-->
देशात बसून विदेशी समभाग खरेदी करा..

देशात बसून विदेशी समभाग खरेदी करा..

 देशात बसून विदेशी समभाग खरेदी करा..
 Published on 26 Sep-2011 For Arthprava
समभागांची खरेदी करणे आता अतिशय सोपे झाले आहे. पूर्वी समभाग खरेदीसाठी तुम्हाला दलालाची गरज भासे. मात्र, इंटरनेटवर व्यवहार सुरू झाल्यापासून तुम्ही दलालाशिवाय समभागांची खरेदी अगदी घरबसल्या करू शकता. आता तर तुम्ही केवळ देशातल्याच नव्हे, तर जगातल्या कोणत्याही शेअर बाजारातील समभाग इथे बसून खरेदी करू शकण्याची सोय उपलब्ध झाली आहे.या नव्या सोयीमुळे तुम्ही अँपल, मायक्रोसॉफ्ट, युनिलिव्हर, टोयोटा अशा कोणत्याही जगात नोंद असलेल्या कंपन्यांचे समभाग घरबसल्या खरेदी करू शकता. जग हे खर्‍या अर्थाने एक ग्लोबल व्हिलेज झाले आहे हेच खरे. आता प्रश्न पडतो आपल्याला विदेशातल्या कंपन्यांची समभाग खरेदी करावयाची असल्यास ती कशी करावी? यासाठी केवळ सहा टप्पे आहेत. अशा प्रकारे विदेशी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अधिकार सर्व दलालांना मिळालेले नाहीत. सध्या फार कमी दलालांकडे ही सोय उपलब्ध आहे. पुढे हळूहळू या दलालांची संख्या वाढत जाईल. ज्या दलालांकडे ही सोय उपलब्ध आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला एक अर्ज व केवायसीचा फॉर्म भरावा लागतो. एकदा तुमचा अर्ज स्वीकारला की, तुम्हाला आयडी क्रमांक दिला जातो. त्याच्या जोडीला एक स्वतंत्र बँक खाते उघडावे लागते. याच खात्यामार्फत तुम्हाला सर्व व्यवहार करावे लागतील. भारतीय चलनात तुम्ही या खात्यात रक्कम जमा केलीत की, तिचे रूपांतर डॉलरमध्ये होते. ही रक्कम जमा झाल्यावर तुम्ही समभागांची खरेदी करू शकता. यानंतर तुम्ही जशी भारतीय शेअर बाजारात समभागांची खरेदी करता तशाच प्रकारची खरेदी विदेशातील बाजारातून करू शकता. कोणत्या देशातील शेअर बाजार आहे आणि कोणत्या समभागांची खरेदी करावयाची आहे हे एकदा तुम्ही ठरविलेत की, समभागांची खरेदी तुम्ही करू शकता. तशाच प्रकारे विक्री करता येते. त्यानंतर तुम्ही विकलेल्या समभागांचे पैसे खात्यात जमा होतात. विदेशातील समभागात कशासाठी खरेदी करावयाची, असा प्रश्न उपस्थित होईल. तुम्ही जर शेअर बाजारातील मोठे खिलाडी असाल आणि तुम्हाला जगातल्या घडामोडीनुसार नफा कमवायचा असेल तर तुम्हाला विदेशातील समभाग आपल्या पोर्टफोलियोत ठेवणे गरजेचे ठरते. अमेरिकेत जर मंदी असेल आणि युरोपातील र्जमनीत तेजी असेल तर विदेशातील गुंतवणुकीचा तुम्ही फायदा उठवू शकता. र्जमनीत सिमेन्सचा समभाग कमी आहे आणि तोच समभाग अमेरिकेत चढता आहे तर तो समभाग र्जमनीत घेणे शहाणपाणाचे ठरते किंवा आफ्रिकेतील संपन्न खाणीच्या कंपनीतील गुंतवणुकीचा लाभ तुम्ही इथून गुंतवणूक करून घेऊ शकता. एवढेच कशाला, चीनमधील जगातील सर्वात मोठय़ा बँकेचे समभाग तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोत ठेवू शकता. मात्र, या गुंतवणुकीत धोकेही आहेत. कारण त्या संबंधित देशातील अर्थव्यवस्था तेथील कंपन्यांची आर्थिक स्थिती याचा सखोल अभ्यास असणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर त्या देशात असलेल्या वेळेच्या बंधनामुळे येणारे अनेक निर्बंधही आहेतच. त्या देशात असलेली कररचना आपल्याला ठाऊक असणे आवश्यक ठरते. कारण त्यानुसार तुम्हाला कर भरावा लागतो. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास चांगला केलात तर जागतिक पातळीवरील कोणत्याही समभागांची खरेदी इथे बसून करू शकता आणि त्यात चांगला फायदा कमवू शकता. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "देशात बसून विदेशी समभाग खरेदी करा.."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel