-->
लोकशाहीकडे वाटचाल

लोकशाहीकडे वाटचाल

संपादकीय पान शुक्रवार दि. २० नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
लोकशाहीकडे वाटचाल
लोकशाही रुजलेला भारत व कम्युनिस्ट चीन यांच्या बेचक्यात आसलेल्या म्यानमार या छोट्याशा देशात खरे खुरे लोकांनी निवडून दिलेले सरकार सत्तेत येण्याचा मार्ग खुला झाला आहे. आजवर येथे लष्करी राजवट किंवा त्यांच्या प्रभावाखालील लोकशाही नांदत होती. परंतु महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून लोकशाहीसाठी पाव शतकाहून जास्त काळ देशात लढा देणार्‍या आंग सँग सू की यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आता सत्तेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बौध्दांचे प्राबल्य व मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात चीनला आजही रस आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या बाजूने उभा राहाणार्‍या लष्करशहाला नेहमीच जीवदान दिले. परंतु लोकशाहीचा सनदशीर मार्गाने सू की यांनी जो लढा दिला त्याची नोंद जगाने घेतली व तेथील लष्करशहाला अखेर निवडणुका घ्याव्याच लागल्या. अर्थातच सू की यांची लोकप्रियता अफाट असल्याने त्यांचा पक्ष प्रचंड बहुमताने निवडून आला. १९४७ मध्ये तत्कालीन ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य मिळण्यास सहा महिने बाकी असताना या देशाचा भावी नेता आँग सान याचा खून झाला. सू की ही त्याची कन्या. तिचे शिक्षण झाले इंग्लंडमध्ये. तिचा जोडीदार मायकेल एरिस हा ब्रिटीश नागरिक आणि मुले - अलेक्झांडर व किमही इंग्लिशच. म्यानमारच्या घटनेनुसार अशा विदेशी मुलांच्या आईला अध्यक्ष होता येत नाही. कदाचित या मुद्यावर तिची देशाचे नेतृत्व करण्याची संधी हुकू शकते. १९८८ मध्ये मायदेशी परतलेल्या स्यूने जनरल ने विन यांच्या लष्करी राजवटीविरुद्ध रणशिंग फुंकले. हजारो बर्मी नागरिक रस्त्यावर उतरून तिच्या लढ्यात सामील झाले, पण महिनाभरातच लष्कराने सत्ता हस्तगत करून स्यूला कैदेत टाकले. त्यानंतर १९८९ मधील निवडणुकांत एनएलडीने बहुमत मिळवले तरी लष्कराने सत्ता सोडली नाही. सहा वर्षांच्या नजरकैदेनंतर जुलै १९९५ मध्ये स्यूची सुटका झाली. पण तिच्या हालचालींवर खूप निर्बंध होते. १९९९ मध्ये मायकेलचे कर्करोगाने निधन झाले. त्यापूर्वी त्याला भेटण्यासाठी परदेशी जाण्याची मुभा दिली गेली. २००० पासून तिला पुन्हा नजकैदेत टाकले गेले. मे २००२ मध्ये तिची सुटका केली गेली. तिने पक्ष बांधायला सुरुवात केली. तिचा पाठिंबा वाढत गेला. पुढच्याच वर्षी सूू की हिच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यातून ती बचावली आणि पुन्हा नजरकैदेत डांबली गेली. नोव्हेंबर २०१० च्या निवडणुकांच्या काळातही ती नजकैदेतच होती. या निवडणुकीनंतर लष्करी राजवट संपली आणि एक बदल झाला. लष्कराने सेइन यांच्याकडे अध्यक्षपद सोपवून म्यानमारमध्ये तथाकथित लोकनियुक्त राजवट
आणली. नोव्हेंबर २०१० मध्ये सू की ची सुटका झाली. त्यानंतर आता तेथील लष्करी राजवटीने निवडणुका घेतल्या, अर्थातच त्यांबाबत त्यांच्यावर जागतिक दडपण असल्यानेच त्या निवडणुका झाल्या. बांगलादेशातून आलेले, रोहिंग्या मुस्लिम म्हणून ओळखले जाणारे सुमारे १३ लाख नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिले, पण आजवर मतदानच न केलेल्या लाखो म्यानमारी नागरिकांसह तीन कोटी मतदारांना या वेळी खुलेपणाने मतदान करता आले. सू की यांचा पक्ष जरी अता सत्ता स्थापन करु शकत असला तरीही तेथील नोकशाही पूर्णपणे लष्करी राजवटीच्या ताब्यात आहे.त्यामुळे म्यानमारमध्ये लोकशाहीचा स्थापनेचा मार्ग काही सोपा नाही. पुढील काळात सू की यांना सत्ता टिकविण्यासाठी बराच लढा द्यावा लागेल. म्यानमारमधील सुधारणा अपरिवर्तनीय आहेत; आता माघार नाही, असे आश्वासनही दिले. त्याचा विसर त्यांना पडणार नाही अशी अपेक्षा आहे. घटनात्मक अडसर असल्याने नजीकच्या काळात सूू की अध्यक्ष होण्यात काही अडचणी येऊ शकतात तरीदेखील म्यानमारच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाले असून त्या आधारे तो पक्ष सत्तेवर येणे म्हणजे सत्तेची सूत्रे सू कीच्या हातात जाण्यासारखेच आहे. म्यानमारची ही ऐतिहासिक कलाटणी ठरेल. घटनेत सुधारणा हा पुढील टप्पाही सोपा नाही. या निवडणुकांमध्ये आपल्या विरोधात मतदान होऊ नये यासाठी मतदारच नियंत्रित करण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांनी केला होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या रोहिंग्या मुस्लिमांनी मतदान केले होते, त्यांना आता मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला होता. आपणच बुद्ध धर्माचे संरक्षक आहोत असे सत्ताधारी युएसडीपी भासवित होती आणि देशातले वाढते इस्लामीकरण रोखायचे असेल तर आपल्याला मत देणे गरजेचे आहे असा प्रचार त्यांनी केला होता. या वातावरणात सू की यांचा प्रचार शांतपणे चालू होता. त्यांनी रोहिंग्या मुस्लिमांचे समर्थन केले नाही. या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांनी एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नव्हता. असा स्थितीत झालेल्या या निवडणुकीतून म्यानमार लोकशाहीकडे वाटचाल करेल असे सध्या तरी चित्र आहे.
------------------------------------------------------------------

0 Response to "लोकशाहीकडे वाटचाल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel