ललित मोदींचा व्टिटर बॉम्ब
संपादकीय पान शुक्रवार दि. ०३ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ललित मोदींचा व्टिटर बॉम्ब
आय.पी.एल.चे ऐकेकाळचे सर्वेसर्वा ललित मोदी यांनी सध्या एकापाठोपाठ व्टिटरवरुन बॉम्बगोळे फेकल्याने देशाताील केवळ सत्ताधार्यांनाच नव्हे तर विरोधकांना म्हणजे कॉँग्रेसलाही हादरे बसले आहेत. गेले काही वर्षे लंडनमध्ये विजनवासात असलेले ललित मोदी मध्यंतरी एकदम प्रकाशझोतात आले. सर्वात प्रथम त्यांना विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याच्या प्रकरणाने ते उजेडात आले. त्यानंतर त्यांना भेटलेल्या लोकांची एक मालिकाच जाहीर झाली. एकूणच पाहता आर्थिक गुन्हेगार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या सुुटाबुटातल्या गुन्हेगाराला माफी व साध्या गुन्हेगांराना मात्र अटक अशी आपल्याकडील स्थिती असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मोदी देखील आपण या सर्वच प्रकरणाने पुन्हा एकदा वादाच्या का होईना भोवर्यात सापडलो व प्रकाशझोतात आलो त्याबद्दल खुषीत असतील. आता पुन्हा एकदा त्यांनी व्टिटरवरुन बॉम्ब टाकला आहे. यातून हे प्रकरण वाढतच जाणार आहे व त्यात सत्ताधारी भाजपा अडचणीत येण्याची शक्यता जास्त आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून सरकारी धोलपूर पॅलेसचा बळजबरीने व अवैधरीत्या ताबा मिळविला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. ललितगेट वादामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच नव्या आरोपांमुळे राजे यांच्या अडचणीत भर पडली. वसुंधरा राजे यांचे विभक्त झालेले पती हेमंतसिंग यांनी धोलपूर पॅलेस ही राजस्थान सरकारची मालमत्ता असल्याची कबुली न्यायालयात दिली होती. १९५४ ते २०१० या काळात महसूल विभागाच्या अनेक दस्तऐवजातही तसा उल्लेख आढळतो. राजे आणि ललित मोदी यांच्या नियंत हेरिटेज हॉटेल या कंपनीने धोलपूर पॅलेसचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर करताना शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर राज्य सरकारची कोणतीही भूमिका राहिली नाही. २००९ नंतर हे घडले. राजे यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात नियंत हेरिटेज हॉटेलमध्ये पुत्र दुष्यंतसिंग, सून निहारिका व ललित मोदी यांच्यासोबत शेअर्स खरेदी केल्याचा उल्लेख केला. राजेंकडे ३२८०, तर पुत्र व सुनेकडे प्रत्येकी ३२२५ शेअर्स तर मोदी यांच्या आनंद हेरिटेज हॉटेल प्रा. लिमिटेडमध्ये ८१५ शेअर्स असल्याची बाब राजे यांनी नमूद केली. यातून त्यांचे फरार मोदींशी असलेले व्यावसायिक संबंध उघड होतात, हे सस्पष्टच आहे. या कंपनीत गुंतवणुकीसाठी मॉरिशस मार्गाचा अवलंबण्यात आला. कर वाचविण्यासाठी मॉरिशसमध्ये गुंतवणूक दाखविण्यात आली असा आरोपही रमेश यांनी केला. धोलपूर पॅलेस खासदार दुष्यंतसिंग यांच्या मालकीचा नसल्याचा रमेश यांनी केलेला दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी व राजस्थानचे आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड यांनी फेटाळला आहे. हेमंतसिंग यांनी धोलपूरची मालकी दुष्यंत यांच्याकडे सोपविल्यासंबंधी न्यायालयीन दस्तऐवज दाखवत परनामी यांनी आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले. परंतु अशा प्रकारे असलेली ही ऐतिहासिक वास्तू सरकारने विकली का असाही मुद्दा उपस्थित होतो. भाजपा नेेते वरुण गांधी यांनी कॉंग्रेससोबतचे वाद मिटवण्यासाठी तब्बल ३८० कोटी रुपये मागितले होते असा गौप्यस्फोट ललित मोदी यांनी केला आहे. तर वरुण गांधी यांच्या निकटवर्तीयांनी ललित मोदींच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळेल. दररोज नवनवीन नेत्यांची पोलखोल करणारे आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी वरुण गांधींवर व्टिटरव्दारे टीका केली. काही वर्षांपूर्वी वरुण गांधी हे माझ्या लंडनमधील निवासस्थानी भेट घेण्यासाठी आले होते. कॉंग्रेससोबतचा वाद मिटवू शकतो, यासाठी ३८० कोटी रुपये द्या असे वरुण गांधींनी सांगितल्याचा दावा ललित मोदींनी ट्विटरद्वारे केला आहे. वरुण गांधींनी हे प्रकरण मिटवण्यासाठी सोनिया गांधी यांची इटलीत राहणारी बहिण मदत करु शकते असे सांगितले होते, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ललित मोदीप्रकरणात अडचणीत आलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याच्या मोबदल्यात राज्यसभेत जीएसटी विधेयकाला पाठिंबा देण्याची ऑफर कॉंग्रेसने भाजपाला दिली आहे. २१ जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. भाजपाकडे राज्यसभेत बहुमत नसून कॉंग्रेसने याच मुद्द्यावरुन भाजपाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कॉंग्रेसने भाजपाकडे एक प्रस्ताव पाठवला होता. यात जीएसटी विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवण्यात आली, मात्र त्या मोबदल्यात सुषमा स्वराज व वसुंधरा राजे या दोघांचे राजीनामे घ्यावेत अशी अट भाजपासमोर ठेवण्यात आली होती. राज्यसभेत जीएसटीवरील मतदानाच्या वेळी कॉंग्रेस सभागृहातून वॉकआऊट करेल अशी तयारीही दाखवण्यात आली होती. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींनी हा प्रस्ताव धुडकावून लावल्याचे वृत्तात म्हटले आहे. भाजपाने हा प्रस्ताव स्वीकारला तर ललित मोदीप्रकरणातील चुक कबूल केल्याचे स्पष्ट होईल व विरोधकांचे मनोबलही वाढेल असे भाजपा पक्षश्रेष्ठींना वाटते. परंतु यातून मोदींना सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांचा बळी घेता येईल. यामुळे त्यांची पक्षातील एकाधिकारशाही अजून मजबूत होईल. त्यामुळे या बातमीत काही तथ्य असू शकते. कारण प्रत्येक बाबतीत भाष्य करणारे नरेंद्र मोदी या सर्व प्रकरणी मात्र जाणूनबुजून मौन पाळून आहेत. त्यांनी मौनी व्रत धारण केल्याने सर्वत्र सन्नाटा आहे. यातून काय राजकारण घडते ते भविष्यात दिसेलच.
-----------------------------------------------------------------

0 Response to "ललित मोदींचा व्टिटर बॉम्ब"
टिप्पणी पोस्ट करा