-->
स्वागतार्ह निर्णय

स्वागतार्ह निर्णय

संपादकीय पान शनिवार दि. ११ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
स्वागतार्ह निर्णय
आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करु देण्याबाबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायदे दुरुस्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे राज्यातील सुमारे ८० हजार आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने यापूर्वी या डॉक्टरांना ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास दिलेली परवानगी रद्द करुन तयंना बंदी घातली होती. त्यामुळे या डॉक्टरांनी ऩ्यायालयात धाव घेतली होती. १९६१च्या महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्यामध्ये जून २०१४ साली सरकारने सुधारणा केली व युनानी व आयुर्वेद डॉक्टरांना ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास बंदी केली होती. राज्यात कित्येक वर्षे खरे तर अशी प्रॅक्टिस करण्यास परवानगी होती. परंतु यात बदल करुन या डॉक्टरांना प्रतिबंध करण्यात आला होता. जून २०१४मध्ये सरकारने वविद्यमान कायद्यात सुधारणा केली होती व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या सक्तीच्या प्रशिक्षणानंतर आयुर्वेद व युनानीच्या डॉक्टारंना ऍलोपॅथिची अधिकृत परनागी दिली होती. एवढेच नव्हे तर एम.एस. व एम.डी. आयुर्वेद असणार्‍यांना मोतिबंदू, मूळव्याध, कुटुंब नियोजन, ऍपेंडिक्स यासारख्या छोट्या शस्त्रक्रिया कायद्याने करण्यास परवानगी दिली होती. त्याला ऍलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनेने कडाडून विरोध केला होता. शेइवटीसरकारने ऍळओफॅथी डॉक्टरांच्या दबावाला बळी पडून सरकारने हा निर्णय घेतला. मात्र कायद्याच्या कक्षेत हा वैध ठरला नाही. अर्थात हे प्रकरण आता जर सर्वोच्च न्यायालयात गेले तर याला परत निकाल लागेपर्यंत स्थगिती मिळू शकते. परंतु हा निर्णय बदलला जाण्याचा निर्णय वरचे न्यायालय घेईल असे वाटत नाही. खरे तर युनानी व आयुर्वेद तसेच ऍलोपॅथी असो ही तिनही मान्यताप्राप्त शास्त्र आहेत व वैद्यकीय शाखा आहेत. यात अर्थातच ऍलोपॅथीमध्ये संशोधन जास्त झाल्यामुळे ऍलोपॅथीने यात मोठी मजल मारली आहे. त्या तुलनेत आयुर्वेद व युनानी यांच्यात संशोधन कमी झाल्याने ही वैद्यकीय शाखा मागे पडली. यातील श्रेष्ठ कोण? अर्थातच वरकरणी कोणीही म्हणेल की, यात ऍलोपॅथीच. परंतु यात कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा प्रश्‍नच उद्दभवत नाही. यातील डॉक्टर हे आपापल्या शाखांमध्ये हुशार आहेत. परंतु ऍलोपॅथी डॉक्टर आपल्याला श्रेष्ठ समजत असल्यामुळे हा प्रश्‍न उद्दभवतो. ऍलोपॅथी डॉक्टरांचे असेही म्हणणे असते की, आम्ही एवढा पैसा खर्च करुन डॉक्टर झालो. आता आमच्यापेक्षा कमी पैसा खर्च करुन शिकलेले हे अन्य शाखांतील डॉक्टर आमच्याच बरोबरीने औषधे देतात हे आक्षेपार्ह आहे. ऍलोपॅथी डॉक्टर आपल्याला श्रेष्ठ म्हणत असल्याने व ते जास्त पैसा खर्च करुन  शिक्षण घेत असल्यामुळे त्यांचे म्हणणे योग्य आहे. मात्र त्याचबरोबर साध्या लहान मोठ्या रोगांवर जर युनानी व आयुर्वेद डॉक्टरांनी ऍलोपॅथी औषधे दिली तर त्यात चुकले ते काय, असा सवाल आहे. आज आपल्याकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची कमतरता आहे अशा स्थितीत ग्रामीण भागात ऍलोपॅथी डॉक्टर जाण्यास राजी नसतात. एवढेच कशाला एम.बी.बी.एस. केल्यावर जे एक वर्षाचे ग्रामीण भागातील सक्तीची पोस्टींग असते ती सुध्दा करीत नाहीत. त्याऐवजी अनेक जण दंड भरावयास तयार असतात. अशा वेळी ग्रामीण भागातील जनतेला आयुर्वेद व युनानी डॉक्टरांचा मोठा आधार वाटतो. खरे तर ऍलोपॅथी डॉक्टर असो किंवा कोणत्याही शाखेतील डॉक्टर प्रत्येकाला पहिली दहा वर्षे ग्रामीण भागात प्रॅक्टिस करण्याची सक्ति केली गेली पाहहिजे. ही प्रक्टिस सक्तीची हवी. दंड भरुन यातून मुक्तता करता येता कामा नये. त्याउलट आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना शहरात फारसा प्रॅक्टिस करण्यास वाव नसतो. त्यामुळे हे डॉक्टर ग्रामीण भागाकडे वळतात. येथे त्यांनी लोकांच्या सेवेसाठी जर ऍलोपॅथीची सेवा केली तर त्यात काही फार मोठा गुन्हा समजण्याचे कारण नाही. आपल्याकडे ग्रामीण भागासाठी खरे तर ऍलोपॅथीने एक खास अभ्यासक्रम काढावयास हवा. परंतु त्याकडे फारसे कुणी लक्ष देत नाही. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे द्रामीण भागातील जनतेची मोठी सोय होऊ शकते. मात्र असे करण्यासही ऍलोपॅथिचा विरोध असावा. तांत्रिकदृष्ट्या विचार करता भारतीय वैद्यक परिषदेच्या मानांकानुसार, ज्या पॅथीचे प्रशिक्षण घेतले आहे त्याच पॅथीची प्रॅक्टिस करणे बंधनकारक आहे. क्रॉस पॅथीला अजिबात मान्यता नाही. मग अशा वेळी आपल्याकडे असलेली डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता युनानी व आयुर्वेद डॉक्टरांना एखादी परिक्षा देऊन ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी द्यावी. परंतु त्या डॉक्टरांना पूर्णपणे ऍलोपॅथीची प्रॅक्टीस नाकारणे हा ग्रामीण भागातील जनतेवर होणारा अन्याय आहे. ऍलोपॅथीचा डॉक्टर आपल्या शिक्षणावर करोडो रुपये खर्च करतो ही बाब देखील सत्य आहे. मात्र ही तो कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी देणगी देण्यासाठी खर्च करतो. तो काही आपले शिक्षण घेण्याच्या काळात संशोधन करतो व त्यावर खर्च करतो असे नव्हे. त्यांच्या या खर्चात आयुर्वेद व युनानीचे जास्त डॉक्टर तयार होऊ शकतात. आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण हे पैसा कमविण्यासााठी असल्याची समजूत करुन घेऊन डॉक्टर घेत असतात. त्यामुळे आपण त्याची दिशा बदलण्याची आवश्यकता आहे. कोणतीही पॅथी चांगली व श्रेष्ठ हे रोगी ठरविणार आहे. माझ्यापेक्षा अन्य पॅथीचा डॉक्टर हा कनिष्ठ आहे असे समजण्याची गरज नाही. तिनही शाखातील डॉक्टर हे समान आहेत, रोगी कोणाकडे जायचे हे ठरवेल. त्यामुळे न्यायलयाच्या या निर्णयाचे स्वागत व्हावे.
------------------------------------------------------

0 Response to "स्वागतार्ह निर्णय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel