-->
साबीर भाटिया : हॉटमेलच्या सहसंस्थापकाची नवी भेट

साबीर भाटिया : हॉटमेलच्या सहसंस्थापकाची नवी भेट

साबीर भाटिया : हॉटमेलच्या सहसंस्थापकाची नवी भेट
Published on 03 Dec-2011 PRATIMA
 साबीर भाटिया हे नाव आपल्या डोळ्यांपुढे आले की, लगेचच आठवण होते ती हॉटमेलची. जगातील नेटवर आधारित पहिली निरोप पाठवण्याची वा स्वीकारण्याची (ई-मेल) सेवा ही सर्वात पहिल्यांदा त्यांनी सुरू केली. साबीर भाटिया या महान संशोधकाने आता जगाला एक नवी भेट दिली आहे. ही भेट आहे मोफत एस.एम.एस. सेवा देण्याच्या नव्या सॉफ्टवेअरची. एकदा का तुम्ही हे सॉफ्टवेअर तुमच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेत की, तुम्ही जगात कोठेही एस.एम.एस. मोफत करू शकता. ही प्रणाली पत्रकारांना समाजावून सांगण्यासाठी गेल्याच आठवड्यात साबीर भाटिया मुंबईत येऊन गेले. 
साबीर भाटिया यांचा जन्म 1969 मध्ये चंदिगडमध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते आणि आई सेंट्रल बँकेत नोकरीला होती. त्यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण पुण्यात बिशप कॉटन्स स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण बंगलोरमधील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर पिलानी येथील बिटस् पिलानी संस्थेत ते दाखल झाले. तेथून त्यांना टेक्नॉलॉजितील स्कॉलरशिप मिळाली आणि ते अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेले. 1988 मध्ये या स्कॉलरशिपमध्ये 162 मार्क्‍स मिळालेले ते जगातून एकमेव विद्यार्थी होते. अमेरिकेत त्यांनी बी.एस्सी. केले व त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये स्टँडफोर्ड विद्यापीठातून पदवी संपादन केली. 1992 साली त्यांनी पीएच.डी.साठी प्रवेश घेतला होता; परंतु त्यांनी ते काही पूर्ण केले नाही. अँपल कॉम्प्युटर्समध्ये सिस्टिम इंटिग्रेटर या पदावर नोकरीला लागले. या कंपनीत त्यांनी जेमतेम वर्षभर नोकरी केली. त्यानंतर ते फायरपॉवर सिस्टिम्स या कंपनीत नोकरीसाठी दाखल झाले; परंतु येथेही त्यांचे काही मन रमेना. शेवटी त्यांनी आपला अँपलमधील एक सहकारी ज्ॉक स्मिथसोबत 1995 मध्ये हॉटमेल कॉर्पोरेशनची स्थापना केली. ते या कंपनीचे सहसंस्थापक होते. त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून हॉटमेल ही वेबवर आधारित ई-मेल सेवा सुरू केली. ही जगातील पहिली ई-मेल सेवा होती. त्यांनी सुरू केलेल्या ई-मेलमुळे जगात क्रांतीच झाली. आजही हॉटमेलकडे 37 कोटी नोंद झालेले सदस्य आहेत आणि जगात त्यांचा या क्षेत्रात प्रथम क्रमांक आजही टिकवला आहे. भाटिया हॉटमेलचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी होते. अतिशय अल्पावधीत त्यांनी हॉटमेल फारच लोकप्रिय केले. 1997 साली त्यांनी हॉटमेल ही कंपनी मायक्रोसॉफ्टला 400 दशलक्ष डॉलरला विकली; परंतु 1999 पर्यंत ते मायक्रोसॉफ्टसोबतच होते. 1999च्या मध्याला त्यांनी आरझू डॉट कॉम ही वेबसाइट सुरू केली आणि मायक्रोसॉफ्टला रामराम केला. आरझूची स्थापना त्यांनी अतिशय मोक्याच्या वेळी केली. वेबवर आधारित अशा प्रकारे खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचे तसेच मनुष्यबळ पुरविण्याचे हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. मात्र, पुढे डॉट कॉमचा फुगा फुटला आणि आरझूला अपेक्षेऐवढे यश लाभले नाही. त्यानंतर 2006 मध्ये आरझूच ट्रॅव्हल पोर्टल म्हणून त्यांनी पुन्हा लाँच केली. त्यांच्या या प्रयत्नाला मात्र यश लाभले आणि आरझूने जगात पुन्हा एकदा नाव मिळवले. साबीर भाटिया यांनी आजवर केलेल्या या महत्त्वपूर्ण कामाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. यातून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आता त्यांनी लावलेल्या नवीन शोधामुळे जगात एस.एम.एस. क्रांती येऊ घातली आहे. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "साबीर भाटिया : हॉटमेलच्या सहसंस्थापकाची नवी भेट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel