-->
संपादकीय पान बुधवार दि. ८ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आयपीएलचा पुन्हा थरार
पुढील दीड महिने आयपीएलचा पुन्हा एकदा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवयाला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेचं यंदाचं आठवं वर्ष. गेल्या आठ वर्षात या स्पर्धेनं जगभरातल्या क्रिकेट रसिकांच्या ह्दयात मानाचं स्थान पटकावलं. ललित मोदी या उद्योगपतीनं आयपीएलचं शिवधनुष्य पेललं आणि अनेकांच्या विरोधाला न जुमनता स्पर्धेचं यशस्वी आयोजन करून दाखवलं.  जगभरातल्या क्रिकेटचाहत्यांनी २००८ साली आयपीएलचा महासंग्राम अनुभवला. आयपीएलनं क्रिकेटची आर्थिक समिकरणं पूर्णपणे बदलून टाकली.ं खिजगणतीतही नसलेल्या क्रिकेटपटूंना या स्पधेंनं मालामाल करून टाकलं. या स्पर्धेसाठीचे संघ, त्यांच्या खरेदीसाठी लावण्यात आलेली बोली, आयपीएलच्या संघांचे अतिश्रीमंत मालक, खेळाडूंचा लिलाव, या लिलावात प्रत्येक खेळाडूसाठी लावण्यात आलेली कोट्यवधींची बोली...पैशांचा हा तमाशा पाहून सर्वसामान्यांचे डोळे अक्षरश: पांढरे झाले. क्रिकेटमध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल कशा रितीने होऊ शकते ते या निमित्ताने पहाता आले. आयीपएलला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. क्रिकेटचाहत्यांनी ही स्पर्धा अक्षरश: डोक्यावर घेतली. आयपीएलमुळे ट्‌वेंटी-ट्‌वेंटी क्रिकेटनं  लोकप्रियतेचं शिखर गाठलं. आंतराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक खेळाडूला आयपीएलनं आकर्षित केलं. आयपीएलमधली कारकिर्द बहरावी यासाठी अनेक क्रिकेटपटूंनी वेळेआधीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीही घेतली. या स्पर्धेमुळे कसोटी आणि एकदिवसीय  क्रिकेटला घरघर लागणार की काय, अशी भितीही व्यक्त करण्यात आली.  पण आयपीएल आपला दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरली. २००९ साली आयपीएलदरम्यान सार्वत्रिक निवडणुका आल्याने सुरक्षेच्या कारणावरून ही स्पर्धा दक्षिण आङ्ग्रिकेत घेण्यात आली. २०१० सालापासून ही स्पर्धा भारतातच  होतेय. गेल्या आठ वर्षांच्या काळात आयपीएलने अनेक चढउतार अनुभवले. या स्पर्धेनं अनेक खेळाडूंची कारकिर्द घडवली तर  काहींची बिघडवली. भारतीय संघाची कवाडं खुली होण्याची शक्यता नसलेल्या अनेक खेळाडूंना आयपीएलनं व्यासपीठ मिळवून दिलं. एरवी प्रकाशातही येऊ  न शकणार्‍या खेळाडूंना आयपीएलने प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी दिल्या. या स्पर्धेमुळे खेळाडूंनाही वलय मिळालं. पहिली चार ते पाच वर्ष आयपीएल  यशोशिखरावर होतं. पण ही स्पर्धाही नको त्या वादात अडकली आणि स्पर्धेची लोकप्रियता झपाट्यानं कमी झाली. गर्दीनं ङ्गुललेली मैदानं रिकामी, ओकीबोकी दिसू लागली. जगभरात तिन्ही त्रिकाळ सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धांचाही आयपीएलच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला. पुणे वॉरियर्स इंडिया, कोची टस्कर्स केरळ हे संघ एखाद दुसर्‍या वर्षातच स्पर्धेतून बाद झाले. ललिल मोदींची आयपीएलच्या अध्यक्षपदावरून गच्छंती झाल्यानंतर या स्पर्धेला लोकप्रियतेच्या दृष्टीनं उतरती कळा लागली. त्यातच भर पडली तरी मॅच ङ्गिक्सिंग प्रकरणाची. अवघ्या क्रिकेटविश्‍वाला पोखरून काढणार्‍या मॅच ङ्गिक्सिंग आणि स्पॉट ङ्गिक्सिंग प्रकरणानं आयपीएललाही हादरवलं. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयालाही हस्तक्षेप करावा लागला. २०१३ सालच्या या घटनांमुळे आयपीएलवरचा क्रिकेट चाहत्यांचा विश्‍वास डळमळीत झाला. एस. श्रीसंथ, अंकित चव्हाण आणि अजित चांडिला हे राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू या प्रकरणात अडकले. या तिघांना अटकही करण्यात आली. या स्पर्धेतलं स्पॉट ङ्गिक्सिंग प्रकरण या तिघांपुरतं मर्यादित नव्हतं. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे मालक एन. श्रीनिवासन, त्यांचा जावई गुरूनाथ मैयप्पन, राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा, अभिनेता विंदू दारासिंग अशा अनेक मोठ्या माशांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं उघड झालं. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, संघातला एक खेळाडू सुरेश रैना यांच्यावरही या प्रकरणी शिंतोडे उडले. या प्रकरणाच्या तपासासाठी मुद्गल समितीची स्थापना करण्यात आली. एन. श्रीनिवासन यांना यामुळे आपलं पद सोडावं लागलं. आयपीएल स्पॉट ङ्गिक्सिंग प्रकरणावर अजूनही पडदा पडलेला नाही. या प्रकरणात नेमकं दोषी कोण, याचा शोध सुरू आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आयपीएलचा आठवा हंगाम सुरू होतोय. क्रिकेट विश्‍वचषकानं क्रिकेट चाहत्यांच्या मनावर केलेलं गारूड अजूनही उतरलेलं नसताना आयपीएलचा ज्वर चाहत्यांवर किती चढणार ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यंदाच्या स्पर्धेत बर्‍याच गोष्टी नव्यानं होत आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबनंतर पुणे वॉरियर्स इंडिया आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सकडून खेळलेल्या युवराज सिंगला यंदा दिल्ली डेअरडेव्हिल्सनी विकत घेतलंय. दिल्लीनं युवराजला १६ कोटी रूपयांची विक्रमी बोली लाऊ न खरेदी केलंय. त्यामुळे यंदाच्या हंगामातला तो सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. युवराजची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपल्यातच जमा आहे. युवराज कर्णधार असलेला पुणे वॉरियर्सचा संघ स्पर्धेतून केव्हाच बाद झालाय. असं असलं तरीही युवराज सिंगचा आयपीएलमधला भाव अजूनही उतरलेला नाही. प्रतिस्पर्ध्यावर कोणत्याही क्षणी वर्चस्व गाजवण्याच्या त्याच्या क्षमतेवर संघ मालकांचा अजूनही विश्‍वास असल्याचं त्याला मिळालेल्या विक्रमी भावावरून दिसून येतंय. खेळाडू म्हणून युवराज अपयशी ठरला असला तरी अजूनही आपणच आयपीएलचे किंग असल्याचं त्यानं दाखवून दिलंय. गेल्या वर्षीही युवराजच सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. युवराज ङ्गारसा ङ्गॉर्ममध्ये नसला तरीही त्याच्या खेळाच्या दर्जावर आणि   एकहाती सामना जिंकून देण्याच्या त्याच्या क्षमतेवर दिल्ली डेअरडेव्हिल्सनी पूर्ण विश्‍वास टाकला आहे. आत्तापर्यंतच्या आयपीएल हंगामात ङ्गारशी प्रभावी कामगिरी करू न शकलेल्या दिल्लीसाठी युवी हा हुकुमी एक्का आहे.  यंदाच्या हंगामात युवी आपली सर्वोत्कृष्ट  कामगिरी करून दाखवेल, अशी दिल्लीला अपेक्षा आहे. या स्पर्धेतल्या जाहिरातींच्या अर्थकारणाबद्दल बोलायचं तर क्रिकेटचा विश्‍वचषक नुकताच संपल्याने आयपीएलच्या आठव्या हंगामासाठी जाहिरातदार ङ्गारसे उत्सुक नसतील, अशी चर्चा होती. पण आयपीएलमध्ये जाहिरात देण्यासाठी मोठ मोठ्या ब्रँण्डसमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं दिसून येतंय. जाहिरातीच्या दरांच्या बाबतीत आयपीएलनं वर्ल्डकपवर मात केल्याचं सध्याचं चित्र आहे. मॅच ङ्गिक्सिंग प्रकरणामुळे आयपीएलची लोकप्रियता कमी झाल्याचं चित्र निर्माण केलं जात असलं तरी जाहिरातदारांवर याचा कोणातही परिणाम झालेला नाही. आयपीएलचे सामने प्राईमटाईममध्ये दाखवले जाणार असल्याने जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संधी सोडायची जाहिरातदारांची तयारी नाही. मल्टी स्क्रीन मिडियाच्या सोनी वाहिनीवर आयपीएलचे सामने दाखवण्यात येणार आहेत. आयपीएलचे अधिकृत प्रक्षेपक असलेल्या मल्टी स्क्रीन मिडियाने सामन्यांदरम्यान प्रति दहा सेकंदांच्या स्पॉटसाठी ४.५ ते ५ लाखांपर्यंत दर आकारायला सुरूवात केली आहे. जाहिरातीच्या यंदाच्या दरात गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयपीएल जसजशी पुढे सरकेल तसे जाहिरातींच्या दरांमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होतेय. गेल्या वर्षी सोनीला जाहिरातींमधून ८०० कोटी रूपयांचं उत्पन्न मिळालं होतं. यंदा त्यात भर पडून सोनीचं उत्पन्न ९०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आयपीएलला प्राईम टाईमचा ङ्गायदा मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलवर आर्थिक दृष्ट्या तरी वर्ल्ड कपचा कोणताही प्रभाव पडणार नसल्याचं चित्र आहे. एकंदरितच यंदाच्या आयपीएलमधल्या संघांमध्ये जबरदस्त ठस्सन बघायला मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
------------------------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel