-->
दाऊद बोले...

दाऊद बोले...

रविवार दि. १२ जुलै २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
दाऊद बोले...
-----------------------------------------------
एन्ट्रो- गेल्या काही दिवसात दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकीकडे दाऊद आपण गुन्हेगार नाही तर एक व्यवसायिक आहोत असे सांगत असताना मुंबई बॉम्बस्फोटानंतर आपण भारतात परतण्याची तयारी दाखविली होती असे म्हटले आहे. दाऊदने भारतात परतण्याची तयारी दाखविली होती हे काही खोटे नाही, मात्र या कुख्यात गुंडाला त्याच्या अटीवर आणणे योग्य नाही असे तत्कालीन असलेल्या मुख्यमंत्री शरद पवारांनी केलेला दावाही योग्यच आहे. दाऊद अशा प्रकारे आपल्याविषयीच्या बातम्या पेरुन भारतात परतण्याची तयारी करीत आहे का, असा सवाल उपस्थित होतो. परंतु पाकिस्तान दाऊदला जिवंतपणी भारतात येऊ देणार नाही. कारण त्याच्याबरोबर अनेक पुरावे भारतात येतील ही पाकिस्तानला भीती आहे. आपल्याला पाक सरकार ठार मारेल या भीतीने दाऊद कदाचित भारतात परतण्याचा विचारही करीत असेल. भारतात परतून आपण अबू सालेमसारखे जेलमध्ये का होईना सुखाने आयुष्य जगू असा विचार त्याच्या मनाला शिवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच या जर तरच्या गप्पा झाल्या. मात्र दाऊदने मुलाखत देऊन नेमक्या कोणत्या चर्चेला तोंड फोडले ते लवकरच समजेल...
----------------------------------------------------------------
आन्तरराष्ट्रीय कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने अलिकडेच एका गुजराती चॅनेलला मुलाखत देऊन आपण बॉम्बस्फोटात सहभागी नव्हतो, असे म्हटले आहे. अर्थात ही मुलाखत खरी आहे की खोटी अशी शंका यावी. मात्र ही मुलाखत खरी आहे असे गृहीत धरली तरी दाऊद हे काही खरे बोलत नाही हे सारे जग सांगू शकते. कारण मुंबईच्या बॉम्बस्फोटात असलेला दाऊदचा सहभाग यात शंका घेण्यासारखे काहीच नाही. गेल्या काही दिवसात दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकीकडे दाऊद आपण गुन्हेगार नाही तर एक व्यवसायिक आहोत असे सांगत असताना मुंबई बॉम्बस्फोटानंतर आपण भारतात परतण्याची तयारी दाखविली होती असे म्हटले आहे. दाऊदने भारतात परतण्याची तयारी दाखविली होती हे काही खोटे नाही, मात्र या कुख्यात गुंडाला त्याच्या अटीवर आणणे योग्य नाही असे तत्कालीन असलेल्या मुख्यमंत्री शरद पवारांनी केलेला दावाही योग्यच आहे. इब्राहिम शरण येण्यास तयार आहे, असा प्रस्ताव ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी आपल्यापुढे ठेवला होता हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी हे मान्य केले आहे. मात्र देशद्रोहाचे आरोप असलेल्या दाऊदच्या अवास्तव मागण्या आणि जाचक अटींमुळे हा प्रस्ताव आपल्या तत्कालीन सरकारने फेटाळल्याचा खुलासा त्यांनी केला.
दाऊद भारतात परतण्यास तयार होता. मात्र महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हा प्रस्ताव अमान्य केल्याचे इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी म्हटले होते. जेठमलानी यांच्या या मुलाखतीने देशभर खळबळ उडवून दिली असताना शरद पवार यांनी हा प्रस्ताव का फेटाळला, यांचे स्पष्टीकरण त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे दिले. जेठमलानी यांनी आपल्यापुढे ठेवलेल्या प्रस्तावात दाऊद शरण येण्यास तयार आहे, मात्र मुंबईत आल्यावर आपल्याला अटक होता कामा नये. आपल्याला आपल्या घरीच राहण्याची परवानगी मिळावी, असे त्याचे म्हणणे होते. दाऊदच्या या जाचक अटी अमान्य करताना देशाच्या कायद्यापुढे कुणीच मोठा नाही. दाऊदला त्याचे पालन करावेच लागेल, अशी ठाम भूमिका आपण जेठमलानी यांच्यापुढे घेतल्याचे पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे बोलताना स्पष्ट केले. मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेला दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील हे दोघेही भारतात परतण्यास तयार होते.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन गँगमध्ये असणारे कट्टर वैर जगजाहीर आहे. याच शत्रुत्वापोटी मागील काही वर्षात अनेकदा दाऊदने छोटा राजनच्या हत्येचा कट रचला. मात्र त्यात त्याला यश आले नाही. अशाचप्रकारे दाऊदचा छोटा राजनला मारण्याचा आणखी एक कट फसल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दाऊदने छोटा शकीलच्या मदतीने छोटा राजनच्या हत्येचा कट रचला होता. छोटा शकीलने राजनच्या भारतातील एका विश्वासू सहकार्‍याला फोडून छोटा राजनचा ठावठिकाणा मिळवला. राजन ऑस्ट्रेलियाच्या न्यूकॅसल भागात वास्तव्याला होता.
