-->
मोदी विरुध्द नितीश-लालू

मोदी विरुध्द नितीश-लालू

रविवार दि. २० सप्टेंबर २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
मोदी विरुध्द नितीश-लालू
---------------------------------------
एन्ट्रो- खरे तर बिहारची ही लढाई जातियवादी शक्तींच्या विरोधात सेक्युलर पक्षांची आहे. सुरुवातीला सेक्युलर पक्षांत मुलायमसिंग यांचा समाजवादी पक्षही होता. परंतु आयत्या वेळी त्यांनी घात केला व स्वतंत्र ळढण्याचा निर्धार व्यक्त केला. अर्थात बिहारमध्ये मुलायमसिंगांची ताकद फार नसली तरीही बिहारमध्ये ते काही जागांवर सेक्युलर मते फोडून अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करणार आहेत. त्याचबरोबर येत्या वर्षात होऊ घातलेल्या उत्तरप्रदेशातील निवडणुकीत भाजपाशी जुळवून घेऊ शकतात. उत्तर प्रदेशमधील आज एक हाती असलेली सत्ता मुलायमसिंह यांच्या हातात राहील की नाही, याची त्यांनाही खात्री नाही. त्यामुळे बिहार निवडणुकीत मोदींना राजकीय मदत करून, नितीशकुमार-लालूप्रसाद आघाडीतून बाहेर पडून मुलायम यांनी बिघाडी केली. यादवांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी ही मोदींची चाल आहे आणि त्याला मुलायम बळी पडले आहेत हे मात्र नक्की. अर्थात असे तोडफोडीचे राजकारण करुन आपण बिहारचे युध्द आपण जिंकू सकतो असा जर मोदींचा कयास असल्यास तो खोटा ठरेल. कारण यावेळी बिहारची जनता मोदींच्या कारभारावर मतदान करणार आहेत...
-------------------------------------------------------------
येत्या ८ नोव्हेंबरला बिहार राज्य विधानसभेचे निकाल लागतील त्यावेळी अनेक राजकीय समिकरणे बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल. बिहारची ही निवडणूक विधानसभेची असली तरी त्याच्या केंद्रभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. खरे तर अशी स्थीती अपवादात्मक असते. कारण पंतप्रधानांनी एकदा हे पद स्वीकारल्यावर देशाचा प्रमुख म्हणून कारभार हाकायचा असतो. एखाद्या पक्षाचा प्रमुख म्हणून नव्हे. परंतु सुरुवातीपासूनच अनेक संकेत पायदळी तुडविणारे मोदी बिहारची निवडणूक ही सुरुवातीपासून स्वत:साठी प्रतिष्ठेची करुन बसल्याने त्यांना आता ही निवडणूक जिंकण्यासाठी जंगजंग पछाडणे भाग आहे. अशीच त्यांनी दिल्लीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती व तिकडे त्यांना केजरीवाल यांच्याकडून सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे यावेळीची बिहारची निवडणूक ही नरेंद्र मोदी विरुध्द विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार व माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यात लढली जाणार आहे. मोदी यांच्या केंद्रातील सत्तेला सव्वा वर्ष झालेले असल्याने लोकांना त्यांच्या कारभाराचा कौल यानिमित्ताने देण्याची संधी चालून आली आहे.
खरे तर ही लढाई जातियवादी शक्तींच्या विरोधात सेक्युलर पक्षांची आहे. सुरुवातीला सेक्युलर पक्षांत मुलायमसिंग यांचा समाजवादी पक्षही होता. परंतु आयत्या वेळी त्यांनी घात केला व स्वतंत्र ळढण्याचा निर्धार व्यक्त केला. अर्थात बिहारमध्ये मुलायमसिंगांची ताकद फार नसली तरीही बिहारमध्ये ते काही जागांवर सेक्युलर मते फोडून अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत करणार आहेत. त्याचबरोबर येत्या वर्षात होऊ घातलेल्या उत्तरप्रदेशातील निवडणुकीत भाजपाशी जुळवून घेऊ शकतात. उत्तर प्रदेशमधील आज एक हाती असलेली सत्ता मुलायमसिंह यांच्या हातात राहील की नाही, याची त्यांनाही खात्री नाही. त्यामुळे बिहार निवडणुकीत मोदींना राजकीय मदत करून, नितीशकुमार-लालूप्रसाद आघाडीतून बाहेर पडून मुलायम यांनी बिघाडी केली. यादवांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी ही मोदींची चाल आहे आणि त्याला मुलायम बळी पडले आहेत हे मात्र नक्की. अर्थात असे तोडफोडीचे राजकारण करुन आपण बिहारचे युध्द आपण जिंकू सकतो असा जर मोदींचा कयास असल्यास तो खोटा ठरेल. कारण यावेळी बिहारची जनता मोदींच्या कारभारावर मतदान करणार आहेत. मोदी म्हणतील माझ्या कारभाराची विचारणा पाच वर्षांनी करा. मात्र तसे करता येणार नाही, कारण बिहारची ही लढाई केवळ राज्यातल्या प्रश्‍नांची नसून मोदी यात उतरल्यामुळे देशव्यापी झाली आहे. मोदींचे धोरण विरुध्द नितीश-लालू अशी ही लढाई आहे. नितीश कुमार यांनी गेल्या दहा वर्षात चांगली कामगीरी राज्यात करुन दाखविली आहे. बिहार हे एकेकाळी बिमारु राज्य म्हणून ओळखले जात होते, तर आता एक रोजगारभीमूख राज्य म्हणून आता त्याचा परिचय झाला आहे. त्यामुळेच बिहारची जनता रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची प्रक्रिया आता थांबली आहे. त्यांना राज्यातच रोजगार मिळवून देण्यात नितीश कुमार यशस्वी झाले आहेत. त्याउलट सध्याच्या योजनांना नवीन रॅपिंग करुन नरेंद्र मोदी यांनी लाखो कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन मतदारांना लालूच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचे राजकारण हे निवडणुका डोळ्यामुळे ठेवून मोदी करीत आहेत हे समजण्याऐवढी बिहारची जनता आता दुधखुळी राहीलेली नाही.
भाजपा व मोदी आता विकासाच्या गप्पा करीत आहेत. मात्र यापूर्वी भाजपाने लोकांची जी फसवणूक केली आहे ती देखील विसरलेली नाही. वाजपेयी सत्तेत होते तेव्हाही त्यांना राममंदिर बांधता आले नाही. भाजपाला ना रामाचे प्रेम, त्यांनी निवडणुकीसाठी राम वापरला. आता तेच भाजपावाले सत्तेसाठी विकासाचा जप करीत आहेत. मात्र गेल्या वर्षात विकास तरी झाला कुठे? निदान विकासाच्या दृष्टीने पावलेही पडलेली नाहीत. अच्छे दिनचे स्वप्न निवडणुकांच्या अगोदर दाखविले खरे आता मात्र पंचवीस वर्षे अच्छे दिन येणार नाहीत असे भाजपाचे अध्यक्ष अमीत शहा म्हणतात. तर भाजपाचे प्रवक्ते तर याहून पुढे जाऊन आमची अच्छे दिनाची घोषणा नव्हतीच अशी दर्पोती करतात. अशा प्रकारे गेल्या वर्षात भाजपाने जी थापेबाजी सुरु केली आहे त्याला बिहारच्या निवडणुकीत त्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. बिहारच्या मतदारांना भाजपाची मस्ती जिरवायची ही फार मोठी संधी आहे. गेल्या वर्षभरात मोदी यांंनी दाखवलेले कोणतेच स्वप्न पुरे झालेले नाही. त्यामुळे मतदार संभ्रमावस्थेत आहे. याचा ठोस उत्तर त्यांनी दिल्ली निवडणुकीत दिले. आता प्रथमच एका मोठ्या राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीला भाजपा सामोरा जात आहे. भाजपाला दिल्लीत दणका बसल्याने विरोधकांनीही उचल खाल्ली आणि त्यातूनच कालपरवापर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले नितीशकुमार, लालूप्रसाद यादव व मुलायमसिंह यादव एकत्र आले. कॉंगे्रसनेही त्यांच्याशी हातमिळवणी केली. विकासासह सामाजिक न्याय, अशी भूमिका या पक्षांनी घेतली आणि बिहारचा विकास सर्वांगाने घडवून आणायचा असल्यास राज्याला केंद्राने विशेष दर्जा देऊन खास मदतीचे पॅकेज जाहीर केले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
भाजपा व सेक्यलर आघाडीचा भर जातीची समीकरणे ठीक बसविण्यावर आणि आघाडीत फूट पाडू न देण्यावर आहे. दलित व महादलित जातींना यादवराजची भीती दाखवली जात आहे. उलट ओबीसी, दलित व महादलित आणि मुस्लिम यांची एकत्रित आघाडी करून त्यांची मते पारड्यात पाडून घेण्याची रणनीती नितीशकुमार यांची आघाडी आखली आहे. त्यांच्या आघाडीतून आता मुलायमसिंह यादव बाहेर पडले आहेत व त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. म्हणजे त्यांची मदत भाजपालाच होणार. या सर्व गर्दीत जनता कोणाला निवडून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरी लढाई ही मोदी विरुध्द नितीशकुमार व लालू यांच्यात आहे. कारण  त्यांनी जातियवादी शक्तींच्या विरोधात बिगुल फुंकले आहे. त्याचा निकाल काय लागतो ते पहायचे.
------------------------------------------------------------

0 Response to "मोदी विरुध्द नितीश-लालू"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel