाची भूमिका कायमच ठेवली. एकीकडे भारताशी संबंध चांगले ठेवायचे व दुसरीकडे पाकिस्तानलाही चुचकारायचे हे अमेरिकेचे धोरण त्यांच्याही काळात मागील पानावरुन पुढे चालू राहिले.
------------------------------------------------------------------

0 Response to "ओबामांचे शेवटचे भाषण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel