-->
संपादकीय पान सोमवार दि. २० जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
मुंबई मॅरेथॉनमधून साधला स्वयंसेवी संस्थांसाठी अर्थसेतू
------------------------------
आज वाचकांच्या हातात वृत्तपत्र पडेपर्यंत मुंबईत हजारो लोक धावणार्‍या मॅरेथॉनचा गुलाबी थंडीत समारोप झालेला असेल. मुंबईतली ही अकरावी मॅरेथॉन आहे. मुंबईच्या व्यस्त जीवनातून रविवारची सुट्टी ऐंजॉय करण्याऐवजी हजारो मुंबईकर या मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणार्‍यांची संख्या वाढतच चालली आहे, यातून मुंबईकरांच्या उत्साहाची कल्पना येते. जगभरात अशा मॅरेथॉन आयोजित केल्या जातात आणि त्याला अशाच प्रकारे उत्तम प्रतिसाद मिळतो. ही मॅरेथॉन जिकणारा हा उत्कृष्ट धावपटू असतो, परंतु त्यापेक्षा त्या धावपटूला साथ देणारे हजारो लोक काही ना काही तरी सामाजिक उदष्टि डोळ्यापुढे ठेवून धावत असतात. हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणावे लागले. यात सहभागी होणार्‍या प्रत्येकाकडून ठराविक रक्कम घेतली जाते आणि ज्या स्वयंसेवी संस्थेकडून हे सदस्य धावतात त्यांना दहा टक्के रक्कम कापून दिली जाते. कापलेल्या दहा टक्के रकमेतून या मॅरेथॉनचा खर्च भागविला जातो. अशा प्रकारे गेल्या वर्षी सुमारे २० कोटी रुपयांहून जास्त रक्कम स्वयंसेवी संस्थांना मिळाले होते. या निधीतून अनेक स्वयंसेवी संघटनांनी आपले विविध सामाजिक प्रकल्प मार्गी लावले. अशा प्रकारे एकीकडे मॅरेथॉन स्पर्धा झाली तर दुसरीकडे यातून स्वयंसेवी संस्थांना अर्थसेतूही बांधता आला. अनेक स्वयंसेवी संघटनांना यामाध्यमातून निधी उभारता येतो. कारण जर तुम्ही लोकांकडे जाऊन आमच्या संस्थेला देणगी द्या असे सांगितले तर लोक फारसे उत्सुक नसतात. परंतु अशा प्रकारे मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा आणि यातून आमच्या संस्थेला देणगीही मिळेल असे सांगितल्यास लोक चटकन देणगी देतात. तसेच मॅरेथॉनमध्ये आपण एखाद्या संस्थेच्या नावे धावत असतो आणि त्या संस्थेला त्यातून आर्थिक मदत मिळते याचे त्यांना फार मोठे समाधान लाभते. यात सहभागी होणारे विविध सामाजिक जनजागृतीचे बॅनर्स व रंगीबेरंगी कपडे घालून सहभागी हेत असल्याने यातून विविध संदेशही आम जनतेपर्यंत पोहोचविले जातात. मुंबईत आता ही स्पर्धा इतकी लोकप्रिय झाली आहे की अनेक उद्योगतींपासून ते सेलिब्रेटींपर्यत अनेक जण यात धावण्यास उत्सुक असतात. यंदा तर ९७ वर्षीय चुनीलाल पंचाल हे आजोबा मोठ्या उत्साहाने धावणार आहेत. अर्थात ते गेल्या वर्षीही यात सहभागी झाले होते. ८० वर्षांच्यावर असलेले ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यात उतरतात आणि आपणही तरुण आहोत हे मोठ्या दिमाखाने तरुणांना सांगतात. ८७ वर्षीय मंजुला ठक्कर या आजी दरवर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेत उतरणार आहेत. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचा हा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. यात केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर अगदी १२ वर्षाची मुलेही आपल्या आई-वडिलांसोबत सहभागी होतात. ही स्पर्धा जशी जवळ येते तशी अनेकांची लगबग सुरु होते ती सराव करण्यासाठी. यातील प्रत्येकाला मनातून जरुर वाटत असते की आपण ही स्पर्धा जिकण्यासाठी उतरत नाही आहोत. परंतु त्यांची यात उतरण्याची जी जिद्द असते ती वाखाण्यासारखी असते. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक तरुण, तरुणी चालण्याचा किंवा धावण्याचा सराव सुरु करतात. यातून त्यांना अप्रत्यक्षरित्या व्यायामाची सवय लागते. अशी ही स्पर्धा मुंबईत एक वेगळीच वातावरण निर्मिती करीत असते. यातूनच आपला समाज एकसंघ होत असतो. यातून सामाजिक संस्थांना जो हातभार लागतो तो महत्वाचा आहे.
-------------------------------      

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel