-->
कमोडिटी सौद्यांसाठी करारविषयक तपशील कोण निर्धारित करतो?

कमोडिटी सौद्यांसाठी करारविषयक तपशील कोण निर्धारित करतो?

कमोडिटी सौद्यांसाठी करारविषयक तपशील कोण निर्धारित करतो? 
Published on 19 Mar-2012 ARTHPRAVA
प्रसाद केरकर, मुंबई
जे एक्स्चेंज कमोडिटी वायदा कॉन्ट्रॅक्ट्स केले जातात तेच एक्स्चेंज करारविषयक तपशीलही बाजार नियामक संस्था-फॉरवर्ड मार्केट कमिशन (एफएमसी) कडून आवश्यक ती मंजुरी मिळवल्यावर निर्धारित करते. 
एखाद्या फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टच्या पूर्ततेपूर्वीच करारविषयक तपशील बदलता येतात का? 
विशिष्ट कॉन्ट्रॅक्ट एकदा झाल्यानंतर तो जोवर पूर्ण होत नाही तोपर्यंत किंवा एक्स्चेंजने ठरवून दिलेल्या ट्रेडिंग चक्राच्या पूर्णत्वापर्यंत संबंधित करारविषयक तपशील बदलले जाऊ शकत नाही. 
कमोडिटी फ्यूचर्सचा जीवनकाळ काय असतो? 
नुकसान टाळले जावे यासाठी स्टॉप लॉस ऑर्डर दिली जाते, जी मुळात कमोडिटीच्या वायदा किमतीतील प्रतिकूल हालचालींच्या पार्श्वभूमीवर अवलंबली जाते. या प्रकारची ऑर्डर ट्रेडिंग प्रणालीत प्रलंबित वा सुप्त ठेवली जाते. जोवर त्या विहित पातळीपर्यंत किंमत पोहोचत नाही तोवर ऑर्डर लागू होत नाही. प्रचलित व्यवहार स्थितीतून अधिक नुकसान न होता हात मोकळे करण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. 
कमोडिटी फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टची अंतिम तारीख (एक्स्पायरी डेट) काय असते? 
ही तारीख म्हणजे त्या विशिष्ट कॉन्ट्रॅक्टच्या मुदतीचा/अस्तित्वाचा अंतिम दिवस असतो, ज्या दिवशी सौदापूर्तीची किंमत करारविषयक तपशिलानुसार ठरवली जाते. 
कॉन्ट्रॅक्टच्या मुदतपूर्तीच्या अंतिम दिवशी सुटी आल्यास काय होते? 
अंतिम दिवशी सुटी आली असल्यास कॉन्ट्रॅक्टची अखेर त्यानंतर लगेच येणार्‍या कार्यदिनी होते. अकस्मातपणे सुटी जाहीर झाली असल्यास कॉन्ट्रॅक्टची अखेर त्यानंतरच्या कार्यदिनी होते. 
कमोडिटी फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टची ‘बेस प्राइस’ काय असते? 
जेव्हा कॉन्ट्रॅक्ट सुरू होतो तेव्हा एक्स्चेंजकडून बेस प्राइस ठरवली जाते. ही किंमत म्हणजे त्या कमोडिटीची कॉन्ट्रॅक्ट होण्यापूर्वीच्या आदल्या दिवशी बंद झालेली स्पॉट किंमत असते, ज्यात कॉस्ट ऑफ कॅरीची भासमान होणारी रक्कम मिळवली जाते. इतर दिवसांतही आधीच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये बंद झालेली किंमत बेस प्राइस म्हणून ग्राह्य धरली जाते. 
कमोडिटी फ्यूचर कॉन्ट्रॅक्टमध्ये बंद किंमत (क्लोजिंग प्राइस) काय असते आणि ती कशी काढली जाते? 
प्रत्येक व्यवहार झालेल्या दिवसाच्या अखेरीस एक्स्चेंजची ऑनलाइन ट्रेडिंग सिस्टिम व्यवहार प्रणालीवर असलेल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टची बंद झालेल्या किमतीची मोजदाद करीत असते. अंतिम 30 मिनिटांमध्ये सर्व व्यवहारांची ती महत्तम सरासरी किंमत असते. अंतिम 30 मिनिटांत झालेल्या व्यवहारांची संख्या 5 पेक्षा कमी असल्यास त्या दिवसांत घडलेल्या अंतिम 5 अमलात आलेल्या व्यवहार किमतींची महत्तम सरासरी किंमत काढली जाते. दिवसभरात झालेले त्या कमोडिटीतील व्यवहार पाचपेक्षा कमी असतील तर जितके व्यवहार अमलात आले त्या किमतींची सरासरी काढली जाते. दिवसभरात कॉन्ट्रॅक्टसाठी कोणतेच व्यवहार झाले नसतील तर त्या आधीच्या दिवसातील वा ट्रेडिंग सेशनमधील अंतिम किंमत कॉन्ट्रॅक्टसाठी ग्राह्य धरली जाते. 
प्राइस लिमिट सर्किट फिल्टर काय असते किंवा डेली प्राइस रेंज (डीपीआर) कशाला म्हटले जाते? 
सामान्य ट्रेडिंग सेशनमध्ये विशिष्ट कमोडिटीमध्ये कुठवर भावात वाढ-घट होऊ द्यावी यानुसार एक्स्चेंजकडून डेली सर्किट फिल्टर निश्चित केले जातात. अन्य शब्दांत सांगायचे तर सर्किट फिल्टर एका विशिष्ट सेशनमध्ये कॉन्ट्रॅक्टचे व्यवहार होण्यासाठी कमाल व किमान किमतीचा टप्पा ठरवते. 
सर्व कमोडिटींसाठी सर्किट फिल्टर एकसारखेच असते काय? 
प्रत्येक कमोडिटीनुरूप सर्किट फिल्टर वेगवेगळे असते. फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टची आखणी करताना पूर्व-इतिहासात त्या कमोडिटीत दिसून आलेल्या किमत चंचलतेवर हे प्रमाण अवलंबून असते. 
जर कोणी खरेदीची ऑर्डर सर्किट फिल्टर र्मयादेच्या पलीकडे दिली असल्यास काय होते? 
ट्रेडिंग प्रणालीतून अशी ऑर्डर आपोआपच नाकारली जाते. 
स्पेशल माजिर्न काय असते? 
किमतीतील अतिरिक्त चढ-उतार टाळण्यासाठी एक्स्चेंजकडून आकारल्या जाणार्‍या विशेष माजिर्नला ‘स्पेशल माजिर्न’ म्हटले जाते. ‘स्पेशल माजिर्न’ ही कमोडिटीनुरूप वेगवेगळी असते. 
करारविषयक तपशिलात उल्लेख असलेल्या ‘प्राइस कोट’चा अर्थ काय? 
कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेली ‘प्राइस कोट’ म्हणजे ज्या बाजारपेठ/ठिकाणाहून संबंधित कमोडिटी फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टचे मूल्य ठरवण्यासाठी स्पॉट किंमत गृहीत धरण्यात आली ती बाजारपेठ/स्थळ हे त्या विशिष्ट कमोडिटीच्या उत्पादन वा व्यापाराचे प्रमुख केंद्र असू शकते. उदाहरणार्थ- रबराचे ‘प्राइस कोट’ हे केरळमधील कोट्टायम हे गृहीत धरले गेले आहे, जे रबराचे उत्पादन व व्यापाराचे मोठे केंद्र आहे. त्याचप्रमाणे सोन्याच्या वायदा सौद्यांसाठी अहमदाबाद हे प्राइस कोट धरले गेले आहे. किमतीत विक्री कर, व्हॅट तसेच अन्य कर व अधिभार यांचा समावेश आहे की नाही हेही प्राइस कोटमध्ये नमूद करावे लागते. 
prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "कमोडिटी सौद्यांसाठी करारविषयक तपशील कोण निर्धारित करतो?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel