-->
सोन्याची लकाकी संपली?

सोन्याची लकाकी संपली?

रविवार दि. २६ जुलै २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
सोन्याची लकाकी संपली?
----------------------------------------
सोन्याच्या किंमती या जागतिक पातळीवर ठरतात. सध्या जागतिक पातळीवर प्रामुख्याने युरोपीयन देशांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यातील काही देश आपल्याकडील सोन्याचा साठा विक्रीस काढीत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. अर्थात भारतात व चीनमध्ये खरेदी होत असली तरीही त्यामुळे किंमती काही वाढत नाहीत. याचे कारण युरोपातील देशांच्या सोन्याच्या विक्रीमुळे सोन्याच्या किंमतीवाढीवर निर्बंध येत आहेत. तसेच अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा उभारी येईल असा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच अमेरिकेतील व्याजाचे दर वाढणार आहेत. यामुळे सोन्याचे दर जागतिक पातळीवर घसरु लागले आहेत. सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत सुरिक्षत व या गुंतवणुकीवर सतत वाढील लाभ मिळाला असल्याने आपल्याकडील सोन्यातील गुंतवणूक ही वाढतच जाईल...
----------------------------------------------
सोन्याने नुकताच पाच वर्षांचा निचांक गाठला. प्रति दहा ग्रॅम सोने पंचवीस हजार रुपयांच्या खाली आले. गेल्या दोन वर्षात सोन्याच्या किंमती घसरतच होत्या परंतु सोने एवढे खाली जाईल अशी कुणालाच कल्पना नव्हती. आता सोने अजून दोन हजार रुपयांनी घसरेल असेही बोलले जात आहे. सोने किती उतरेल याचा सध्या तरी अंदाज बांधणे कठीण असले तरीही सद्या तरी सोन्याच्या किंमती वधारणार नाहीत हे नक्की. सोन्यामध्ये दर दहा वर्षांनी किंमतींची वध-घट होत असते. परंतु गेल्या चार दशकांचा विचार करता सोन्याची सध्या झालेली घसरण ही जरा जास्तच आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती पुढे वाढणारच नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. अर्थात आपल्याकडे सोन्याचे ग्राहक एवढे निष्ठावान आहेत की, सद्या सोन्याच्या किंमती उतरलेल्या असल्याने ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यावरुन सोन्याच्या खरेदीदारांच्या विश्‍वासाला काही तडा गेलेली नाही हे नक्की.
गेल्या वर्षी लोकांनी सोने खरेदी कमी करावे यासाठी सरकारने जाणूनबूजून प्रयत्न केले आहेत. त्या प्रयत्नाला यश येईल असे दिसत नाही. सोने खरेदीचे वेड आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले आहे. त्यापेक्षाही सोने खरेदी ही कोणत्याही वर्गातील व्यक्तीसाठी फार सुलभ ठरतेे. यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सोन्याची खरेदी व विक्री आपण कुठेही व केव्हांही करु शकतो. म्हणजे एखाद्याला खेडेगावतही अचानक पैशाची गरज लागल्यास तो आपल्या घरातील पदरी असलेले सोने विक्रीस काढून आपली गरज भागवू शकतो. सोन्याच्या या बाजारातील तरलतेमुळे सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर ठरते. तसेच सोन्यातील गुंतवणुकीवर आजवर सतत लाभ वाढतच गेले आहेत. काही अपवादात्मक वर्ष वगळता दरवर्षी सोन्याच्या किंमती वाढतच गेल्याने सोन्यातील गुंतवणूक ही लाभदायक ठरते. त्यामुळे आपल्याकडे सोन्यातली गुंतवणूक लाभदायक ठरल्याने यातील गुंतवणूक गेल्या काही वर्षात वाढत जात सुमारे एक हजार टनांवर गेली होती. आपण जरी सोन्याची खरेदी आपल्या लाभासाठी करीत असलो तरीही सोने खरेदीमुळे देशाच्या तिजोरीवर मात्र भार पडत असतो. कारण सोने आपल्याला आयात करावे लागतेे. त्यामुळे देशाचे अमूल्य परकीय चलन आपल्याला खर्च करण्यशिवाय अन्य काही मार्ग शिल्लक राहात नाही. सध्या आपण सर्वाधिक परकीय चलन हे पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर खरेदी करतो. ही खरेदी करण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही. कारण आपल्याकडे पेट्रोलियम पदार्थांची जेवढी गरज आहे त्याच्या ८० टक्के उत्पादन हे आयातच करावे लागते. आपली विकसनशील अर्थव्यवस्था असल्याने ही आयात कमी करता येणार नाही. एकवेळ सोने खरेदीला लगाम आपण लावू शकतो. परंतु पेट्रोलियम पदार्थांची खरेदी थांबवू शकत नाही. अशा वेळी सरकारने आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सोने खरेदीवर काही निर्बंध लादले. त्यामुळे सोन्याची खरेदी कमी होईल व परकीय चलन आपले वाचू शकेल हा मूळ हेतू होता. सोन्याच्या किंमती या जागतिक पातळीवर ठरतात. सध्या जागतिक पातळीवर प्रामुख्याने युरोपीयन देशांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यातील काही देश आपल्याकडील सोन्याचा साठा विक्रीस काढीत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. अर्थात भारतात व चीनमध्ये खरेदी होत असली तरीही त्यामुळे किंमती काही वाढत नाहीत. याचे कारण युरोपातील देशांच्या सोन्याच्या विक्रीमुळे सोन्याच्या किंमतीवाढीवर निर्बंध येत आहेत. तसेच अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा उभारी येईल असा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच अमेरिकेतील व्याजाचे दर वाढणार आहेत. यामुळे सोन्याचे दर जागतिक पातळीवर घसरु लागले आहेत. सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत सुरिक्षत व या गुंतवणुकीवर सतत वाढील लाभ मिळाला असल्याने आपल्याकडील सोन्यातील गुंतवणूक ही वाढतच जाईल. जगात सोन्याचा सर्वाधीक मोठा ग्राहक हा भारत आहे व त्या खालोखाल चीन व अमेरिकेचा क्रमांक लागतो. भारतातील खरेदी ही जगात सर्वाधिक असली तरीही सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे लंडनच्या सोने-चांदी बाजारात ठरतात. त्यामुळे सोन्याच्या किमतीमागे बर्‍याचदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतात. अमेरिकेत अशी सकारात्मक परिस्थिती निर्माण होत असताना युरोपातील अनेक देशांची अर्थव्यवस्था मात्र खालावत चालली आहे. आयर्लंड, स्पेन, ग्रीस या देशांच्या पाठोपाठ आता सायप्रस देशाला आर्थिक खाईतून बाहेर काढण्यात आले. गुंतवणूक गुरू म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या जॉर्ज सोरोस यांनीदेखील आपली सोन्यातील गुंतवणूक गेल्या वर्षभरात कमी-कमी करीत आता शून्यावर आणली. सोन्यातील गुंतवणुकीच्या किमतीच्या वाढीचा बहर आता संपला असून यापुढे सोन्याच्या किमतीच्या वाढीला अनेक मर्यादा आहेत, असे सोरोस यांचे म्हणणे आहे. सोरोस यांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेतल्याचे समजताच अमेरिकेतील गोल्ड एक्स्चेंज फंडातून गेल्या वर्षात गुंतवणूकदारांनी सुमारे ७.७ अब्ज डॉलर एवढ्या रकमेचे सोने काढून घेतले. परंतु सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरतील ही शक्यता सध्या तरी कमी वाटते. सध्या झाकोळलेली सोन्याची ही स्थिती हंगामी ठरावी असेच दिसते. अर्थात सोन्याबाबत निराशाजनक चित्र जागतिक पातळीवर असले तरीही सोने खरेदीत भारत व चीन या दोन देशांतील नागरिकांनी आपली आघाडी कायम राखली आहे. उलट सोन्याच्या किमती घटल्यास या दोन देशांत सोन्याची खरेदी वाढेल. त्यामुळे सोन्यात जे दीर्घकालीन गुंतवणूक करु इच्छितात त्यांच्यासाठी घसरलेल्या किंमती ही एक उत्तम संधी ठरु शकते.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "सोन्याची लकाकी संपली?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel