संपादकीय पान शनिवार दि. ४ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
तालिबानी वृत्ती
कायदा हातात घेऊन न्याय करायच्या घटना वाढत आहेत. लातूर जिल्ह्यात एका दलित महिलेला अर्धनग्न करून काढलेली धिंड, कल्याणजवळील अटयाळी येथे एका तरुणीवर कळशीचोरीचा आरोप करून काढण्यात आलेली धिंड, नगरमधील तरुणाला विवस्त्र करून काढण्यात आलेली धिंड या घटना पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. झुंडशाही वेळीच ठेचली नाही, तर कायदा व सुव्यवस्थेला आव्हान निर्माण होईल. आपल्याकडे कायदा हातात घेऊन स्वतःच न्याय करण्याच्या घटना वाढत आहेत. जात पंचायतींच्या अमानुष निवाड्याबाबत एकीकडे सरकार कायदे करायला निघाले आहे. दुसरीकडे जातीच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी संपूर्ण गाव, समाजाला वेठीला धरण्याचे प्रकार वाढले आहेत. महाराष्ट्रातील गेल्या दोन वर्षांमधील अशा प्रकारच्या घटना पाहता गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी न्याय व्यवस्थेला मदत करण्याऐवजी एखाद्याला स्वतःच गुन्हेगार ठरवून शिक्षा देण्याचे प्रकार वाढले आहेत. दुबळ्या, कमकुवत घटकांना बळी देण्यात, त्यांना शिक्षा करण्यात काय मर्दुमकी आहे, तेच कळत नाही. खैरलांजीची घटना जुनी झाली; परंतु गेल्या दोन वर्षांमधील घटना पाहिल्या, तर गुन्हा घडत असताना दुर्लक्ष करणारा समाज एखाद्याचा गुन्हा सिद्ध होण्याअगोदरच त्याला दोषी ठरवून शिक्षा देऊन मोकळा होतो. झुंडीची मानसिकता वेगळी असते. तिला विवेक नसतो; परंतु कायदे करणारेच जेव्हा विवेक गमावून झुंडीची भाषा बोलू लागतात, तेव्हा आपल्या मनाच्या कोपर्यात दडून बसलेली तालिबानी मानसिकता कशी डोके वर काढते, हे दिसतं. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं तेव्हा संपूर्ण देश खवळून उठला. रस्त्यावर मोर्चे निघाले. आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. त्यात काही वावगं नव्हतं; परंतु आरोपींना आमच्या ताब्यात द्या, त्याला काय करायची, ती शिक्षा आम्ही करतो, असं हा जमाव म्हणायला लागला. एखाद्या गोष्टीचा संताप आला, की असं म्हणण्याची पद्धत आहे. याचा अर्थ तसं करावंच असं नाही. किंबहुना, तसं करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तो गुन्हा होतो आणि त्यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेत कडक शिक्षेची तरतूद आहे, हे संबंधितांना कळायला हवं. झुंडीची मानसिकता आणि विचारी माणसाच्या मानसिकतेत ङ्गरक असतो. तसा ङ्गरक दिसला नाही तर झुंडीत आणि विचारी माणसांमध्ये काही ङ्गरक नसतो. विशेषतः जिथं कायदा होतो, त्या सभागृहात बसणार्यांना तरी तेवढं गांभीर्य असायला हवं; परंतु मोहमयी दुनियेत संहितेत जे लिहिलं, त्या पलीकडे बोलायची सवय नसलेल्यांना झुंडीपेक्षा वेगळं भाष्य करता येत नसावं किंवा झुंडीतील एक होण्यात त्यांना धन्यता वाटत असावी. एवढं सर्व सांगण्याचं कारण म्हणजे निर्भया प्रकरणातील आरोपींना ताब्यात देण्याची मागणी दस्तुरखुद्द जया बच्चन यांनी केली होती. आरोप होणं आणि गुन्हा सिद्ध होणं, यातही ङ्गरक असतो. एखाद्यानं गुन्हा केला, म्हणजे तो आरोपी झाला, असं नसतं. भारतीय न्यायव्यवस्थेत त्याला बचावाची संधी देणं, दोषी आढळला तरच शिक्षा करणं अभिप्रेत असते. त्यासाठी गुन्हेगाराच्या विरोधात पुराव्याची साखळी जमा करावी लागते. अशा वेळी समाज मात्र पीडिताला मदत करत नाही. गुन्हा करून हजारो लोकांसमोरून जात असणार्या एखाद्या व्यक्तीला अटकाव करण्याचं धाडस समाज दाखवत नाही. एखाद्यानं गुन्हा केला असेल, तर गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार त्याला शिक्षा करण्यासाठी आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे; परंतु न्याय व्यवस्थेविरुद्धचा विश्वास उडत चालला आहे, की समांतर न्यायव्यवस्था तयार करण्याची घाई झाली आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. दिवाणी दाव्यांना निकाली निघायला अजून वेळ लागतो; परंतु बलात्कार, खुनासारखे गंभीर गुन्हे आता लवकर निकालात निघायला लागले आहेत. जलदगती न्यायालयं स्थापन करण्यात आली आहेत. त्यातील न्यायाची प्रतीक्षा करण्याऐवजी न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरून तालिबानी पद्धतीनं न्याय करणं चुकीचं आहे. गेल्या दोन वर्षांतील महाराष्ट्रातील घटना पाहिल्या, तर कायदा व सुव्यवस्थेपुढं झुंडशाही मोठं आव्हान निर्माण करते आहे, हे लक्षात घ्यायला हवं. नागालँडमधील दीमापूर प्रकरण देशभर गाजलं. तेथील एका युवकाचे एका युवतीशी संबंध होते. दोन वेळा हॉटेलवर जाऊन तिनं त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास होऊन तो दोषी आढळला असता, तर त्याला शिक्षा झाली असती; परंतु झुंडशाहीला तेवढा वेळ कुठं आहे? त्यातच बलात्कार करणारा बांगलादेशी असल्याची अङ्गवा पसरली. त्यामुळे जमाव खवळला. या युवकाची तुरुंगातून बळजबरीने सुटका करून घेऊन त्याचा खून केला गेला. त्याचा मृतदेह भर चौकात ङ्गाशी दिलेल्या अवस्थेत लटकावला. अङ्गवा कशी बळी घेते, याचं हे ज्वलंत उदाहरण. आता महाराष्ट्राकडे वळू. नगर जिल्ह्यातील सोनई येथे एका दलित मुलाचं एका उच्च जातीच्या मुलीशी प्रेम होतं. दोघंही विवाह करण्यावर ठाम होते. खालच्या जातीच्या मुलाशी लग्न करण्यास उच्च जातीच्या लोकांचा विरोध होता. विरोध असणं एक वेळ समजून घेता येईल; परंतु उच्च जातीतील झुंडीनं त्या युवकासह आणखी दोघांचा बळी घेतला. खर्ड्यातही असंच घडलं. नितीन आगे या मुलाचा उच्च जातीच्या मुलीशी प्रेम असल्याच्या संशयावरून खून करून त्याचा मृतदेह झाडाला टांगून ठेवण्यात आला. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये संबंधित मुलीचं काय म्हणणं आहे, हे कुठंच पुढे आलं नाही. प्रेम करणं हा गुन्हा आहे का? या सर्व प्रकरणांमध्ये मुलींना काही बाजू आहे, त्यांना काही म्हणायचं आहे का, याचा विचार करावा, असं कुणालाही वाटलं नाही. झुंडीच्या दबावाखाली येऊन काही प्रकरणात मुलींना खोटी ङ्गिर्याद द्यायला भाग पडलं का, याचाही विचार झाला नाही. लातूर जिल्ह्यातील बोरगाव येथे एका दलित महिलेला अर्धनग्न करून तिची काढलेली धिंड, कल्याणजवळील अटयाळी येथे एका तरुणीवर कळशी चोरीचा आरोप करून कपडे ङ्गाडून काढण्यात आलेली तिची धिंड हे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. वांबोरी, बोरगाव, अट्याळीच्या घटना पाहिल्या, तर त्यात सुडाची भावना आणि विकृती दिसते. झुंडशाही वेळीच ठेचली नाही, तर ती कायदा व सुव्यवस्थेला आव्हान निर्माण करेल हे या निमित्ताने आवर्जून लक्षात घ्यायला हवं.
----------------------------------------------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा