-->
संपादकीय पान शनिवार दि. १८ ऑक्टोबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
इस्त्रोची नवी भरारी
-------------------------------
मंगळयानाचं यश मिळून एक महिना होत नाही, तोच भारतानं स्वतःचा दिशादर्शक उपग्रह असण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे. अवकाशात स्वतःची जागा निश्‍चित करण्यात भारत आता यशस्वी झाला आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी अवकाशक्षेत्रात अमेरिकेच्या खालोखाल आपलं स्थान निर्माण केलं आहे. किंबहुना, अमेरिकेच्या अवकाश बाजारपेठेपुढं भारतानं आव्हान उभं केलं आहे. भारतानं गेल्याच महिन्यात मंगळयानाचं यशस्वी प्रेक्षपण करून जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. भारतीय शास्ज्ञत्र प्रतिकूल परिस्थितीतही जगाला तोंडात बोट घालायला लावील, अशी कामगिरी करत असतात. भारतानं अगोदरच अन्य देशातील उपग्रह भारतीय भूमीतून अवकाशात सोडण्यास सुरूरवात केली आहे. जगात मंगळयान मोहिमेत कोणत्याही देशाला पहिल्याच प्रयत्नात यश आलं नव्हतं. भारतानं मात्र पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून दाखवलं. भारताची मंगळ मोहीम अवघ्या ४२० कोटी रुपयात झाली. अमेरिका आणि अन्य देशांच्या तुलनेत भारतीय मोहिमेला अवघा दहा टक्के खर्च आला. भारतीय शास्त्रज्ञ एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटाच्या निर्मितीइतक्या खर्चात मंगळाची मोहीम यशस्वी करून दाखवतात, त्याचं आता जगाला कौतुक आहे. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनी या मोहिमेची दखल घेतली होती. विशेष म्हणजे जगातील अन्य देश आता भारतीय भूमीचा उपयोग करून मंगळ मोहिमा कमी खर्चात राबवू शकतील, असा विश्‍वास मंगळयान मोहिमेनं  जगाला दिला आहे. इंडियन रिजनल नेव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टीम (आयटआरएनएसएस) ही मोहीम भारतानं उघडली आहे. या मोहिेमेत एकूण सात उपग्रह सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन उपग्रह अगोदरच सोडण्यात आले आहेत. गुरुवारी पहाटे भारतानं याच मालिकेतील तिसरा उपग्रह अवकाशात सोडला. इस्त्रोनं पीएसएलव्ही सी २६ द्वारे या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. प्रेक्षपणानंतर बरोबर वीस मिनिटांनी १४२५.५ किलोचा हा उपग्रह अंतराळातील अपेक्षित कक्षेत प्रक्षेपित करण्यात आला. या मालिकेतील पहिल्या दोन उपग्रहापैकी एकाचं प्रक्षेपण २०१३ मध्ये तर दुसर्‍याचं या वर्षीच्या चार एप्रिलला करण्यात आलं होतं, तर आता तिसर्‍या उपग्रहाचं प्रक्षेपण झालं. इस्त्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी ही घोषणा केली, तेव्हा शास्त्रज्ञांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. एकाच महिन्याच्या अंतरानं भारतीय अवकाशतज्ज्ञांनी मिळवलेलं हे यश निश्‍चित स्पृहणीय आहे. याच मालिकेतील आणखी चार उपग्रह याच वर्षांत प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. आयआरएनएसएसमुळं दीड हजार किलोमीटरवरील एखाद्या घटनेची अचूक माहिती मिळवणंशक्य होणार आहे. भारतासोबतच शेजारच्या अन्य देशांनाही या सेवेचा ङ्गायदा घेता येणार आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी १४२० कोटी रुपये खर्च येणार आहे. गेल्या दहा वर्षांत श्रीहरीकोटा येथून २६ उपग्रहाचं प्रक्षेपण झालं आहे. आता सोडलेल्या उपग्रहामुळं भारतासह अन्य देशांना मुख्यतः दोन सेवा मिळणार आहेत. स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिसेस अधिकृत वापरकर्त्यांनाच मिळणार आहे. दुसर्‍या प्रकारची सेवा अधिक महत्त्वाची आहे. समुद्रातील नौकांना दिशादर्शन, आपत्ती व्यवस्थापन, वाहनांचा शोध, प्रवाशी कंपन्यांना दिशादर्शन, चालकांना दिशादर्शन आदी प्रकारे ही सेवा उपलब्ध होणार आहे. ती अधिक अचूक असेल. भारतानं या क्षेत्रात आताच प्रवेश केला आहे. भारताअगोदर रशियाकडं त्याची स्वतः ची ग्लोबल ऑर्बिटींग, नेव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टीम, अमेरिकेची ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, युरोपीयन युनियनचा गॅलिओ, चीनचा बेईदोऊ सॅटेलाईट नेव्हीगेशन, सिस्टीम व चपानची क्वासी झेनिथ सॅटेलाईट सिस्टीम हे पाच दिशादर्शक उपग्रह अगोदरच अवकाशात आहेत. आता भारताचा सहावा दिशादर्शक उपग्रह असेल, असा संदेश गुरुवारच्या प्रक्षेपणानं मिळाला आहे. भारताच्या या उपग्रहाच्या नेव्हीगेशन सिस्टीमबद्दल सध्या इस्त्रोचे शास्त्रज्ञ गप्प आहेत. एवढ्यात त्यांना कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. परंतु, संरक्षण व्यवस्थेसाठी हा उपग्रह वापरला जाण्याची शक्यता आहे. आणखी उपग्रह सोडले, तरी त्याचाही वापर अन्य सेवांबरोबर लष्करासाठी केला जाण्याची शक्यता आहे. त्यांचं सेवाक्षेत्र वाढणार आहे. पाकिस्तान व चीनच्या लष्करी हालचाली, त्यांची दिशा, आक्रमण यावर लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहांचा भारताला उपयोग होणार आहे. त्यामुळं भारताला अचूक प्रतिकार करता येईल. या उपग्रहांच्या मालिकेबरोबरच भारत जमिनीवरील केंद्रांची संख्या वाढवणार असून उपग्रहाकडून मिळणार्‍या संदेशाची या केंद्रात आवक होइल. त्याचं विश्‍लेषण केलं जाईल. या केंद्रांसाठी एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भारताला सर्व उपग्रहाचं प्रक्षेपण केल्यानंतर इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. उलट, काही मित्र देशांना भारत ही सेवा पुरवू शकतो. या उपग्रहांच्या सेवा काही प्रतिबंधित क्षेत्रासाठी असतील, तर काही स्टँडर्ड पोझिशन सर्व्हिसेस या प्रकारच्या असतील. भारताला कायम नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. कधी वादळ, कधी पूर, तर कधी अन्य नैसर्गिक आपत्ती येतात. मुख्यतः शेतकर्‍यांनाही या उपग्रहांचा चांगला ङ्गायदा होऊ शकेल. वादळाची दिशा, त्याचा वेग, त्याचं ठिकाण, पूर, त्याची दिशा, त्याचं ठिकाण आदीबाबत वेळेत माहिती घेता येईल. अवकाश व भूमीवरील हालचाली लक्षात येतील. तसंच शत्रूपक्षाच्या हालचाली टिपून त्यांचा प्रतिकार करण्यासाठी उपाययोजना करता येतील. त्यासाठी दिशादर्शक उपग्रहांचा उपयोग होणार आहे. भारत केवळ तेवढ्यावर थांबणार नाही. भारताची मोठी महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणून ज्या घटनेकडं पाहिलं जातं, ती घटना पुढच्या ४५ दिवसात प्रत्यक्षात येणार आहे. त्यावेळी जीएसएलव्ही मार्क ३ या उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राने घेतलेली ही झेप प्रत्येक भारतीयासाठी अभिमानस्पद अशीच आहे.
-------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel