दोन वर्षे झाली...!
संपादकीय पान गुरुवार दि. २० ऑगस्ट २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
दोन वर्षे झाली...!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेला आज २० ऑगस्ट रोजी दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दुदैवाची बाब म्हणजे डॉ. दाभोलकर यांचे हत्यारे अजूनही गेल्या दोन वर्षात पोलिसांना पकडता आलेले नाहीत. मध्यंतरीच्या काळात राज्यात व केंद्रात सत्तांतर झाले. राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपा-सेनेची सत्ता आली. परंतु तपासाबाबत नव्याने काहीच घडले नाही. अजूनही डॉ. दाभोलकर यांचे हत्यारे न सापडणे ही बाब राज्याच्या पुरोगामी इतिहासातील एक काळी घटनाच म्हटली पाहिजे. शासनाला त्यांच्या मारेकर्यांना व सूत्रधारांना पकडता आलेले नाही यासाठी अंनिसच्या राज्यभरातील सर्व शाखा धरणे, आंदोलने ,मानवी साखळी, याप्रकारे आंदोलने करणार आहेत. तसेच राज्यातून राष्ट्पतींना हा तपास त्वरित होण्यासाठी एक लाख पोष्टकार्ड पाठविणार आहेत. अशा प्रकारे झोपलेल्या या राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यभर जागर करतील. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व हे समाजकेंद्री होते. त्यांच्या कुटुंबातील माणसे असोत वा कार्यकर्ते; ही सारी माणसे डॉक्टरांशी समाजकेंद्री दृष्टिकोनातून जोडलेली होती. त्यांनी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली २५ वर्षे ते महाराष्ट्र अंनिस, साधना व अन्य परिवर्तनाच्या चळवळीत ते गुंफले गेले होते. यातून त्यांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व जागते ठेवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्र अंनिस व साधनामध्ये कामे पुढे नेऊ शकणारी सक्षम दुसरी फळी निर्माण केली होती. सध्या धर्माच्या नावावर जातीय शक्ती अधिकाधिक संघटित होताना दिसत आहेत, तर दुसर्या बाजूला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून असलेले सत्ताधारी शासक धर्मांध शक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास कचरत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गेली २५ वर्षे महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून अथकपणे प्रयत्न केले. शेवटी त्यांच्या हत्येच्या दबावाखाली सरकराला हा कायदा लोकलाजेस्तव करणे भाग पडले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला खरा पण त्यासाठी डॉ. दाभोलकरांना आपला जीव गमवावा लागला, हे वास्तव इतिहासात आता लिहले गेले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या चळवळींमध्ये जी सामूहिक नेतृत्वाची संकल्पना रुजविली, त्यामुळेच पुढच्या फळीचे कार्यकर्ते तयार झाले व त्यांच्याच बळावर महाराष्ट्र अंनिससह इतर संस्था भविष्यातील वाटचाल करीत आहेत. १९७०-८०च्या कालखंडात सामाजिक चळवळींचे स्वरूप, त्याविषयीचे आकलन श्रेष्ठ दर्जाचे होते. चळवळींमध्ये झोकून काम करण्यासाठी मध्यमवर्गातून अनेक जण पुढे यायचे. आपली आयुष्यं त्यांनी या कार्याला वाहून घेतली होती. पण सध्या असे चित्र दिसत नाही. समाजातील मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग व अन्य घटकांची सामाजिक चळवळींविषयीची जाणीव कमी झाल्याचे पाहायला मिळते. अंनिसचे काम हे केवळ बुवाबाबांची ढोंगे उघडकीस आणणे इतकेच नसून समाजाला विवेकवादाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणे, हा कामाचा आत्मा आहे. डॉ. दाभोलकरांची हत्या ही एका सामाजिक कार्यकर्त्याचा विचार संपविण्यासाठी केले गेलेले हे कृत्य होते, हे लक्षात ठेवून महाराष्ट्रातील पोलिसांनी तपास करायला हवा होता; तसा तो झाला नाही. आता या हत्या प्रकरणाची सूत्रे सीबीआयकडे आहेत. मात्र सीबीआयदेखील विशेष लक्ष देऊन तपास करण्यापेक्षा अन्य गुन्ह्यांचा जसा तपास केला जातो त्याच पद्धतीने काम करताना दिसत आहे. डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्याने त्यांचा आता त्यांचा विचार संपला आहे अशी कुणाची जर समजूत असेल तर ती चुकीची ठरणार आहे. कारण दाभोलकरांच्या हत्येनंतर अंनिस झपाट्याने सावरली व आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार संपूर्ण राज्यात जोमाने करीत आहे. त्यामुळे कुणाची हत्या करुन विचार संपत नसतात हे डॉ. दाभोलकरांचे म्हणणे या राज्यातील जनतेने खरे ठरवविले आहेत. डॉ. दाभोलकर यांना आपल्यातून जाऊन आज दोन वर्षे लोटली असली तरी त्यांचे विचार आजही जीवंत आहेत आणि त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन महाराष्ट्राला पुढे जायचे आहे. आपल्याला भविष्यात जो पुरोगामी महाराष्ट्र घडवायचा आहे त्यात डॉ. दाभोलकरांचे विचार आघाडीवर असणार आहेत. अंनिसचा विचार गेल्या दोन वर्षात प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचला आहे. एखादा विचार संपविण्याचा प्रयत्न केल्यास तो उफाळून वर येतो हे गेल्या दोन वर्षात डॉक्टरांच्या पश्चात या देशाने पाहिले आहे.
-----------------------------------------------------

0 Response to "दोन वर्षे झाली...!"
टिप्पणी पोस्ट करा