
खोटारडेपणा ओळखणारे सॉफ्टवेअर प्रसाद केरकर, मुंबई Published on 09 Dec-2011 KIMAYA |
संगणक क्रांतीने आपले संपूर्ण जीवनच आता व्यापून टाकले आहे. पावलोपावली संगणक आणि त्यातील सॉफ्टवेअरचा वापर आपल्यासाठी नित्याचा झाला आहे. अर्थातच त्यामुळे आपले जीवन सुकर होत चालले आहे. दिवसेंदिवस आता नवनवीन सॉफ्टवेअरचे शोध लागत असून आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याची पावलोपावली गरज भासू लागली आहे. त्यामुळे संगणक क्रांती आपले जीवन अधिकच व्यापून टाकत आहे. आता तर एखाद्या माणसाचा खोटारडेपणा ओळखणारा सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. स्टँडफोर्डमधील विद्यापीठातील प्राध्यापकांनी अशा प्रकारचा सॉफ्टवेअर विकसित केल्याने भविष्यात आपल्याशी कोण कशा प्रकारे खोटे बोलत आहे, ते सहजरीत्या समजू शकेल. अर्थात सध्या अस्तित्वात असलेल्या ‘लाइव्ह डिटेक्शन’ टेस्टसारखे एखाद्या व्यक्तीला मशीनमध्ये घालण्याची आवश्यकता नाही, तर हा सॉफ्टवेअर बोलणार्या व्यक्तीची ढब, दोन शब्दांमधील अंतर, आवाजातील चढ-उतार यावरून तो खरे बोलतोय की खोटे ते बरोबर ओळखतो. डॉ. हेरिसबर्ग यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले असून गेल्या तीन वर्षांत त्यांनी यासाठी फार मोठे संशोधन केले आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात हे सॉफ्टवेअर विकसित केल्यावर अनेक जणांवर तपासूनही पाहिले. त्यांनी या सॉफ्टवेअरसाठी चार मिनिटांच्या भाषणात भाषेच्या लकबी माणूस कशा प्रकारे करतो याचा पूर्णपणे अभ्यास केला. माणूस खरे बोलत असताना त्याचा आवाज व खोटे बोलत असतानाचा आवाज यात फरक आढळतो. आपण बोलत असताना त्यात आपल्या भावना व्यक्त होत असतात. माणूस खोटे बोलत असताना यातून नेमका पकडला जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर हाच बारकावा नेमका पकडते. अर्थात न्यायालयात या सॉफ्टवेअरचे म्हणणे ग्राह्य धरले जाऊ शकत नाही. कारण अनेक तर्कांच्या आधारावर हे सॉफ्टवेअर आपले मत तयार करते. याला अजूनही योग्य असा शास्त्रीय पुरावा देता येणार नाही. मात्र, यामुळे गुन्हेगार शोधण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते. हा सॉफ्टवेअर ज्यांनी विकसित केले आहे, त्यांच्या दाव्यानुसार, यानुसार काढलेले अनुमान 70 टक्क्य़ांपर्यंत खरी ठरली आहेत. मात्र, काही जणांच्या मते हे प्रमाण 57 टक्केच आहे; पण हा सॉफ्टवेअर खोटे बोलण्याचे प्रमाण किती प्रमाणात खरे सांगू शकतो यापेक्षाही यात भविष्यात आणखी संशोधन करून हे प्रमाण वाढवता येऊ शकेल. एक बाब स्पष्ट आहे की, खोटारडेपणा ओळखणारे सॉफ्टवेअर सध्यातरी विकसित झाले आहे. यात आणखी काही सुधारणा भविष्यात करता येऊ शकतील आणि हे तंत्रज्ञान आणखी चांगल्या तर्हेने विकसित करता येऊ शकेल. सध्या तयार करण्यात आलेले हे सॉफ्टवेअर म्हणजे खोटारडी माणखे ओळखण्याच्या दृष्टीने पडलेले पहिले पाऊल ठरावे. Prasadkerkar73@gmail.com |
0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा