-->
रविवार दि. १० मे २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
दाऊदचा पत्ता काय?
-------------------------------------------
दाऊद हा एक आन्तरराष्ट्रीय गुन्हेगार आहे. ९२च्या बॉम्बस्फोेटानंतर तो काही अटींवर भारतात परत येण्यास तयार होता असे मध्यंतरी प्रसिध्द झाले होते. दाऊद अशा प्रकारे आपला जीव वाचविण्यासाठी अटी घालून परतेल यात काही तथ्य वाटत नाही. दाऊदने आपल्या चेहर्‍याची प्लॅस्टीक सर्जरी केली आहे, मध्येच तो भारतात येऊऩ जातो, दाऊदला हार्ट ऍटॅक आल्याने तो आता हतबल झाला आहे, अशा अनेक अफवा वजा बातम्या येत असतात. यात खरे किती खोटे किती यात शंकाच आहे. दाऊदच्या बाबतीत अशी गॉसिप फिरतच असतात. यापूर्वीच्या व सध्याच्या भाजपा नेत्यांनी सत्तेत आल्यास दाऊदला पाकिस्तानातून मुसक्या बांधून घेऊन येऊ अशा घोषणा केल्या होत्या. परंतु ते काही शक्य झालेले नाही. मोदींनी गेल्या वर्षात तरी हे शक्य करुन दाखविलेलेे नाही...
-----------------------------------------------------------
मुंबईतील १९९३मधील बॉंबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा पाकिस्तानात लपला असून, पाकिस्तान सरकार त्याला अभय देत असल्याचा दावा केंद्र सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये केला होता. मात्र, लोकसभेत या मुद्यावर सरकारने घूमजाव केले. दाऊद इब्राहिमचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. अर्थात या प्रकरणावरुन बोंबाबोंब होणे स्वाभाविक होते. कारण सत्तेवर येण्याअगोदर भाजपा व नरेंद्र मोदी दाऊदचा मुक्काम पाकिस्तानात असून त्याला मुसक्या बांधून घेऊन येऊ अशा घोषणा करीत होते. आता मात्र सत्तेच्या बोहल्यावर चढल्यावर वर्षाच्या आतच दाऊद पाकमध्ये नसल्याचा साक्षात्कार या सरकारला झाला आहे. मात्र यासंबंधी आपले हसे होणार हे स्पष्ट होताच सरकारने पुन्हा एकदा पलटी मारली. दाऊद कुठे आहे याचा पत्ता सर्वांनाच माहित आहे. दाऊद पाकिस्तानात दडून बसला आहे व त्याला पाकिस्तान सरकारचे पाठबळ आहे. हे उघड सत्य सर्वांनाच माहित असताना भारत सरकार याचा पत्ता नसवा याचे आश्‍चर्य वाटते. दाऊद कुठे दडून बसला आहे ते माहीत नाही. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा ज्ञात झाल्यानंतरच त्याच्या प्रत्यार्पणाबाबतची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे सरकारने एका लेखी उत्तरात सांगणे म्हणजे
भारत सरकारसाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे. कारण दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात दडून बसला असून, पाकिस्तान सरकार त्याला अभय देत असल्याचा दावा सरकारतर्फे अनेक वेळा करण्यात आला आहे. तसेच दाऊदला भारताच्या हवाली करण्याची मागणी करत याबाबतची अनेक कागदपत्रे भारताने पाकिस्तानला दिली आहेत. या कागदपत्रांमध्ये दाऊद पाकिस्तानमध्ये कुठे लपून बसला आहे याचाही उल्लेख आहे. मग असे असताना सरकारने पत्ता ठावूक नसल्याचा हा नवीन पवित्रा घेण्याची गरजच काय? दाऊद हा भारतासाठी मोस्ट वॉंटेड दहशतवादी असून, पाकिस्तानने त्यास भारताच्या हवाली करावे, अशी मागणी गेल्याच वर्षी सत्तेत आल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती. त्याच दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जू यांनीही दाऊद पाकिस्तानात दडून बसला असून, त्याबाबतचे अनेक पुरावे भारताकडे असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन केंद्र सरकारचे काम कसे ढिसाळपणे चालले आहे याचा प्रत्यय येतो.
कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम ज्या भागात लहानाचा मोठा झाला तो परिसर म्हणजे दक्षिण मुंबईतील पकमोडिया स्ट्रीट. इथल्या लहान मुलालाही दाऊद सध्या पाकिस्तानात असल्याचं माहीत आहे. दाऊद सध्या कराचीत वास्तव्यास असल्याचं येथील लोक सांगतात. ओसामा बिन लादेनला ज्या पद्धतीने अमेरिकने मारलं तसं दाऊदला मारणं सोपं नाही. दाऊदच्या भोवती चोवीस तास पहारा असतो. त्याशिवाय संरक्षणासाठी त्याची स्वतःची अशी फौज आहे जी कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकते असा गुप्तचर खात्याच अहवाल सांगतो. भारताकडे याबाबत कितीही पुरावे असले तरीही पाकिस्तान मात्र याप्रकरणी हात वर करत आहे. दाऊदचे दुबईतून पळून आलेल्या साथीदारांनी तपास यंत्रणेला दाऊदच्या पाकिस्तानातील अलिशान निवासस्थानांबद्दल माहिती दिली होती. पाकिस्तानात क्लिफ्टन परिसरात दाऊदचा २००० चौरस फूटाचा मोईन पॅलेस नावाचा त्याचा बंगला आहे. याच परिसरात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे. आणि असिफ अली झरदारी यांचं कराचीतलं निवासस्थानही याच परिसरात आहे. पाकिस्तानी लष्करातील माजी अधिकार्‍याांच्या वतीने दाऊदला सुरक्षा पुरविण्यात येते. अटक करण्यात आलेल्या दाऊदचे दोन हस्तक साजीद उस्मान बाटलीवाला आणि करीमुल्ला खान ज्यांनी पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला. मुंबई क्राइम ब्रँचने त्यांना अटक केली. त्यावेळी त्यांनी दाऊदबाबत माहिती दिली होती. करीमुल्लाने दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याच्या वृत्त खरं असल्याचं सांगितलं होतं. त्याने दाऊदकरता ड्रायव्हर म्हणून काम केलं होतं. तर बाटलीवालाने दाऊदबाबत आणखी काही माहिती पोलिसांना दिली होती. दाऊद फक्त शुक्रवारी नमाजाकरता बाहेर पडत असे. त्यावेळी त्याच्याबरोबर शस्त्रधारी पहारेकरी असलेल्या २० गाड्यांचा ताफा बरोबर असे, असे त्यांनी आपल्या जबानीत म्हटले होते. पोलिस कॉंस्टेबल इब्राहिम कासकर याच्या सात मुलांपैकी एक मुलगा असलेला दाऊद भारतातून पळून जाण्यापूर्वी मेहजाबीन इमारतीत राहत असे. याच परिसरात तो लहानाचा मोठा झाला. दरोडा, सोने-तस्करी अशा गुन्ह्यांवरून त्याने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला होता. करीम लाला व हाजी मस्तान यांच्या टोळ्यात कामे करत दाऊदने आपले दोन नंबरचे साम्राज्य उभे केले. दाऊदचे आज हे साम्राज्य जगात पसरल्याची चर्चा आहे. मुंबईत त्याच्या मालकीच्या आजही इमारती आहेत. परंतु सरकार काहीच करीत नाही. सरकारला जर खरोखरीच दाऊदला पकडायचे असते तर त्याला पकडणे काही कठीण नाही. अमेरिकेने ओसामाला ज्या प्रकारे पकडून ठार केला त्याधर्तीवर रॉने योजना आखली होती, परंतु त्याला भारत सरकारने विरोध केल्याचे वृत्त होते. यातील वस्तुस्थिती काय आहे ते तपासण्याची गरज नाही. आपल्या देशाच्या गुप्ततेच्या गोष्टी अशा प्रकारे उघडपणे चर्चेत येणे चुकीचे आहे. दाऊद हा एक आन्तरराष्ट्रीय गुन्हेगार आहे. ९२च्या बॉम्बस्फोेटानंतर तो काही अटींवर भारतात परत येण्यास तयार होता असे मध्यंतरी प्रसिध्द झाले होते. दाऊद अशा प्रकारे आपला जीव वाचविण्यासाठी अटी घालून परतेल यात काही तथ्य वाटत नाही. दाऊदने आपल्या चेहर्‍याची प्लॅस्टीक सर्जरी केली आहे, मध्येच तो भारतात येऊऩ जातो, दाऊदला हार्ट ऍटॅक आल्याने तो आता हतबल झाला आहे, अशा अनेक अफवा वजा बातम्या येत असतात. यात खरे किती खोटे किती यात शंकाच आहे. दाऊदच्या बाबतीत अशी गॉसिप फिरतच असतात. यापूर्वीच्या व सध्याच्या भाजपा नेत्यांनी सत्तेत आल्यास दाऊदला पाकिस्तानातून मुसक्या बांधून घेऊन येऊ अशा घोषणा केल्या होत्या. परंतु ते काही शक्य झालेले नाही. मोदींनी गेल्या वर्षात तरी हे शक्य करुन दाखविलेलेे नाही. कॉँग्रेसच्या सरकारला जे शक्य झाले नाही ते करुन दाखवून जनतेला अच्छे दिन दाखविण्याचा वादा नरेंद्र मोदींनी केला होता. आता पुढील चार वर्षात तरी दाऊदचा नेमका पत्ता शोधून मुसक्या बांधून देशात आणले जाईल अशी अपेक्षा आपण करुया.
-------------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel