फोटो कुठे काढला ते ओळखणारे अनोखे सॉफ्टवेअर

Published on 02 Dec-2011 KIMAYA
सध्याच्या दशकात संगणकाने सर्वांच्या जीवनात आमूलाग्र बदल केला आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की, पावलोपावली आपल्याला संगणकाची गरज भासू लागली आहे. सध्या जे नवनवीन सॉफ्टवेअर्स विकसित होत आहेत ते पाहता आपल्या आयुष्यात मोठे बदल होत जातील. मोबाइलच्या वापराने गेल्या दशकात असाच बदल प्रत्येकाच्या आयुष्यात केला आहे. यातदेखील मोठे बदल येऊ घातले आहेत. मोबाइल क्रांतीने तर आता ऐकणार्याचा आवाजच नाही तर बोलणारा माणूस प्रत्यक्ष दिसणार आहे. थ्रीजी तंत्रज्ञानामुळे हे आता शक्य होणार आहे.
अशाच प्रकारे एक नवीन संगणक विकसित करण्यात आले असून यात एखाद्याचा फोटो कुठे काढला हे समजणार आहे. पिटर्सबर्ग येथील कार्नेजीन मेलोन विद्यापीठातील संशोधकांनी हे नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. अशा प्रकारचे सॉफ्टवेअर पहिल्यांदाच विकसित करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा प्रकारचे सॉफ्टवेअर अपेक्षेपेक्षा किमान वीस वर्षे अगोदर आले आहे. एखाद्या फोटोद्वारे हे कसे ओळखले जाते? संगणकाची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असते. फोटोत असलेले रंग, त्याचे टेक्स्चर, लाइन्स याचा तो अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करतो. अशा प्रकारे फोटो नेमका कोणत्या भागातून काढण्यात आला आहे हे शोधण्यासाठी तो त्याच्या सहा दशलक्ष इमेज तयार करतो. त्या आधारावर हा फोटो नेमका कुठे काढण्यात आला आहे ते ओळखले जाते. महत्त्वाचे म्हणजे आयफेल टॉवरसारख्या नामवंत ठिकाणी काढलेला फोटो असल्यास ते कोणीही ओळखेल. मात्र अपरिचित भागात असलेल्या फोटोचे लोकेशन हे सॉफ्टवेअर बरोबर ओळखून देते. अशा प्रकारे 200 ठिकाणांचे फोटो या सॉफ्टवेअरने बरोबर ओळखून दिले आहेत. त्यावरून हे सॉफ्टवेअर यशस्वी झाल्याचे दिसते. गुन्हेगार शोधण्यासाठीदेखील या सॉफ्टवेअरचा उपयोग होऊ शकतो. तसेच लष्करासाठीदेखील याचा फार मोठा फायदा होऊ शकतो.
या सॉफ्टवेअरसाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जी.पी.एस.) ही उपग्रहावर आधारित प्रणाली विकसित करण्यात आली असून यासाठी अमेरिकेच्या हेरगिरी खात्याने 24 उपग्रह तैनात केले आहेत. परंतु ही सेवा आता नागरिकांसाठीदेखील उपलब्ध करून देण्यात आली. जी.पी.एस. ही सेवा जगातल्या कोणत्याही कोपर्यात 24 तास उपलब्ध होऊ शकते. परंतु फोटो कोणत्या विभागात घेतला गेला हे ओळखणे म्हणजे जी.पी.एस.पेक्षा पुढचे तंत्रज्ञान ठरू शकते. अर्थात ही सर्व यंत्रणा इंटरनेटद्वारे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हे तंत्रज्ञान झपाट्याने मिळू शकेल.

0 Response to "फोटो कुठे काढला ते ओळखणारे अनोखे सॉफ्टवेअर"
टिप्पणी पोस्ट करा