यानंतर छोटा शकीलने मध्यपूर्व आशियातून काही शूटर्सना तिथे पाठवले. कुठल्याही परिस्थितीत राजनला संपवा, अशा सूचना या शूटर्सना देण्यात आल्या होत्या. मात्र सुदैवाने राजनला आधीच या कटाचा सुगावा लागला आणि काही तासांतच राजन ऑस्ट्रेलिया सोडून सुरक्षित स्थळी रवाना झाला. भारतीय गुप्तचर यंत्रणा भारतातील दाऊदच्या माणसांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यातही पाकिस्तानातून येणार्‍या फोन कॉल्सवर यंत्रणांचे विशेष लक्ष असते. एप्रिल महिन्यात कराचीहून भारतातील एका क्रमांकावर फोन आला होता. यात हिंदी आणि उर्दू भाषेत झालेल्या संभाषणातून यंत्रणेला दाऊदच्या या कटाची माहिती मिळाली होती. १९९३ साली दाऊदने मुंबईत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनंतर राजन दाऊदपासून वेगळा झाला होता. त्यानंतर या दोघांच्याही टोळ्यांमध्ये अनेकदा संघर्ष झाले होते. तर २००० साली बँकॉकमध्ये दाऊद टोळीने छोटा राजनवर प्राणघातक हल्ला केला होता. पण त्यावेळी राजन या हल्ल्‌यातून बचावला होता. त्यानंतर राजनने या हल्ल्‌याच्या सूत्रधारांना संपवण्याचा सपाटा लावला होता. मागील काही वर्षात हे दोघेही थंडावल्याने हे टोळीयुद्ध संपल्याची चर्चा होती. मात्र आता हाती आलेल्या या नव्या माहितीनंतर हा संघर्ष अजूनही सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी व मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाण्याबाबत मोदी सरकारमध्येच गोंधळ आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी लोकसभेत, दाऊदचा ठावठिकाणा आम्हाला माहीत नसल्याचे सांगून मोकळे झाले. प्रश्नोत्तराच्या तासात दाऊद कुठे आहे, असा प्रश्न भाजपाचे खासदार नित्यानंद राय यांनी विचारला होता. तर अवघ्या सहा तासांत दुसरे गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दाऊद हा पाकिस्तानातच राहत असल्याचे ठामपणे सांगितले. दाऊदला पाकिस्तानने आश्रय दिला असल्याचे जगजाहीर असताना मंगळवारी संसदेत, दाऊद कुठे आहे, याची काहीच कल्पना नसल्याचे सरकारने सांगितल्यावर संपूर्ण देशात गोंधळ उडाला.
डिसेंबर २०१४ मध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दाऊद पाकिस्तानात असून कराचीमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या वक्तव्यानंतर सरकारची परस्परविरोधी भूमिका उघड झाली. १९९३ साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दाऊदविरोधात सबळ पुरावे देत दाऊदला ताब्यात देण्याची मागणी त्यावेळी भारताने पाकिस्तानकडे केली होती. दाऊद अशा प्रकारे आपल्याविषयीच्या बातम्या पेरुन भारतात परतण्याची तयारी करीत आहे का, असा सवाल उपस्थित होतो. परंतु पाकिस्तान दाऊदला जिवंतपणी भारतात येऊ देणार नाही. कारण त्याच्याबरोबर अनेक पुरावे भारतात येतील ही पाकिस्तानला भीती आहे. आपल्याला पाक सरकार ठार मारेल या भीतीने दाऊद कदाचित भारतात परतण्याचा विचारही करीत असेल. भारतात परतून आपण अबू सालेमसारखे जेलमध्ये का होईना सुखाने आयुष्य जगू असा विचार त्याच्या मनाला शिवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच या जर तरच्या गप्पा झाल्या. मात्र दाऊदने मुलाखत देऊन नेमक्या कोणत्या चर्चेला तोंड फोडले ते लवकरच समजेल.
-------------------------------------------------------------------------------

0 Response to "दाऊद बोले..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel