जगण्यावर प्रेम करणारा महाकवी
संपादकीय पान गुरुवार दि. ३१ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जगण्यावर प्रेम करणारा महाकवी
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या गाण्यातून रसिकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे मराठीतील महाकवी, साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील रहात्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सहज सोप्या भाषेतील जगण्याची प्रेरणा देणार्या कवितांमधून पाडगावकरांनी रसिकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवले. कोकणच्या मातीत जन्मलेल्या या कवीने बाल काव्य, निसर्ग कविता व जीवन जगण्याचे गोडवा सांगणार्या अशा विविध प्रकारच्या कविता मराठी साहित्याला दिल्या. कविता वाचन करण्यातील गोडवा त्यांच्यासारखा अन्य कोणाकडे नव्हता. त्यामुळे त्यांनी कवितेला एक नवा दर्जा मिळवून दिला. कविता वाचन सर्वच कविता करतात, परंतु त्यांच्या आवाजात जो खणखणीतपणा होता त्याचबरोबर गोडवाही होता यातून ते प्रेक्षकांना भूरळ घालीत. त्यांची कित्येक वर्षे असलेली फ्रेंच दाढी व गोल जाड भिंगांचा चष्मा आणि त्यातून भिरभिरणारी त्यांची नजर हे मराठी साहित्यिक रसिकांना आता गमवावे लागणार आहे. जन्मापासून ते निधनापर्यंत ते कविताच जगले. खणखणीत आवाजात कविता वाचून दाखविणे ही त्यांना एक देणगी लाभली होती. त्यांच्या जाण्याचे मराठी साहित्य विश्व हळहळले आहे. कवितेबरोबरच त्यांनी मासळीवर विलक्षण प्रेम केले. प्रामुख्याने सारस्वती पध्दतीचे मासळीचे जेवण जेवताना ते विशेष करुन खुलत असत. त्यांची प्रत्येक कविता ही जीवनाचा अर्थ सांगणारी होती. जीवन जगण्याचा मंत्र सांगणारी होती. नैराश्येत असलेल्या प्रेरणा देणारी होती. पाडगावकरांनी आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे जगण्यावर प्रेम केले. त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली, त्याच्या सुनेचे अकाली निधन झाले तरीही आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे ते आयुष्य जगले. कदाचित त्यांच्या कविताच त्यांना जगण्याची प्रेरणा देत गेल्या असाव्यात. यातूनच अनेक संकटे येऊनही ते समर्थपणाने उभे राहिले. संकटे येऊनही त्यांना नैराश्य कधी शिवले नाही. म्हणूनच त्यांनी लिहिलेल्या कविता ते स्वत: जगले. यात त्यांचे मोठेपण होते. वयाच्या १४ व्या वर्षी पाडगावकरांनी कविता लेखनाला सुरुवात केली. तुझ पाहिले हे पुष्प ह्दयातले ही पाडगावकरांची पहिली कविता. ७० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी कविता लेखन केले. प्रसिध्द कवी विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासह १९६०-७० च्या दशकात महाराष्ट्राच्या विविध भागात झालेल्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात मंगेश पाडगावकर सहभागी झाले होते. कविता करीत असताना पाडगावकरांनी अनेक मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहीली. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे, भातुकलीचा खेल मांडीला आणि शुक्रतारा मंद वारा ही त्यांची गाणी विशेष गाजली. आजही ही गाणी रसिक गुणगुणतांना दिसतात. पाडगावकरांचा जन्म तळ कोकणातील वेंगुर्ला येथे १९२९ साली झाला होता. मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषेत त्यांनी एम.ए. केले. मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत होते. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. १९८० साली त्यांच्या सलाम या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार (२०१३ साली) त्यांना मिळाला. त्याच वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने केंद्र सरकारने सन्मानित करण्यात आले. राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा यशोछित गौरव केला. त्यांच्या अनेक कविता गाजल्या. यात सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?, फ़ूल ठेवूनि गेले, सलाम, सावर रे, सावर रे, उंच उंच झुला, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो अशा अनेक कवितांचा यात उल्लेख करता येईल. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ! ही त्यांची कविता अनेक पिढ्या तरुणाईला भूरळ घालीत होती. पाडगावकरांनी जवळपास सात पिढ्यांना आपल्या कविता एैकविल्या आणि रसिकांचे कान तृप्त केले. पाडगावकरांचे वर्णन त्यांच्याच कवितेत करावयाचे झाल्यास आपण पुढीलप्रमाणे म्हणू शकतो-
तुमचं दुःख खरं आहे,
कळत मला,
शपथ सांगतो तुमच्याइतकच छळतं मला,
पण आज माझ्यासाठी,
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदण होऊन,
अंगणभर पसरायचं ॥
-----------------------------------------------------------------

0 Response to "जगण्यावर प्रेम करणारा महाकवी"
टिप्पणी पोस्ट करा