मॅगीच्या धुमाकूळला आवर
संपादकीय पान शुक्रवार दि. ५ जून २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मॅगीच्या धुमाकूळला आवर
सध्या मध्यमवर्गीयांच्या घरांपासून ते चार पैसे कमाविणार्या सर्वसामान्यांच्या घरात मॅगीवरील चर्चेने धुमाकूळ घातला आहे. दोन मिनिटात तयार होणारा हा खाद्य पदार्थ म्हणजे नोकरदार महिलांसाठी एक वरदानच होते. बरे याचठी जाहीरात अशा प्रकारे केली होती की, मुलांनाही याचे व्यसनच लागावे. त्या जाहीराती करण्यासाठी अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षित, प्रिती झिंटा यांना बक्कळ पैसे देऊन आमंत्रिते केले होते. सध्याच्या काळात चित्रपटातले हिरो हिरॉईन्स हेच आदर्श असल्यामुळे त्यांच्या या जाहीरातींची भूल मुलांपासून पालकांपर्यंत पडली होती हे वास्तव नाकारता येणार नाही. गेली तीन दशके मॅगी देशात विकली जात आहे; पण हा पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक आहे, असा वाद आजपर्यंत एकदाही उफाळून आलेला नव्हता. सुमारे तीन दशकांपूर्वी देशात फास्ट फूडचे आगमन झाले, तेव्हापासून झटपट नूडल्सचे अनेक प्रकार बाजारात येऊन गेले; पण मॅगी नावाच्या ब्रँडला आजपर्यंत धक्का बसलेला नाही. आजची नोकरी व करिअर करणारी आधुनिक स्त्रीही आपल्या लहान मुलाला वेळप्रसंगी झटपट मॅगीच करून देते. अनेकांच्या जीवनात मॅगी आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य व सवयीचा पदार्थ झाला आहे, हे स्वीकारायला हवे. एकंदरीत हा पदार्थ उद्या आपल्या खाद्यसंस्कृतीतून हद्दपार झाल्यास हळहळणार्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात असेल. काळ्या पैशाचे माहेरघर म्हणून ओलखल्या गेलेल्या स्वित्झर्लंड देशातल्या नेस्ले कंपनीचा हा ब्रँड आज १३० देशांत खपत असून भारतात मॅगीची उलाढाल नेस्ले कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे ३० टक्क्यांच्या आसपास आहे. यावरून मॅगीची बाजारपेठ कशी देशव्यापी पसरलेली आहे, हे लक्षात येते. अशा या मॅगीच्या ब्रँडमध्ये जीवनास अनेक घातक पदार्थ असल्याची जाग अचानक कशी आली? म्हणजे सरकार एवढे काळ हा माल जनतेच्या पोटात कोणतीही चौकशी न करता घालू देत होते असाही होतो. मॅगीविषयी आता येत असलेल्या बातम्या पाहून ते खाणार्यांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. नेस्लेसारखी बहुराष्ट्रीय कंपनी अशा प्रकारे हे उत्पादन जगात विकते, मात्र भारतात विकते त्याचा दर्जा किती खालच्या पातळीवर आहे हे वास्तव आता आपल्याला समजले आहे. मध्यंतरी कॅडबरीत अळ्या सापडल्या होत्या. मॅकडोनाल्ड, पेप्सी, कोक या कंपन्यांच्या उत्पादनातही त्रुटी आढळल्या होत्या. पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग अशा पाश्चात्त्य खाद्यपदार्थांतही उणिवा आढळल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पेप्सी व कोकच्या बाबतीत तर टिकेचे टोक गाठले गेले होते. पण त्या वेळी सरकारने अशी व्यापक कारवाई हाती घेतली नव्हती. देशातली रेडी टू ईटफ बाजारपेठ झपाट्याने वाढत असताना खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्या सरकारी यंत्रणा अपुर्या आहेत, याकडे सरकारचे लक्ष नाही. लोकांवर सतत आदळणार्या आकर्षक जाहिराती, रंगीबेरंगी वेष्टनं व सेलिब्रेटींच्या जाहिरातबाजीला भुलून सारासार विचार न करता वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक लक्षावधी आहेत. पण अशा वस्तूंना सरकार मंजुरी कोणत्या निकषावर देते येथपासून त्या विक्रीस येतात कशा, याबाबत कसलेच विश्वासार्ह चित्र ग्राहकापर्यंत पोहोचत नाही. लष्कराने मॅगीवर तूर्त बंदी घातली असली तरी देशातल्या अनेक राज्यांमध्ये मॅगीवरील बंदीबाबत एकसूत्रता नाही. गोव्याने बंदी घातलेली नाही. महाराष्ट्रात यावर अद्याप एकमत झालेले नाही. उत्तर प्रदेश वगळता जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यापासून पूर्वेकडील राज्यांनी त्यावर बंदी आणलेली नाही. दक्षिणेतही असेच चित्र आहे. आपल्याप्रमाणे पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश व श्रीलंकेमध्येही हा ब्रँड लोकप्रिय आहे. पण या देशांमध्ये या पदार्थाविषयी वाद निर्माण झालेला नाही. हे प्रकरण अजून काही दिवस प्रसारमाध्यमांतून चघळले जाईल. बड्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या व सरकार यामधील नवा संघर्षही त्या निमित्ताने पाहायला मिळेल. कदाचित न्यायालयीन लढाया होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यातून लोकांच्या आरोग्यासाठी सरकारी यंत्रणा झटत आहेत, असे चित्रही दिसेल; पण त्यावरून ग्राहकांचा कंपनी किंवा सरकारी यंत्रणांच्या कारभारावर विश्वास बसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मॅगीच्या या चौकशीला कॉर्पोरेट युध्दाचाही वास असल्याचे बोलले जाते. मात्र ज्या राज्यात मॅगती अजिनो मोटो व शिशाचे प्रमाण जास्त आढळले त्याचे काय, असाही प्रश्न आहेच. आज आपल्याकडे अन्न व औषध प्रशानाचे कायदे अस्तित्वात असले तरी त्याची अंमलबजावणी फारशी कडकरित्या होत नाही. त्यामुळे आपल्याकडे जशी औषध विक्री अनेक कायदे धाब्यावर मारुन होते तसेच मॅगी वा पॅक फूडचे ठरु शकते. आपल्याकडे कोणताही कायदा सहजरित्या वाकविला जातो किंवा मोडला जातो तर काही वेळा कायद्यातही सुधारणा केल्या जातात. याची कल्पना असल्यामुळे नेस्ले काय किंवा अन्य कोणत्याही कंपन्या पॅक फूडच्या बाबतीत असलेले नियम कडक पाळण्यास धजावत नाहीत. यासाठी आता तरी प्रत्येक पॅक फूडची चौकशी करुन तसेच त्यांची वेळोवेळी सॅम्पल तपासून त्यांच्यावर वचक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कदाचित आपल्याकडे पॅकिंग करण्याच्या पध्दतीतील दोषांमुळे हे पदार्थ खराब होण्याच धोका असू शकतो. त्याची नेमकी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता बाळगण्याची गरज आहे.
------------------------------------------------------

0 Response to "मॅगीच्या धुमाकूळला आवर"
टिप्पणी पोस्ट करा