पावसाचा तात्पुरता दिलासा
संपादकीय पान शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पावसाचा तात्पुरता दिलासा
परतीचा प्रवास सुरू होताच मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात गेले १५ दिवस धुवाधार पाऊस पडला. कोकणासह राज्यातील बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेवटच्या टप्प्यात का होईना वरुणराज प्रसन्न झाल्याचे समाधान सर्वांनाच मिळाले. शेतकर्यांना दिलासा देण्याबरोबरच ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहिल्याने, सिमेंट बंधारे, पाझर तलाव राज्यातील लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणी साचले. राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील मोठे, मध्यम, लघू अशा २५५८ प्रकल्पांमध्ये मिळून ७१२.८७ टीएमसी म्हणजेच ५४ टक्के पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. मुंबईसारख्या महानगरात नुकतीच २० टक्के पाणी कपात सुरु करण्यात आली होती. परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळाला. मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुतांशी धरणे आता भरुन वाहू लागली आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी आता दहा टक्केच पाणी कपात राहील. मराठवाड्याच्या पाणीसाठ्यातही वाढ होत १३ टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागातील धरणामध्ये सर्वाधिक पाणीसाठा झाला असून, मराठवाडा वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी उपलब्ध झाले आहे. विदर्भातील पाणीसाठ्यांची स्थिती शेवटच्या टप्प्यातील पावसाने सुधारली. मात्र मराठवाड्यासह पुणे आणि नाशिक विभागांतील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. उजनी धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्यातून उपयुक्त पातळीत आला आहे. कोयना धरणांत ७५ टक्के पाणीसाठा असून, मराठवाड्यात झालेल्या पावसाने जायकवाडीच्या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ होत ७ टक्के पाणीसाठा झाला आहे. या पावसाने दिलासा मिळाला असला, तरी हा धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २०१४ मध्ये याच काळात राज्यातील धरणांमध्ये १०४८.५० टीएमसी (७९ टक्के) पाणीसाठा होता. तर २०१३ मध्ये राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून १०६५.३१ टीएमसी (८० टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा असून, राज्यातील ८४ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३९३.९६ टीएमसी (५१ टक्के), २२५ मध्यम प्रकल्पांमध्ये ९०.४८ टीएमसी (५३ टक्के), तर २२३३ लघू प्रकल्पांमध्ये ६५.२८ टीएमसी (३६ टक्के) पाणीसाठा आहे. तर कोयना, भातसा, वैतरणा, तिलारी, इरई या इतर प्रकल्पांमध्ये मिळून १६३.१४ टीएमसी (७५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे विभागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने पुणे जिल्ह्यासह इतरही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मृत पातळीत गेलेल्या उजनी धरणात जमा होत असलेल्या पाण्यामुळे पाणीसाठा उपयुक्त पातळीत आला आहे.कोकण व घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे कोकण विभागातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. विभागातील १५८ प्रकल्पांमध्ये ५२.११ टीएमसी (८८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. कोकणातील ३ मोठ्या प्रकल्पांमध्ये २३.९७ टीएमसी (९५ टक्के), ५ मध्यम प्रकल्पांमध्ये ११.३८ टीएमसी (८३ टक्के) आणि १५० लघू प्रकल्पांमध्ये १५.८१ (८२ टक्के) पाणीसाठा आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागातही यंदा गतवर्षी पेक्षा कमी पाणीसाठा आहे. विभागातील सर्व धरणांमध्ये यंदा १११.८८ (७९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाले आहे. पश्चिम विदर्भात सुरवातीला ओढ दिल्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने अमरावती विभागात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. नाशिक विभागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा अपुरा पाऊस पडला आहे. विभागातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नाही. गेल्या १५ दिवसांत झालेल्या पावसाने धरणसाठ्यात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. मराठवाड्याला यंदा पावसाने सर्वाधिक ओढ दिल्याने पाणीटंचाई वाढली असून, दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या १५ दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने मराठवाड्याला दिलासा मिळणार असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही तुरळक वाढ झाली आहे. एकूणच पाहता परतीच्या पावसाने बळीराजाला व जनतेला तसेच सरकारलाही दिलासा दिला आहे. अर्थातच त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न काही सुटणार नाही हे देखील वास्तव आहे. जी भयाण परिस्थिती होती त्यात आता सुधारणा होऊन काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कोकणात अजूनही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास कोकणातील पाऊस गेल्यावर्षीच्या सरासरी एवढा होऊ शकतो. सध्याच्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. परंतु शेती आता उभी राहू शकत नाही. त्यामुळे दुष्काळाचे सावट काही दूर होणार नाही. सध्या जे धरणात पाणी जमा झालेले आहे त्याचा थेंबन थेंब आपल्याला वापरावा लागणार आहे. त्याचे योग्य नियोजन करुन वापरावे लागेल. पाणी देताना प्राधान्य कुणाला? उद्योगांना की शेतीला प्राधान्य यासंबंधी सरकारला निर्णय् घ्यावा लागेल. पावसाचा सध्याचा दिलासा हा तात्पुरता आहे हे लक्षात घेणे व त्यादृष्टीने पावले उचलणे महत्वाचे आहे.
----------------------------------------------------------

0 Response to "पावसाचा तात्पुरता दिलासा"
टिप्पणी पोस्ट करा